आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलाखत:अली फजल म्हणतो - 'लॉकडाऊनचा काळ आम्हाला स्वत:वर विश्वास ठेवणे आणि आनंदी राहण्याची कला शिकवतो'

उमेश कुमार उपाध्याय. मुंबई3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लहानपणापासूनच मिळाले आहे लॉकडाऊनसारख्या वातावरणात राहण्याचे प्रशिक्षण

अली फझलसारख्या कलाकाराने पूर्वीपासून ‘हाऊस अरेस्ट’चित्रपटामुळे लॉकडाऊनसारखे वातावरण फेस केले आहे. तो त्याचा वेळ कसा घालवतोय आणि चित्रपटासाठी केलेली तयारी कशी फायदेशीर ठरतेय याबाबत फझलने या मुलाखतीत सांगितले...

अली सांगतो...‘माझे जे पण प्रोजेक्ट असते, गरजेचे नाही की, ते ‘हाऊस अरेस्ट’ असावे. बाकी दुसऱ्या भूमिकेच्या तयारीसाठी मी आयसोलेशनमध्ये जातो. मी जरा जगापासून लांबच राहतो. सेल्फ आयसोलेशन एक ऐच्छिक आयसोलेशन असते. ‘हाउस अरेस्ट’च्या वेळी माहीत होते की हे ऐच्छिक आयसोलेशन आहे, परंतु आज जे वातावरण आहे ते खूप वेगळे आहे. यात तुम्हाला हळूहळू एकटेपणा जाणवायला लागतो. आज आपण छोट्या छोट्या गोष्टी जसे बाहेर कॉफी प्यायला जाणे, मित्रांसोबत बसणे मिस करतोय. ‘हाउस अरेस्ट’मधील माझे पात्र घरात बसून व्हिडिओ गेम खेळायचा, घराची साफ सफाई करायचा, जेवण बनवायचा. ही कल्पना मला माझ्या बंगळुरूमध्ये राहणाऱ्या मित्रामुळे सुचली होती. तेथे लोक आयसोलेशनशिवाय महिनोनमहिने एकटेच राहायचे. तेथे प्रत्येक गोष्टीसाठी एक अ‍ॅप आहे. चहा प्यायचा असेल तर अ‍ॅपचा वापर करा, तुमच्या घरी चहा घेऊन एक माणूस येईल. मी बऱ्याच कॅरेक्टर टिप्स त्याच्याकडूनच घेतल्या आहेत, परंतु त्यावेळी माहीत नव्हते की, या सर्व गोष्टींची गरज जाणवेल.

  • लहानपणापासूनच मिळाले आहे लॉकडाऊनसारख्या वातावरणात राहण्याचे प्रशिक्षण

लहानपण बोर्डिंग स्कूलमध्ये गेले, तेथेच लॉकडाऊनसारख्या वातावरणात राहण्याचे प्रशिक्षण मिळाले. त्यानंतर कॉलेजसाठी मुंबईत एकटा आलो होतो तर स्वत:च स्वयंपाक करायचो. एकदा मी दिल्लीमध्ये 15 दिवस भाड्याने फ्लॅट घेऊन राहण्याचा प्रयत्न केला होता. मला आठवते की, 15 दिवस एकटे राहिल्याने काय मानसिक परिणाम होतो, हे मला पाहायचे होते. खरं सांगू, ते 15 दिवस खूप वाईट गेलेत. मी सहाव्या दिवशीच घराबाहेर पडलो. बाहेर हॉटेलमध्ये जाऊन खूप जेवलो. पुढच्या 9 दिवसांत मी खूप गोष्टी शिकलो.

तुम्ही टीव्ही पाहू शकता, इंटरनेटवर काम करू शकता, पुस्तके वाचू शकता, हे आतील लढाईसाठी खूप गरजेचे आहे. बाहेरची लढाई तुम्ही कितीही लढा, परंतु खरी लढाई तर आतली आहे. जर ती तुमच्यावर हावी झाली तर तुम्ही सहन करू शकत नाही. असामान्य परिस्थितीत तुम्ही कसे सामान्य राहता, त्याची ही परीक्षा आहे, ही संयमाची परीक्षा आहे. आपली अशी अवस्था झाली आहे की, बाहेरचे वातावरण आणि लोकांचा आमच्यावर इतका परिणाम झाला आहे की, आम्ही सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टींवर अवलंबून असतो. ही लॉकडाऊनची वेळ आम्हाला स्वत:वर थोडा विश्वास करायला शिकवते. एकटे राहण्यात आनंद शोधा. लॉकडाऊन संपल्यानंतर सर्व गोष्टी सुरू होतील, परंतु माणसाला स्वत:ची सोबत करता यायला पाहिजे.

  • टीव्ही बंद करून पुन्हा पेंटिंग बनवण्यास केली सुरुवात

सध्या खूप गोष्टी करतोय. काही स्क्रिप्ट लिहितोय. खूप वर्षांपासून जी पुस्तके वाचली नाहीत ती वाचतोय. नेटफ्लिक्स अमेझॉनवर येणाऱ्या बऱ्याच गोष्टी आपण पाहतो, पण मी विचार केला की, टीव्ही बंद करून टाकावा. मी खूप वर्षांनंतर पेंटिंगला सुरुवात केली आहे. मी ‘अ चॅलेंज फॉर द अॅक्टर’, जॉर्ज लुइस बोर्जेस यांचे पुस्तक ‘कलेक्टेड फिक्शन्स’ आणि नोम चॉमस्की यांची पुस्तके वाचतोय.

  • घरातील कामे करता करता वेळ निघून जातो...

मला पहाटे 4.30-5.00 वाजता उठण्याची सवय आहे. प्राणायाम आणि योगा करतो. सध्या मेडिटेशनदेखील करतोय. सकाळी नाष्टा करतो आणि 12 वाजेपर्यंत जेवण करतो. आता तर मी स्वत:च जेवण बनवतोय. त्यातील घराची स्वच्छता करतो यातच वेळ निघून जातो. सायंकाळी काही मित्रांसोबत गप्पा मारतो. याशिवाय कधी कधी रात्री चित्रपटदेखील पाहतो.

बातम्या आणखी आहेत...