आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ईडीची मोठी कारवाई:बॉलिवूड अभिनेता-निर्माता सचिन जोशीला ईडीकडून अटक, 100 कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी झाली कारवाई

21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सध्या सचिन जोशी ईडीच्या ताब्यात आहे.

सक्तसवसुली संचलनालयाकडून (ईडी) अभिनेता, निर्माता आणि व्यावसायिक सचिन जोशीला अटक करण्यात आली आहे. ओमकार रिअल्टर्स प्रकरणी ईडीकडून ही कारवाई करण्यात आली आहे. हे प्रकरण मुंबईच्या ईडीच्या झोन-2 मध्ये रजिस्टर्ड आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ओमकार ग्रुप प्रमोटर्स आणि सचिन जोशीकडून करण्यात आलेल्या 100 कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. अटकेची कारवाई करण्याआधी सचिन जोशीची तब्बल 18 तास चौकशी करण्यात आली होती.

ईडीने समन्स बजावल्यानंतरही सचिन जोशी ईडीसमोर हजर राहिला नाही. त्यामुळे ईडीने शनिवारी सचिन जोशीला दक्षिण मुंबईतील कार्यालयात आणले होते. सध्या सचिन जोशी ईडीच्या ताब्यात आहे. ईडीने याआधी ओमकार ग्रुपचे चेअरमन कमाल गुप्ता आणि व्यवस्थापकीय संचालक बाबूलाल वर्मा यांना मनी लॉण्डरिंग प्रकरणी अटक केली आहे. झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांध्ये सहभागी असलेल्या अनेक मोठ्या कंपन्यांपैकी ओमकार ग्रुप एक आहे. याशिवाय मुंबईत अनेक मोक्याच्या ठिकाणी ओमकार ग्रुपचे प्रकल्प सुरु आहेत.

सचिन जोशी 2017 मध्ये विजय माल्याचा गोव्यातील किंगफीशर बंगला विकत घेतल्याने चर्चेत आला होता. याशिवाय तो JMJ ग्रूपचा प्रमोटर आहे. पान मसाल्यात वापरल्या जाणाऱ्या खाद्य परफ्यूमची निर्मिती करणे हा सचिन जोशीच्या JMJ ग्रुपचा मुख्य व्यवसाय आहे. याशिवाय रेस्तराँ आणि मद्य व्यवसायही या ग्रुपकडून केला जातो. याशिवाय सचिन विकिंग मीडिया अँड एन्टरटेन्मेन्ट या प्रॉडक्शन कंपनीचा मालक आहे.

सचिन जोशीने 2012 मध्ये मॉडेल आणि अभिनेत्री उर्वशी शर्मासोबत लग्न केले आहे. लग्नानंतर उर्वशीने नाव बदलून रैना जोशी असे ठेवले आहे. तेलुगू, कन्नडा तसेच काही बॉलिवूड चित्रपटांमध्ये त्याने काम केले आहे. अजान, मुंबई मिरर आणि जॅकपॉट या चित्रपटांमध्ये सचिनने काम केले आहे.सचिन आणि उर्वशी यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.

बातम्या आणखी आहेत...