आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हॅपी बर्थडे:'या' एका व्यक्तीच्या भितीमुळे शर्मिला टागोरांनी काढले होते मुंबईत लागलेले स्वतःचे बिकिनीतील पोस्टर्स, वाचा काय आहे किस्सा

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सासूबाईंच्या भितीने काढले होते बिकिनी पोस्टर

8 डिसेंबर म्हणजे अभिनेत्री शर्मिला टागोर यांचा वाढदिवस. शर्मिला बॉलिवूडमध्ये अनेक ट्रेंड सुरु करणारी अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. सिनेमांत पहिल्यांदा बिकिनी शॉट देणारी पहिली अभिनेत्री म्हणून देखील त्यांना ओळखले जाते.

शर्मिला टागोर खुल्या विचारांच्या आहेत. परंतु त्यांच्या सासूबाई नवाबी घराण्यातून असल्याने पारंपरिक विचारांच्या होत्या. त्यांच्या हट्टापायी शर्मिला यांना नवाब पतौडीसोबत लग्न करण्यासाठी इस्लाम धर्म स्वीकारावा लागला होता. भोपाळमध्ये नवाब कुटुंबांच्या जवळच्या एका व्यक्तीने सांगितल्यानुसार, कोणत्याही परिस्थितीत सासू साजिदा सुल्तान नाराज होणार नाहीत, यासाठी शर्मिला नेहमी प्रयत्नशील राहात असतं.

सासूबाईंच्या भितीने काढले होते बिकिनी पोस्टर

भोपाळचे नवाब कुटुंबाच्या जवळील एका व्यक्तीने नाव न सांगण्याच्या अटीवर काही वर्षांपूर्वी सांगितले होते की, 1967मध्ये नवाब पतौडींच्या आई साजिदा सुल्तान शर्मिला यांना भेटण्यासाठी मुंबईला गेल्या होत्या. तेव्हा शर्मिला यांचा बहुचर्चित 'एन इव्हिनिंग इन पेरिस' सिनेमा प्रदर्शित होणार होता. या चित्रपटात शर्मिला यांनी बिकिनी परिधान केली होती. शर्मिला यांचे बिकिनीतील पोस्टर मुंबईमध्ये ठिक-ठिकाणी लागले होते.शर्मिला यांना नवाब पतौडी यांच्या आई मुंबईला येणार याची माहिती मिळाल्यानंतर मुंबईच्या रस्त्यावर लागलेले बिकिनी पोस्टर्स निर्मात्यांना काढून टाकण्यास सांगितले होते.

शर्मिला यांना भिती वाटत होती, की हे पोस्टर्स पाहून नवाब पतौडी यांच्या आई नाराज होतील.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser