आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीएमसीचा हातोडा पडणार?:फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राला अनधिकृत बांधकामासाठी बीएमसीची नोटीस, 'कारणे दाखवा' नोटिशीला उत्तर देण्यासाठी सात दिवसांचा अवधी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मनीष मल्होत्राच्या बंगल्यातील बांधकामांवर महापालिकेने आक्षेप नोंदवला आहे.

बुधवारी सकाळी अभिनेत्री कंगना रनोटच्या पाली हिलस्थित ऑफिस कम स्टुडिओवर कारवाई केल्यानंतर आता बॉलिवूडचा फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा मुंबई महापालिकेच्या रडारवर आहे. आपली रहिवासी जागा बेकायदेशीरपणे व्यावसायिक मालमत्तेत रुपांतरित केल्याबद्दल बीएमसीने मनीष मल्होत्राला नोटीस बजावली आहे.

सात दिवसांचा दिला अवधी

पाली हिल भागात कंगनाच्या कार्यालयापासून काही अंतरावर असलेल्या मनीष मल्होत्राच्या बंगल्यातील बांधकामांवर महापालिकेने आक्षेप नोंदवला आहे. मनीषला ‘कारणे दाखवा’ नोटिशीला उत्तर देण्यासाठी सात दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. त्याच्या बंगल्याबाहेर पोलिस बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे. बंगल्यातील व्यवस्थापन कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर विभाजन, केबिनची उभारणी, मूळ रचनेत अनधिकृत फेरफार किंवा शेड तयार करुन बांधकामात अनधिकृत भर घालणे, अशा बदलांकडे महापालिकेने लक्ष वेधले आहे.

बीएमसीकडून घेतली नाही परवानगी

एमएमसी कायद्याच्या कलम 342 आणि 5 345 अन्वये मनीष मल्होत्राला नोटीस पाठवण्यात आली आहे. व्यावसायिक वापरासाठी बीएमसीची परवानगी आवश्यक असते आणि त्यासाठी काही रक्कम भरणेही अनिवार्य असते, परंतु मनीष मल्होत्राने बीएमसीकडून कोणती परवानगी घेतली नाही किंवा कुठलेही पैसे जमा केले नाहीत, असे सांगितले जाते.

कंगना रनौतच्या मुंबईतील कार्यालयावर काल महापालिकेचा हातोडा पडला. कंगनाच्या याचिकेनंतर हायकोर्टाने पाडकामाला स्थगिती देण्याचे आदेश दिले. तसेच पालिकेला आपले म्हणणे मांडण्याच्या सूचना दिल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...