आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भास्कर इंटरव्ह्यू:बॉबी देओल म्हणाला- आता छोट्या शहरांच्या कथांवर चित्रपट बनत आहेत, ऑनर किलिंगवर आधारित आहे ‘लव्ह हॉस्टल’

अमित कर्ण6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ‘लव्ह हॉस्टल’मध्ये सिरियल किलर बनलेला बॉबी देओल शिकला हरियाणवी
  • यानंतर ‘अ‍ॅनिमल’ आणि ‘अपने 2’वर काम सुरू करणार बॉबी

इंडस्ट्रीत 26 वर्षे पूर्ण करणारा बॉबी देओल ‘रेस 3’ नंतर डिजिटल माध्यमांत काही ना काही प्रयोग करत आहे. त्याच्या ‘क्लास ऑफ 83’ आणि ‘आश्रम’ चित्रपटाची बरीच चर्चा आहेत. आता त्याचा ‘लव्ह हॉस्टल’ नावाचा चित्रपट येत आहे. या मुलाखतीत बॉबीने करिअर, पात्र आणि कुटुंबाविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या...

  • ‘लव्ह हॉस्टल’मध्ये तुझ्या पात्राचे नाव दांगर आहे, असे नाव का ठेवले ?

या पात्राच्या चेहऱ्यावर डाग आहेत, त्यामुळे त्याचे नाव दांगर आहे. डोळ्याने बोलतो, गोळ्यांची भाषा कळते. चित्रपटाचे जोनर तसेच आहे. लोकेशनदेखील देशी आहे. जैसा देस वैसा भेसप्रमाणे लोक ज्या परिसरात राहतात, जसे बोलतात, वागतात तसेच तोही बोलतो. चित्रपटात शिव्यादेखील आहेत.

  • दांगरच्या पात्रासाठी विशेष तयारी केली का ?

दांगर जसा दिसतो तशी तयारी करावी लागली. नाही तर प्रेक्षकांना ते पात्र आवडले नसते. त्यासाठी तयारी करावी लागली. जुन्या कलाकारांना उर्दू आणि स्थानिक भाषेवर प्रभुत्व होते. मी मुंबईत शिकलो त्यामुळे मला दांगरच्या बोलीभाषेवर काम करावे लागले. आता काळ बदलला आहे. आता छोट्या शहरांच्या कहाण्या येत आहेत. त्यावर अाधी काम झाले नव्हते. त्यामुळेच मला यासाठी हरियाणवी शिकावी लागली. हा चित्रपट मुख्यत: ऑनर किलिंगवर आधारित आहे.

‘लव्ह हॉस्टल’मधील बॉबीचा लूक
‘लव्ह हॉस्टल’मधील बॉबीचा लूक
  • ‘लव्ह हॉस्टल’च्या व्यतिरिक्त आणखी कोणते प्रोजेक्ट आहेत ?

मी पहिल्यांदाच नकारात्मक चित्रपट केला, त्यामुळे आता चांगला चित्रपट करायचा आहे. तो करून स्वत:ला आनंद होईल अशा कथेच्या शोधात आहे. जो चित्रपट पाहून कुटंुब आनंदी होईल. त्याचे पात्र एकदम साधे असेल. खरं तर ‘अ‍ॅनिमल’देखील करताेय. यात रणबीर कपूरसोबत काम करत अाहे. ‘अपने 2’ चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम सुरू आहे. ‘यमला पगला...’ चित्रपटाच्या पुढच्या भागाविषयी प्रश्न विचारले जातात, मात्र तशी स्क्रिप्टही मिळायला हवी. खरं तर मागील पार्ट चांगला झाला नव्हता, मात्र कौटुंबिक प्रेक्षकांसाठी आम्हाला काही तरी चांगल घेऊन यायचं.

  • एखाद्या चित्रपटात तुझा मोठा अपघात झाला आहे का ?

स्कॉटलंडमध्ये लेक डिस्ट्रिक्टमध्ये ‘बरसात’ चित्रपटाचे शूटिंग झाली होती. माझे इंट्रोक्शन भव्य बनवण्याच्या तयारीत भाऊ (सनी देओल) होते. मात्र दुसऱ्या शाॅटदरम्यान माझ्या उजव्या पायाला मार लागला. अजूनही पायात रॉड आहे. त्या वेळी एक वर्षे पाय ठीक झाला नव्हता. दरम्यान, ‘गुप्त’चे शूटिंग सुरू होते. त्यामुळे चांगले नृत्यही करू शकत नव्हतो. माझ्या हाताच्या हालचाली जास्त होत्या. तेव्हा बॉबी असेच डान्स करतो का? असे लाेक म्हणू लागले होते. नंतर पायाचे ऑपरेशन झाले.

  • आर्यमान आणि धरम या मुलांसाठी एखाद्या टॅलेंट एजन्सीला बोलला का?

सध्या तर दोन्ही शिकत आहेत. त्यांनी अजून कोणतीही टॅलेंट एजन्सी जॉइन केली नाही. ते आधी शिक्षण पूर्ण करतील. त्यानंतर त्यांना कशात करिअर करायचे हे त्यांच्यावर आहे. मुलांनी आधी शिक्षण पूर्ण करावे, अशी माझी इच्छा आहे. कारण आमची इंडस्ट्री खूपच अनसर्टेन आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कोणत्या व्यवसायात जायचे ते ठरवता येते.

बातम्या आणखी आहेत...