आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

प्रभुकुंजवर कोरोनाचे संकट:कोरोना व्हायरसमुळे लता मंगेशकर यांची प्रभुकुंज इमारत सील, कुटुंबीय म्हणाले - लता दीदी सुरक्षित

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कुटुंबीय म्हणाले- लताजी सुरक्षित आहेत, अफवांकडे दुर्लक्ष करा
  • मुंबई महापालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून ही कार्यवाही केली.

गानसम्राज्ञी लता मंगेशकर वास्तव्यास असलेल्या पेडर रोडवरील प्रभुकुंज इमारत सील करण्यात आली आहे. दक्षिण मुंबईतील चांबला हिल परिसरात लता दीदी राहतात. बातम्यांनुसार, त्यांच्या इमारतीत कोरोनाचे पाच रुग्ण आढळून आल्याने सुरक्षेसाठी ही इमारत महापालिकेने सील केली आहे. या इमारतीत लता मंगेशकर यांच्यासह त्यांचे बंधू हृदयनाथ आणि बहीण उषा मंगेशकर राहतात.

  • कुटुंबीय म्हणाले- लताजी सुरक्षित आहेत, अफवांकडे दुर्लक्ष करा

लता मंगेशकर यांच्या कुटुंबीयांनी याबाबत निवेदन जारी केले आहे. ज्यामध्ये लिहिले आहे - प्रभुकुंज सोसायटी बंद करण्यात आली आहे का? याची विचारणा करणारे फोन आम्हाला संध्याकाळपासून येत आहेत. बिल्डिंगची सोसायटी आणि महापालिकेने इमारत सील करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोणातून ही इमारत सील करण्यात आली आहे. कोरोना संसर्गापासून सतर्क राहण्याची आवश्यकता आहे, असे या निवेदनात म्हटले आहे.

कृपया आमच्या कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याबद्दल कोणत्याही अफवांकडे लक्ष देऊ नका. आम्ही अत्यंत काळजी घेत आहोत आणि सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सहकार्य करीत आहोत. देवाच्या कृपेने आणि तुम्हा सर्वांच्या शुभेच्छांमुळे आम्ही सर्व सुरक्षित आहोत. कोरोनाचा प्रकोप पाहता आमच्या सोसायटीत साधेपणानेच गणेशोत्सव साजरा केला जात आहे, असेही मंगेशकर कुटुंबीयांनी सांगितले आहे.