आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अभिनेता फरदीन खान सध्या आपल्या ट्रान्सफॉर्मेशनमुळे चर्चेत आहे. गेल्या सहा महिन्यात त्याने आपले तब्बल 18 किलो वजन कमी केले असून आता तो चित्रपटांत पुनरागमन करणार आहे. 47 वर्षीय फरदीन अखेरचा 2010 मध्ये रिलीज झालेल्या 'दुल्हा मिल गया' चित्रपटात दिसला होता. त्याच्या म्हणण्यानुसार, त्याला आणि त्याची पत्नी नताशाला आईवडील होण्यात अनेक आव्हानांचा सामना करावा लागला, ज्यामुळे त्याला अचानक चित्रपटांपासून इतका लांब ब्रेक घ्यावा लागला.
'इतका वेळ निघून जाईल असा विचार केला नव्हता'
बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार फरदीन म्हणाला की, "याचे कोणतेही नियोजन नव्हते. इतका वेळ निघून जाईल असा कधी विचारही केला नव्हता. पण ते घडले. सुरुवातीला माझी पत्नी नताशा आणि मला लंडनला जावे लागले, कारण आम्हाला मुल होत नव्हते. त्यासाठी आम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता."
फरदीन पुढे म्हणाला, "अखेर 2013 मुले मुलीचा जन्म झाला आणि त्यानंतर 4 वर्षांनी आम्हाला मुलगा झाला. मला स्वतःला समजले नाही की इतकी वर्षे कशी निघून गेली. मला मुंबई आणि लंडनमध्ये अपडाउन करावे लागायचे. कारण आम्ही IVF च्या पद्धतीने बाळाला जन्म दिला होता. हा काळ माझी पत्नी नताशासाठी सोपा नव्हता. मला तिच्याबरोबर राहावे लागले होते", असे फरदीनने सांगितले.
केवळ 6 महिन्यांत 18 किलो वजन कमी केले
फरदीनच्या म्हणण्यानुसार, त्याने केवळ 6 महिन्यांत 18 किलो वजन कमी केले. एका इंग्रजी न्यूज वेबसाईटशी बोलताना तो म्हणाला की, हेल्दी डायट आणि योग्य वर्कआउटद्वारे त्याने आपले वाढलेले वजन कमी केले. फरदीनच्या म्हणण्यानुसार, वजन कमी झाल्यानंतर लोकांनी त्याला 30 वर्षांचा तरुण म्हटले. पण त्याचे लक्ष्य 25 वर्षाच्या तरुणासारखे दिसायचे आहे. 2016 मध्ये फरदीन वाढलेल्या वजनामुळे चर्चेत होता.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.