आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

74 वर्षांच्या झाल्या मुमताज:18 वर्षांच्या मुमताजसोबत शम्मी कपूर यांना थाटायचे होते लग्न, एका अटीमुळे अभिनेत्रीने नाकारला होता लग्नाचा प्रस्ताव

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुमताज यांचा आज वाढदिवस आहे.

आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेल्या अभिनेत्री मुमताज यांचा आज वाढदिवस असून त्यांनी वयाची 74 वर्षे पूर्ण केली आहेत. 31 जुलै 1947 रोजी जन्मलेल्या मुमताज यांनी वयाच्या 11 व्या वर्षी कुटुंबाला आर्थिक मदत करण्यासाठी अभिनयाला सुरुवात केली. सुरुवातीला ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून काम केल्यानंतर, मुमताज यांना फौलाद या चित्रपटात दारा सिंग यांच्यासोबत मुख्य अभिनेत्रीच्या रुपात काम करण्याची संधी मिळाली. दारा सिंगसोबत अनेक हिट चित्रपट दिल्यानंतर मुमताज यांची इंडस्ट्री आणि देशभरात ओळख निर्माण झाली. त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या जीवनाशी संबंधित काही खास गोष्टी जाणून घेऊया -

अनेक हिट चित्रपट दिल्यानंतर मुमताज यांनी लाखो लोकांसह अभिनेते शम्मी कपूर यांनाही आपला दीवाना केले होते. असे म्हटले जाते की, मुमताज देखील शम्मी कपूर यांच्या प्रेमात आकंठ बुडाल्या होत्या. मुमताज 18 वर्षांच्या असताना शम्मी कपूर यांनी त्यांना लग्नाची मागणी घातली होती. पण या प्रस्तावासोबत एक अटही ठेवली होती. ती म्हणजे, कपूर घराण्याच्या परंपरेनुसार मुमताज यांना लग्नानंतर फिल्म इंडस्ट्री सोडावी लागणार होती. पण मुमताज यांनी त्यांच्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्यांमुळे ही अट स्वीकारण्यास नकार दिला आणि दोघांची प्रेमकथा अपूर्ण राहिली. लग्नाआधी मुमताज यांचे संजय खान, फिरोज खान आणि देव आनंद यांसारख्या बड्या स्टार्सशीही नाव जोडले गेले होते.

राजेश खन्ना यांच्याशीही नाव जोडले गेले
मुमताज यांनी आपल्या करिअरची सुरुवात दारा सिंगसोबत केली, पण त्यांना खरे यश राजेश खन्ना यांच्यासोबतच्या दो रास्ते या चित्रपटातून मिळाले. मुमताज यांनी राजेश खन्ना यांच्यासोबत अनेक चित्रपट केले, त्यापैकी 8 चित्रपट सुपरहिट ठरले. चित्रपटांबरोबरच दोघांची गाणी चार्टबस्टर ठरु लागली. हे दोघे एकत्र आल्यावर चित्रपट हिट होतात असे म्हटले जात होते. चित्रपटांसोबत त्यांच्या अफेअरच्या बातम्याही चर्चेत होत्या. पण दोघांनीही हे नाते कधीच स्वीकारले नाही.

असे म्हटले जाते की, राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांच्या लग्नानंतर जेव्हा मुमताज यांनी व्यापारी मयूर वाधवानी यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा राजेश खन्ना त्यांच्यावर खूप नाराज झाले होते. पण या नाराजीचे कारण दोघांचे अफेअर नसून मुमताज यांचे करिअर होते. राजेश खन्ना यांनी त्यांना समजावले होते की, जर त्या यशोशिखरावर असताना लग्न करतील, तर त्यांचे करिअर उद्ध्वस्त होईल आणि नेमके हेच घडले. लग्नानंतर मुमताज यांचे सर्व चित्रपट फ्लॉप होऊ लागले आणि त्या इंडस्ट्री सोडून कुटुंबासह परदेशात स्थायिक झाल्या.

मुमताज यांच्या छोट्या पण हिट करिअरमध्ये 'मेला', 'अपराध', 'नागिन', 'ब्रह्मचारी', 'राम और श्याम', 'दो रास्ते' आणि 'खिलौना' या चित्रपटांचा समावेश आहे. अभिनेत्रीला दोन मुली आहेत, त्यापैकी एकीचे लग्न अभिनेता फरदीन खानसोबत झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...