आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अक्षय कुमार बर्थडे स्पेशल:लहानपणी बाल अत्याचाराला पडला हाेता बळी, विमान चुकल्याचा झाला होता फायदा; वाचा 'खिलाडी'च्या या खास गोष्टी

मुंबई2 वर्षांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • 90 च्या दशकात सात अॅक्शन चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर कॉमेडीच्या मैदानात उतरला होता ‘खिलाडी’ अक्षय कुमार
 • 29 वर्षांची कारकीर्द, 113 चित्रपटांत केले काम, 52 चित्रपट ठरले यशस्वी

बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमारचा आज वाढदिवस. अक्षयचा जन्म 9 सप्टेंबर 1967 रोजी अमृतरसमध्ये एका पंजाबी कुटुंबामध्ये झाला. दिल्लीत त्याचे बालपण गेले आणि बँकाॅकमधून त्याने मार्शल आर्ट शिकले, तेथेच नोकरी केली. वाढदिवसानिमित्त जाणून घेऊ त्याच्या जीवनातील काही पैलू...

अक्षयचे वडील हरिओम भाटिया लष्करात अधिकारी होते. त्याच्या आईचे नाव अरुणा भाटिया आहे. अक्षय कुमारचे बालपण दिल्लीच्या चांदणी चौकात गेले. काही काळानंतर ते मुुंबईला शिफ्ट झाले. त्यानंतर त्याने मुुंबईतच शिक्षण घेतले.

 • लहानपणी बाल अत्याचाराला बळी पडला हाेता

नुकतेच एका मुलाखतीत अक्षयने सांगितले होते, बालपणातच त्याला एका लिफ्टमनने चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला होता. तेव्हा तो लहान होता पण निडर होता, म्हणून त्याने वडिलांना सर्व काही सांगितले. त्यानंतर त्याच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. नंतर असे समजले, लिफ्टमनने यापूर्वीही असेच भयंकर गुन्हे केले होते, त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.

 • बँकॉकला जाण्यासाठी सोडले महाविद्यालयीन शिक्षण

त्यावेळी अक्षय गुरुनानक खालसा महाविद्यालयात शिकत होता. त्याला सुरुवातीपासूनच मार्शल आर्टमध्ये रस होता आणि बँकॉकमध्ये जाऊन मार्शल आर्टचे योग्य प्रशिक्षण घ्यायचे होते. म्हणून त्याने महाविद्यालयीन शिक्षण अर्धवटच सोडले. अक्षयने तायक्वांदोमध्ये ब्लॅक बेल्ट मिळविला आहे. अक्षय कुमार बँकॉकमध्ये मार्शल आर्ट शिकण्यासाठी गेला तेव्हा त्याला आपला खर्च भागवण्यासाठी शेफ आणि वेटर म्हणून एका रेस्टॉरंटमध्ये काम करावे लागले. भारतात आल्यानंतर त्याने कोलकात्यामध्ये एका ट्रॅव्हल एजन्सीमध्येही काम केले. याशिवाय तो नवी दिल्लीहून दागिने विकत घ्यायचा आणि मुंबईत विकायचा. यासोबतच संध्याकाळी मुलांना मार्शल आर्ट्स शिकवायचा.

 • विमान चुकल्याचा फायदा झाला

एका जाहिरातीच्या शूटिंगसाठी बंगळुरूला जाणार होता, मात्र ऐनवेळी त्याच्याकडून विमान चुकले. मात्र दुसरीकडे विमान सुटल्याचा त्याला फायदादेखील झाला. कारण त्याच दिवशी प्रमोद चक्रवर्तीने त्याच दिवशी दीदार चित्रपटासाठी साइन केले.

 • ‘खिलाडी’तून मिळाली ओळख

अक्षय दिसायला चांगला आहे, तो अॅक्शन चांगली करतो, मात्र अभिनय त्याला जमत नाही, असे सुरुवातीला त्याच्याविषयी म्हटले जायचे. मात्र 1992 मध्ये त्याला अब्बास मस्तानचा खिलाडी चित्रपट मिळाला आणि या चित्रपटाने त्याचे भाग्य पालटले. या चित्रपटाने बाॅक्स ऑफिसवर धूम केली. यानंतर या चित्रपटाचे अनेक व्हर्जन आले. यात ‘खिलाडियों का खिलाडी’, ‘मैं खिलाडी तू अनाडी’. यानंतर ‘मोहरा’ चित्रपट आला तो बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला. यानंतर अक्षयची इमेज एका अॅक्शन हीरोची झाली. मात्र याच काळात यश चोप्राने त्याला ‘दिल तो पागल है’ मध्ये घेतले आणि रोमांटिक भूमिकेची संधी दिली. यानंतर अक्षयने कॉमेडीच्या जगतात पाऊल ठेवले. त्याने ‘हेराफेरी’ केला. सोबतच धडकन चित्रपटही केला. या चित्रपटानंतर त्याची एक भावनिक इमेजही तयार झाली. ती प्रेक्षकाना अपील झाली

 • वडिलांच्या नावाने उघडली कंपनी

अक्षय कुमारने आपल्या वडिलांच्या नावाने एक प्राॅडक्शन कंपनी उघडली आहे. यात त्याने रुस्तम, हॉलिडे, पॅडमन, एअरलिफ्ट, खट्टा मीठा, खिलाडी 786, ओ माय गॉड, अॅक्शन रिप्ले, जोकर, पटियाला हाउस, तीस मार खान, सिंग इज़ किंग सारख्या चित्रपटाची निर्मिती केली.

 • देशासाठी नेहमी उभा राहताे

देशात जेव्हा-जेव्हा नैसर्गिक आपत्ती आली तेव्हा-तेव्हा पंतप्रधान मदतनिधी किंवा मुख्यमंत्री मदत निधीमध्ये हातभार लावला. कोरोनाच्या या कठीण काळातही अक्षयने 2 कोटींची मदत दिली.

 • अनेक अभिनेत्रींसोबत अफेअरची होती चर्चा

कारकीर्दीत त्याचे अनेक अभिनेत्रींसोबत नाव जोडले गेले. यात शिल्पा शेट्टी, रवीना टंडन, प्रियंका चोप्रा यांच्या नावाचा समावेश आहे. यासोबतच अक्षयचे नाव त्याच्यापेक्षा 12 वर्षांनी मोठी रेखासोबतही जोडले गेले. दोघांच्या अफेअरच्या बातम्याही आल्या.

यश आणि पुरस्कार

 • 2002मध्ये ‘अजनबी’ साठी उत्कृष्ट खलनायकाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळवला.
 • 2006 ‘गरम मसाला’ साठी उत्कृष्ट विनोदवीराचा फिल्मफेअर पुरस्कार.
 • 2009मध्ये पद्मश्री देऊन गौरव.
 • 2013 मध्ये अक्षय बॉलिवूडचा पहिला अभिनेता बनला ज्याच्या चित्रपटातून 20 कोटींची कमाई झाली. तर 2016 मध्ये ही कमाई 30 कोटीची झाली.
 • 2017 मध्ये ‘रुस्तम’साठी उत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
 • 2019 मध्ये पॅडमनसाठी सामाजिक विषयावरील उत्कृष्ट चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार

बातम्या आणखी आहेत...