आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा2018 मध्ये रिलीज झालेल्या 'ब्लॅक पँथर'या चित्रपटातील मुख्य अभिनेता म्हणून झळकलेले चॅडविक बोसमन यांचे निधन झाले आहे. ते 43 वर्षांचे होते. शुक्रवारी त्यांनी लॉस एंजिलिस येथील आपल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. कुटुंबाने दिलेल्या ऑफिशिअल स्टेटमेंटमध्ये, चॅडविक जवळजवळ चार वर्षांपासून कोलोन कर्करोगाशी झुंज देत होते.
चॅडविक यांना 2016 मध्ये तिस-या स्टेजच्या कोलोन कर्करोगाचे निदान झाले होते. हा आजार 2020 पर्यंत चौथ्या स्टेजमध्ये पोहोचला होता. याकाळात त्यांच्यावर अनेक शस्त्रक्रिया झाल्या आणि केमोथेरपीदेखील सुरु होती. मात्र उपचारादरम्यानही त्यांनी कामापासून ब्रेक घेतला नव्हता. या काळात त्यांनी 'मार्शल', 'डा 5 ब्लड्स' आणि 'मा रेनीज ब्लॅक बॉटम' सारख्या चित्रपटांमध्ये काम केले. 'डा 5 ब्लड्स' आणि 'मा रेनीज ब्लॅक बॉटम' हे चित्रपट कोरोना व्हायरसमुळे रिलीज होऊ शकले नाहीत.
कुटुंबाने आपल्या निवेदनात लिहिले की, "ते एक खरे लढवय्ये होते. त्यांनी अनेक शस्त्रक्रिया आणि केमोथेरपी दरम्यान 'मार्शल'पासून 'डा 5 ब्लड्स' आणि 'मा रेनीज ब्लॅक बॉटम' पर्यंत अनेक चित्रपट केले. 'ब्लॅक पँथर'मधील किंग टी-चल्ला ही व्यक्तिरेखा साकारणे ही त्यांच्यासाठी सन्मानाची गोष्ट होती." चॅडविक यांनी त्यांच्या कर्करोगाबद्दल जाहीरपणे कधीच खुलासा केला नाही. त्यांच्या पश्चात आईवडील व पत्नी असा परिवार आहे. चॅडविक यांना मुलबाळ नसल्याचे त्यांची पब्लिस्टिक निकी फियोरावेंटे यांनी सांगितले आहे.
दक्षिण कॅरोलिना येथे जन्मलेल्या चॅडविक यांनी हॉवर्ड विद्यापीठातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. 2013 मध्ये फिल्म स्टार होण्यापूर्वी ते टीव्हीवर छोट्या मोठ्या भूमिका करत होते. 2013 च्या अमेरिकन स्पोर्ट्स बायोग्राफिकल ड्रामा '42' मधील त्यांच्या जॅकी रॉबिनसनच्या पात्राने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आणि ते हॉलिवूडमध्ये स्टार बनले. हा चित्रपट अमेरिकेतील माजी प्रोफेशनल बेसबॉल प्लेअर जॅकी रॉबिनसनच्या आयुष्यावर आधारित होता. जे आधुनिक युगातील मेजर बेसबॉल लीगमध्ये खेळणारे पहिले आफ्रिकन अमेरिकन खेळाडू होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.