आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशांत आत्महत्या प्रकरण:बॉडीगार्डचा खुलासा, 'आजारी सुशांत नेहमीच झोपून राहायचा, त्याच्या पैशांवर घरी पार्टी द्यायची रिया चक्रवर्ती'

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • या प्रकरणाची गंभीर चौकशी व्हावी आणि सुशांतला न्याय मिळावा अशी इच्छा सुशांतच्या या बॉडीगार्डने व्यक्त केली आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या आत्महत्या प्रकरणात रिया चक्रवर्तीविरोधात गुन्हा दाखल झाल्यापासून दररोज नवीन खुलासे होत आहेत. गेल्या आठवड्यात सुशांतचे वडील के.के. सिंह यांनी बिहारमध्ये रिया चक्रवर्तीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि फसवणूकीचा गुन्हा दाखल केला होता. बिहार पोलिस मुंबईत या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आले असून बर्‍याच लोकांची चौकशी केली जात आहे. दरम्यान, सुशांतच्या बॉडीगार्डने एका मुलाखतीत अनेक खुलासे केले आहेत.

  • सुशांत आजारी राहायचा, रिया पार्टी करायची

बॉडीगार्डने रिपब्लिक टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, सुशांत बहुतेक वेळा बेडरुममध्ये झोपून असायचा. बॉडीगार्डने सांगितले की, सुशांतची लिव्ह-इन पार्टनर रिया चक्रवर्ती सुशांतच्या पैशांवर घरी पार्टी करायची. रिया पार्टीत बिझी राहायची तर सुशांत बेडरूममध्ये झोपलेला असायचा. रियाशिवाय तिचे वडील आणि भाऊ हेदेखील सुशांतच्या घरी आयोजित पार्टीत भाग घ्यायचे.

बॉडीगार्डने पुढे सांगितले की, सुशांतचे कुटुंब गेल्या काही महिन्यांपासून त्याच्या संपर्कात नव्हते, किंवा कुटुंबातील कोणीही सुशांतला भेटायला येऊ शकला नव्हता.

  • सुशांतची जीवनशैली बदलली होती

बॉडीगार्ड पुढे म्हणाला, 'रियाच्या आगमनानंतर गेल्या एका वर्षात सुशांतची जीवनशैली खूप बदलली होती. औषधे घेतल्यानंतर तो संपूर्ण वेळ झोपलेला असायचा, मला त्याच्या औषधांच्या ओव्हरडोजविषयी माहित नाही, असेही त्याने सांगितले. मागील वर्षी युरोप ट्रिपहून परत आल्यानंतर सुशांत सारखा आजारी राहू लागला होता. तो कायम अंथरुणाला खिळून राहायचा. पण तसे यापूर्वी नव्हते. पूर्वी तो खूप अॅक्टिव्ह असायचा. स्वीमिंग, रनिंग आणि जिमिंग हे त्याच्या जीवनाचा एक भाग होता, असा खुलासा बॉडीगार्डने केला आहे.

मुलाखतीत बॉडीगार्डने आणखी एक खुलासा करताना सांगितले की, रिया सुशांतच्या आयुष्यात आल्यानंतर तिने त्याचा संपूर्ण स्टाफ बदलला होता. या प्रकरणाची गंभीर चौकशी व्हावी आणि सुशांतला न्याय मिळावा अशी इच्छा सुशांतच्या या बॉडीगार्डने व्यक्त केली आहे.

शुक्रवारच्या घटनाक्रमावर एक नजर

  • सुशांतचा ट्रेनर समी अहमद यांची एक मुलाखत समोर आलीय. यामध्ये समीने दावा केला आहे की, सुशांत मागच्या वर्षी डिसेंबरपासून काही वेगळ्या पद्धतीची औषध घेत होता. यामुळे त्याच्या अनेक शारीरिक तक्रारी सुरू झाल्या होत्या आणि त्याचे पायही थरथरायचे. त्याने रियाला डेट करणं सुरू केलं तेव्हापासून सुशांतच्या वागण्यात खूप बदल झाला होता.
  • सुशांतचा मित्र महेश शेट्टीने बिहारच्या पोलिसांना दिलेल्या जबाबामध्ये मोठे खुलासे केले. रिया कुटुंबीयांसोबत बोलू द्यायची नाही, फोन चेक करायची.
  • दुसरीकडे, सुशांतचा रूममेट सिद्धार्थ पिठानीने गंभीर आरोप केले. सुशांतचे कुटुंबीय रियाच्या विरोधात बोलण्यासाठी, चुकीचा जबाब देण्यासाठी दबाव टाकतं आहेत, असे तो म्हणाला.
  • सुशांतच्या सीएने त्याच्या वडिलांच्या आरोपाचे खंडन केले आहे. बँक डिटेल जाहीर करत त्यांनी सुशांतच्या खात्यातून रियाला कोणतीही रक्कम ट्रान्सफर केलेली नाही, असे सांगितले.
  • सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमध्ये रिया म्हणाली की सुशांत डिप्रेशनमध्ये होता.
बातम्या आणखी आहेत...