आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अभिनेत्याच्या मृत्यूप्रकरणी ट्विस्ट:मुंबई पोलिसांनी अक्षत उत्कर्षच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल केला, गर्लफ्रेंडने टॉवेलने गळफास घेतल्याचे म्हटले होते

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अभिनेता अक्षत उत्कर्षचा 27 सप्टेंबर रोजी मृत्यू झाला होता. सुरुवातीपासूनच त्याच्या मृत्यूविषयी कुटुंबीयांनी शंका उपस्थित केली होती.

अभिनेता अक्षत उत्कर्षच्या मृत्यू प्रकरणात गुरुवारी मोठा ट्विस्ट आला. या प्रकरणी अंबोली पोलिस ठाण्यात 302 (खुनाचा) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणात आयपीसीचा कलम 34 देखील लावला आहे, ज्यावरून हे सिद्ध होते की अक्षतच्या हत्येमध्ये बरेच लोक सामील होते. यापूर्वी 27 सप्टेंबर रोजी पोलिसांनी याप्रकरणी अपघाती मृत्यू (एडीआर) ची नोंद केली होती.

मुळचा मुजफ्फरपुरातील सिकंदरपूरचा रहिवासी असलेल्या अक्षतच्या कुटुंबीयांनी सुरुवातीपासूनच अक्षतची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. त्यांचा मुंबई पोलिसांवर सहकार्य केले नसल्याचा आरोप होता. पोलिसांना या प्रकरणाची चौकशी करण्याची इच्छा नाही म्हणून त्यांनी अक्षतच्या मृत्यूला आत्महत्या म्हणून जाहिर केले असा आरोप त्यांनी केला होता.

अभिनेत्रीसोबत लिव्ह इनमध्ये राहात होता अक्षत
अक्षत चित्रपटात काम करण्यासाठी बिहारमधून मुंबईत आला होता. तो आपली प्रेयसी स्नेहा चौहानसोबत मुंबईतील अंधेरी येथे लिव्ह इनमध्ये राहात होता. त्याची प्रेयसी देखील एक अभिनेत्री आहे. कुटुंबीयांनी सांगितल्यानुसार, ते अक्षतला फोन करत होते, मात्र त्याच्याकडून कोणतेही उत्तर आले नव्हते. नंतर स्नेहाने फोन करुन त्यांना अक्षतच्या आत्महत्येची माहिती दिली होती. अक्षतचे वडील विजयंत सिंह यांच्या मते, त्यांचा मुलगा आत्महत्या करु शकत नाही.

मृत्यूच्या काही तासांपूर्वी अक्षतचे वडिलांशी झाले होते बोलणे

अक्षतचे मामा रंजू सिंह यांनी सांगितल्यानुसार, अक्षतने 27 सप्टेंबरच्या रात्री पावणे नऊच्या सुमारास वडील विजयंत किशोर यांच्याशी फोनवर बातचीत केली होती. त्यानंतर रात्री 10 ते 11 च्या सुमारास त्याच्या मृत्यूची बातमी कळली. स्नेहा चौहानने फोन करुन कुटुंबीयांना ही बातमी दिली.

जाड टॉवेलने गळफास कसा घेता येईल?, कुटुंबीयांचा प्रश्न
बातमी कळताच अक्षतचे कुटुंबीय 28 सप्टेंबर रोजी मुंबईत दाखल झाले होते. कुटुंबीयांच्या माहितीनुसार, गळफास घेतल्यानंतर अक्षतला मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात नेण्यात आले होते. तेथे त्याची गंभीर अवस्था बघून त्याला कूपर रुग्णालयात पाठवण्यात आले. कूपर हॉस्पिटलमध्ये अक्षतचा मृत्यू झाला. सहा फूट उंचीचा अक्षय एका जाड टॉवेलने गळफास कसा घेऊ शकतो? असा प्रश्न त्याच्या कुटुंबीयांनी उपस्थित केला होता. त्याची हत्या झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

खासगी कंपनीत काम करायचा अक्षत
अक्षत दोन वर्षांपासून मुंबईतील अंधेरी वेस्टमध्ये राहात होता. त्याने एमबीए केले होते आणि सोबतच मुंबईतील एका खासगी कंपनीत नोकरी करत होता. त्यासह तो अभिनयातही अॅक्टिव होता. आगामी लिट्टी चोखा या चित्रपटात त्याने काम केले होते.

पोलिसांनी आत्महत्या असल्याचे म्हटले होते
27 सप्टेंबर रोजी मुंबईत पोलिसांनी अक्षतने आत्महत्या केल्याचे म्हटले होते. तो काम मिळत नसल्याने निराश झाला होता. असे त्यांनी सांगितले होते.

मृत्यूपूर्वी विचित्र वागत होता अक्षत - गर्लफ्रेंड
त्याच्या प्रेयसीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, 'अक्षत रविवारी संध्याकाळपासून विचित्र वागत होता. रात्री आम्ही दोघांनी एकत्र जेवण केले आणि तासभर गप्पा मारल्या. जेव्हा मी रात्री साडे अकराच्या सुमारास उठली तेव्हा अक्षत हॉलमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. मी तातडीने पोलिसांना 100 नंबरवर सुचना दिली. अंबोली पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.'

बातम्या आणखी आहेत...