आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुःखद:अभिनेता फराज खानचे निधन, तिसऱ्या स्टेजच्या मेंदूच्या कर्करोगाशी देत होता झुंज; उपचारादरम्यान मालवली प्राणज्योत

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • एक वर्षापासून बिघडली होती फराजची प्रकृती

बॉलिवूड अभिनेता फराज खानचे निधन झाले आहे. वयाच्या 46 व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून फराज बेंगळूरु येथील रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत होता. आज अखेर त्याची प्राणज्योत मालवली.

अभिनेत्री पूजा भट्टने फराज खानच्या निधनाची ट्विटरद्वारे माहिती दिली आहे. ‘मला तुम्हाला सांगताना दु:ख होत आहे की अभिनेता फराज खानचे निधन झाले आहे. तुम्ही सर्वांनी त्याला आर्थिक मदत केली आणि तो लवकर बरा व्हावा म्हणून देवाकडे प्रार्थना केली त्याबद्दल तुमचे आभार’ या आशयाचे ट्विट पूजा भट्टने केले आहे.

एक वर्षापासून बिघडली होती फराजची प्रकृती

त्याला तिसऱ्या स्टेजचा मेंदूचा कर्करोग झाल्याचे निदान झाले होते. फंडरेजिंग वेबसाइटवर फराजच्या प्रकृतीविषयी त्याच्या कुटुंबीयांनी माहिती दिली होती. त्यानुसार, गेल्या एका वर्षापासून त्याची तब्येत खालावत गेल्याचे सांगण्यात आले होते. फराजला कफची तक्रार होती, त्यानंतर त्याच्या छातीत संसर्ग झाला होता. डॉक्टरांनी त्याला रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला, पण तोपर्यंत संसर्ग खूप वाढला होता. छातीमधून हर्पिसचा संसर्ग फराजच्या मेंदूपर्यंत पोहोचला होता आणि तेव्हापासून त्याची प्रकृती अतिशय गंभीर झाली होती.

आर्थिक मदतीसाठी पुढे आला होता सलमान खान

आर्थिक अडचणीमुळे त्याच्या कुटुंबाने निधी गोळा करणार्‍या वेबसाइटवर मदतीचे आवाहन केले होते. फराजच्या उपचारांसाठी कुटुंबाला 25 लाखांची गरज होती. अभिनेत्री पूजा भट्ट हिने मदतीचे आवाहन केल्यानंतर बरेच लोक त्याच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. अभिनेता सलमान खानने त्याला 25 लाख रुपयांची मदत केली असल्याचे म्हटले जाते. याशिवाय फराजच्या उपचारांसाठी चाहत्यांकडून 15 लाखांची मदत आली होती. याची माहिती पूजा भट्ट हिने सोशल मीडियावर दिली होती.

फराज हा चारित्र्य अभिनेते युसूफ खान यांचा मुलगा होता

फराज खान हा गतकाळातील कॅरेक्टर आर्टिस्ट युसुफ खान ('अमर अकबर अँथनी' फेम जेबिसको) यांचा मुलगा होता. राणी मुखर्जी स्टारर 'मेहंदी' (1998) मध्ये त्याने मुख्य भूमिका साकारली होती. याशिवाय त्यांनी 'फरेब' (1996), 'पृथ्वी' (1997) आणि 'दिल ने फिर याद किया' (2001) सारख्या चित्रपटांमध्ये तो झळकला होता. याशिवाय तो छोट्या पडद्यावरही दिसला होता. ‘वन प्लस वन’, ‘शूsssss कोई है’, ‘रात होने को है’, ‘करिना करिना’ या मालिकांमध्ये त्याने काम केले होते.