आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
प्रतिभावंत अभिनेते बोमन इराणी 2 डिसेंबर रोजी आपला 61 वा वाढदिवस साजरा करत आहेत. ते पुण्यात आपल्या बहिणींसोबत हा खास दिवस साजरा करणार आहेत. त्यानिमित्त बोमन यांच्याशी झालेला हा खास संवाद...
खरं तर, सध्याच्या काळात सुरक्षा महत्त्वाची आहे. स्वत:ची आणि कुटुंबाचीदेखील. माझ्या तीन बहिणी पुण्यात राहतात. यंदा त्यांच्यासोबत वाढदिवस साजरा करणार आहे. तिघींचेही घर जवळजवळच आहे. कुटुंबासोबत वाढदिवस साजरा करण्याचा आनंद वेगळाच असतो. माझ्या मते ही चांगली आयडिया आहे. सार्वजनिक वाहतुकीचा धोका कमी करत, स्वत:च्या गाडीनेच तेथे जाणार आहे. एक किंवा दोन मित्रांना बोलवणार आहोत. नाही तर दरवर्षी या खास दिवशी आम्ही एक खूप मोठा गट तयार करायचो, जे या वेळेस शक्य नाही. माझे मित्र कुटुंबातील काही सदस्य आहेत, त्यांना मित्र म्हणणे चुकीचे ठरेल. मला त्यांची शंभर टक्के आठवण येईल. मात्र प्रत्येकासाठी सुरक्षा महत्त्वाची आहे, असे मला वाटते.
खरं तर, कोणत्याही दिवस साजरा करण्याची ओढ आतून असायला हवी. बालपणी ज्या प्रकारे आपण वाढदिवस साजरा करत असतो, तसे अापण मोठेपणी करत नाही. बालपणी सारखेच आपण आताही वाढदिवस साजरा करायला हवे. माझ्याकडे एक टीशर्ट आहे. ज्यावर आय रिफ्यूज टू ग्रो-अप, असे लिहिले आहे. तुम्ही जर आपल्या आतील मुलाला जीवंत ठेवले तर तुम्ही कुठेही एन्जॉय करू शकता. एकदा पूर्ण रात्र कुटुंबासोबत विमानतळावर अडकलो होतो. बाहेर जाण्याला परवानगी नव्हती. माझी मुले खूपच लहान होती. आम्ही सर्व प्रवासी हैराण झालो होतो. आम्ही संताप करत होतो, चुकीच्या विमानतळावर आलो, आता कधी निघू शकणार. सर्वच लोक काही ना काही बोलत होते. मात्र मुले सामानाच्या ट्रॉलीमध्ये एकमेकांना बसवून इकडे-तिकडे उड्या मारत होते, खेळत हाेते. मजा करत होते. पूर्ण रात्र त्यांनी मजा केली. आपण चुकीच्या विमानतळावर आलो, हे त्यांना कळत नव्हते. एकूणच आपल्या आतील मुल जीवंत राहिले तोपर्यंत कोणत्याही परिस्थिती आपण आनंद मिळवू शकतो.
ते माझ्या हातात नाही. यावर्षी करणार होतो मात्र लॉकडाउनमुळे सर्व काही रखडले. पुढच्या वर्षी नक्कीच सुरू करणार. आता काही अडचण येणार नाही. लॉकडाउनमुळे सर्व काही झाले, असे आपण म्हणत बसलो तर काहीच हाेणार नाही. आपण कधीच पुढे जाणार नाही. मात्र मी जर मेहनत केली तर माझे स्वप्न पुढच्या वर्षी नक्कीच पूर्ण होणार, मला पूर्ण विश्वास आहे. फक्त मेहनतीची गरज आहे.
देर से आए मगर दुरुस्त आए, या म्हणीवर मी चालतो. कधी-कधी उशीर झाला, असे आपल्याला वाटते मात्र तेव्हाच योग्य वेळ आलेली असते, असे मला वाटते. मला थिएटरचा 14 वर्षाचा अनुभव होता, त्यामुळे मी 44 व्या वर्षी पदार्पण केले आणि यशस्वी झालो. उशीर झाला, आधी यायला हवे होते, असे आधी वाटत होते मात्र आता हीच वेळ होती, असे वाटते. कारण सुरुवात करणे महत्त्वाचे आहे. आता 61व्या वर्षी दिग्दर्शकाची सुरुवात करेल.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.