आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भास्कर इंटरव्ह्यू:मला काम मिळणे बंद झाले तेव्हा मी कामासाठी लोकांचे दरवाजे ठोठावले, आज जिथे आहे तिथे मी आनंदी आहे - बॉबी देओल

अंकिता तिवारीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मी माझ्या इंस्टाग्रामवर किंवा इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील कमेंट कधीही वाचत नाही.

आज 27 जानेवारी रोजी बॉलिवूड अभिनेता बॉबी देओलचा वाढदिवस आहे. 2020 हे वर्ष बॉबीच्या कारकीर्दीसाठी खास होते. यावर्षी त्याचे 'क्लास ऑफ' 83 'आणि' आश्रम 'सारखे प्रोजेक्ट रिलीज झाले, यात त्याच्या कामाचे कौतुक झाले. आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिव्य मराठीसोबतच्या खास बातचीतदरम्यान बॉबीने त्यांच्या जीवनाशी संबंधित काही खास गोष्टी शेअर केल्या -

  • या इंडस्ट्रीतील न्यूकमरसाठी एक टीप?

बॉबी- मी बर्‍याचदा अशा लोकांना भेटतो जे या इंडस्ट्रीत नवीन आहेत, तरुण कौशल्य आहे. मला फक्त असे म्हणायचे आहे की अडचणी येतील, परंतु आपण खूप मजबूत असले पाहिजे. संघर्ष हा प्रत्येक अभिनेत्याच्या जीवनाचा एक भाग असतो परंतु संघर्षासमोर कधीही गुडघे टेकू नका. आपल्या कामाशी प्रामाणिक रहा आणि फक्त कठोर परिश्रम करा. केवळ नशिबावर अवलंबून राहू नका कारण कठोर परिश्रम हीच मुख्य गोष्ट आहे. मीसुद्धा माझ्या कारकिर्दीत खूप संघर्ष केला आहे, चढउतार पाहिले आहेत. असा एक काळ होता जेव्हा मी माझे करिअर सोडले होते, परंतु माझा अनुभव असे शिकवते की आपण कधीही हार मानू नये.

  • सुशांतच्या निधनानंतर इंडस्ट्रीत इनसाइडर आणि आऊटसाइडर अशी डिबेट सुरु झाली आहे, याविषयी काय सांगशील?

बॉबी- "माझे वडील धर्मेंद्र हे आउटसाइट होते. त्यांना अभिनय करायचा होता आणि ते घरातून पळून मुंबईत आले होते. अनेक वर्ष संघर्ष करुन त्यांनी यशोशिखर गाठले. होय, मी ही गोष्ट मान्य करतो, की मुलांना आईवडिलांच्या व्यवसायात प्रवेश करण्यासाठी पहिले पाऊल हे सोपे असते. खरं तर पहिला चित्रपट मिळवणे कठीण नाही, परंतु त्यानंतर आपल्या अभिनयाच्या जोरावर तुम्हाला पुढे जावे लागते. मग तुम्ही कितीही मोठ्या कुटुंबातील का असेना ते तुमचे करिअर पुढे नेऊ शकत नाही. आपल्याला ज्या संधी मिळतात त्यावर स्वतःला सिद्ध करणे हे कलाकाराचे काम आहे.

मलादेखील माझा पहिला चित्रपट वडिलांनी दिला आणि मला इंडस्ट्रीत लाँच केले, पण त्यानंतर मला मिळालेले चित्रपट हे माझ्या बळावर मिळवले होते. म्हणूनच परिश्रम करणे ही यशाची गुरुकिल्ली आहे. मी तर एक इनसाइड आहे, मग माझ्या करिअरमध्ये अशी वाईट वेळ कशी आली. जेव्हा मला चित्रपटात काम मिळणे बंद झाले होते, तेव्हा मी माघार घेतली. मात्र नंतर मी पुन्हा जोमाने कामाला लागलो. मी कामासाठी लोकांचे दरवाजे ठोठावले. आणि आज मी जिथे आहे तिथे आनंदी आहे.

  • बॉलिवूड सेलिब्रिटींना सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. आपणास असे वाटते की ते सोशल हरॅसमेंटला बळी पडत आहेत?

बॉबी- मी माझ्या इंस्टाग्रामवर किंवा इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील कमेंट कधीही वाचत नाही, कारण प्रत्येक माणसाचे स्वतःचे मत असते. त्यांची स्वतःची विचारसरणी आहे. प्रत्येकजण तुमचा तिरस्कार करणार नाही, परंतु प्रत्येक माणूस तुमच्यावर प्रेमही करणार नाही. मला लोकांकडून अधिक प्रेम आणि तिरस्कार कमी मिळाल्याबद्दल मी कृतज्ञ आहे. लोक माझ्यावर विश्वास ठेवतात हेच माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. सौंदर्य हे पाहणा-यांच्या नजरेत आहे, असा माझा विश्वास आहे."

  • अभिनयातून ब्रेक घेतल्यानंतर परत येण्याचा निर्णय कसा घेतला? आपल्या कारकिर्दीतील कोणता चित्रपट टर्निंग पॉईंट आहे?

बॉबी- मला कायमच अभिनयासाठी आसुसलेला असतो. मी वेगवेगळी पात्रं करण्याचा प्रयत्न करतो, पण माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉईंट रेस 3 हा चित्रपट आहे. मला माहित आहे की सलमान खान एक खूप मोठा स्टार आहे आणि जर मी त्याच्या चित्रपटात काम केले तर या देशातील लोक मला ओळखतील, माझी भूमिका ओळखतील आणि बॉबी देओल नावाचा अभिनेता आहे हे त्यांना समजेल, असे मला वाटले. जर पाहिले तर, आजच्या पिढीने बर्‍याच काळापासून माझे काम पाहिले नाही. त्यानंतर मला अक्षय कुमार सोबत हाऊसफुल हा चित्रपट मिळाला. रेस 3 नंतर मला बर्‍याच चांगल्या भूमिकांच्या ऑफर येऊ लागल्या.

  • तू कायमच इंटीमेट सीन करणे टाळतो, मात्र आश्रम या वेब सीरिजमध्ये असा सीन देणे किती कठीण होते?

बॉबी- मी बर्‍याचदा असे सीन देण्यास टाळाटाळ करतो पण आश्रममध्ये ती माझ्या व्यक्तिरेखेची मागणी होती, म्हणूनच मी हे साकारले. त्यावेळी मी खूप नर्व्हस आणि अनकम्फर्टेबल होतो. पण भूमिकेला न्याय देणे महत्त्वाचे होते.