आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खास बातचीत:'मी केवळ इंटरव्ह्यूला वेळेत येतो, पण प्रत्येक गोष्टीत उशिरच झालाय, वयाच्या 44 व्या वर्षी पडद्यावर आलोय' - बोमन इराणी

उमेश कुमार उपाध्याय6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अभिनेते बोमन इराणी यांच्याशी झालेली खास बातचीत -

बोमन इराणी यांनी वेब सिरिज ‘मासूम’द्वारे आपला ओटीटी डेब्यू केला आहे. ही सिरीज 17 जूनला हॉटस्टारवर स्ट्रीम झाली आहे. त्यांनी या सिरीज आणि आगामी प्रोजेक्टविषयी दिव्य मराठीशी खास बातचीत केली.

  • ओटीटीवरची उत्सुकता कशी आहे?

मी खूप उत्साहित होतो. भूमिका लहान असो वा मोठी मी त्याबद्दल उत्साहित असतोच कारण लहान भूमिकेत ही मेहनत करावीच लागते. ही तर आता मुख्य भूमिका आहे. परंतू जेव्हा शुटींग केले जाते, त्यामुळे काम करताना ते पडद्यावरचे आहे की ओटीटी याबद्दल विचार करत नाही. सेट तसाच दिसतो. कॅमरा, लाइट, युनिट ही तेच असते. प्रेक्षकांना आवडावे म्हणून आमच्यापरिने उत्तमातील उत्तम करण्याचा प्रयत्न करतो. पात्र सखोलतेने साकारता येत असल्याने याबद्दल खूप आनंदी आहे. ओटीटीवर अधिक काम करेन. चांगली स्क्रिप्ट असली पाहीजे.

  • चांगली स्क्रिप्ट नसल्याने उशिर झाला का?

मी तर केवळ इंटरव्ह्यूला वेळेत येऊन बसतो. पण प्रत्येकवेळी उशिरा आलोय. दुकानादाराचा जेव्हा फोटोग्राफर झालो तेव्हा 32 वर्षांचा होतो. 35 वर्षांचा असताना थिएटरमध्ये डेब्यू केला आणि 44 व्या वर्षी पडद्यावर काम केले.

  • तुमच्या दिग्दर्शनाखाली असणाऱ्या येणाऱ्या चित्रपटाबद्दल काही सांगा?

मी माझ्या आगामी चित्रपटासाठी लेखक आणि दिग्दर्शक म्हणून डेब्यू करेन. याचे लिखाण पूर्ण झाले आहे. आता एक दीड महिन्यात प्री प्रोडक्शन सुरू होईल. वर्षाखेरपर्यंत शूटिंग सुरू होईल. बापलेकाच्या संबंधांवर आधारीत याची कथा असून हा ओटीटीवर स्ट्रीम होईल.

  • बॉक्स ऑफिसवर ‘जयेशभाई जोरदार’ अपयशी ठरला, यावर सांगा?

‘जयेशभाई जोरदार’ करताना ही मजा आली व पाहातानाही पसंत पडली. परंतू बॉक्स ऑफिसवर अपयशी झाली, याची अनेक कारणे असू शकतात. मी विश्लेषक नसल्याने याबद्दल बोलू शकत नाही. मी कलाकार आहे, इतकेच मला माहित आहे. माझ्या करीअरमध्ये यश आणि अपयशी चित्रपट ही असतील. याबद्दलचे मत आणि सल्ला मला ऋषिकपूर यांच्याकडून मिळाले होते. ते म्हणाले होते की, यशाची नशा डोक्यात उतरू देऊ नका आणि आपले अपयश ही मनाला लागू देऊ नका. शांतपणे काम करत पुढे चालत रहा.

बातम्या आणखी आहेत...