आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सेलिब्रिटींना कोरोना:अभिनेते किरण कुमार यांना कोरोना व्हायरसची लागण, 10 दिवसांपासून स्वतःला केले होम क्वारेंटाइन

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • माझ्या शरीरात कोणत्याच प्रकारचे लक्षण नव्हते'

राज्यातील कोरोनाचे संक्रमण दिवसेंदिवस वाढत आहे. यातच आता बॉलीवुड अभिनेते किरण कुमार यांना कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार 10 दिवसांपूर्वी त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. तेव्हापासून त्यांनी स्वतःला होम क्वारेंटाइन केले आहे.

याबाबत सांगताना किरण कुमार म्हणाले की, 'मी एका लहानशा चाचणीसाठी हॉस्पीटलमध्ये गेलो होतो, तेव्हा मला कोरोना झाल्याचे समजले. टेस्ट प्रक्रीया पुर्ण करण्यापूर्वी मला काही इतर चाचण्यांमधून जावे लागले. मला वाटतं की, सावधगिरी म्हणून त्यांनी आधीच माझी कोरोना चाचणी केली असेल.'

फिल्म जर्नलिस्ट विकी ललवानी यांनी सर्वात आधी बातमी ब्रेक केली

माझ्यात कोणतेच लक्षण नव्हते

किरण कुमार पुढे म्हणाले की, 'माझ्या शरीरात कोणत्याच प्रकारचे लक्षण नव्हते. ना खोकला, ना ताप, ना श्वास घ्यायला त्रास ,काहीच नव्हते. मी पूर्णपणे निरोगी होतो.' पुढे ते म्हणाले की, 'मी सध्या स्वतःला होम क्वारेंटाइन केले आहे. माझ्या घराला दोन मजले आहेत. माझी पत्नी आणि मुले पहिल्या मजल्यावर राहत आहेत आणि मी स्वतःला टॉप फ्लोअरवर आयसोलेट केले आहे. मी 25 किंवा 26 मे ला ला परत एकदा चाचणी करणार आहे.'

अनेक सेलेब्स झाले आहेत संक्रमित

यापूर्वी बॉलीवुड सिंगर कनिका कपूर, फिल्म निर्माते करीम मोरानी आणि त्यांच्या दोन मुली, अॅक्टर पूरब कोहली, अॅक्टर फ्रेडी दारूवालाचे वडील, अॅक्टर सत्यजीत दुबेच्या आईसह बोनी कपूर आणि फराह अली खानच्या घरात काम करणाऱ्या नोकरालाही कोरोनाची लागण झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...