आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनू सूदला कोरोनाचा संसर्ग:सोनू सूदला कोरोनाची लागण, पोस्ट शेअर करत म्हणाला - तुमच्या अडचणी सोडवण्यासाठी मला आणखी जास्त वेळ मिळाला

9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • काय म्हणाला सोनू सूद...

लॉकडाऊनच्या काळात गरजूंसाठी देवदूत म्हणून समोर आलेल्या अभिनेता सोनू सूदला कोरोनाची लागण झाली आहे. सोनूने स्वतः सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे.

'नमस्कार मित्रांनो. माझी कोविड 19 ची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे मी स्वतःला क्वारंटाइन केले आहे. काळजीची गोष्ट नाही. उलट आता माझ्याजवळ तुमच्या अडचणी सोडवण्यासाठी आणखी जास्त वेळ असेल,' असे सोनू म्हणाला आहे. सोबतच कोणताही त्रास असला तरी मी कायम तुमच्यासोबत आहे, असा विश्वासदेखील त्याने आपल्या चाहत्यांना दिला आहे.

शुक्रवारी सकाळी व्यक्त केली होती चिंता
कोरोनाच्या दुस-या लाटेत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. वैद्यकिय व्यवस्था अपुरी पडत आहे. इंजेक्शन, बेड्स आणि औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. गरजुंसाठी बेड्स आणि औषधे उपलब्ध करुन देण्यासाठी सोनूने असमर्थता व्यक्त केली. सोनूने यावर चिंता व्यक्त करणारी एक पोस्ट शेअर केली. शुक्रवारी त्याने सोशल मीडियावर लिहिले, 'मी सकाळपासून माझा फोन ठेवलेला नाही. देशभरातून हॉस्पिटल, बेड्स, औषधे, इंजेक्शन्स यासाठी हजारो कॉल आहे आणि आतापर्यंत अनेकांना मी ही सुविधा उपलब्ध करुन देऊ शकलेलो नाही. मला असहाय्य वाटत आहे. परिस्थिती खूप भयावह आहे. कृपया घरात राहा, मास्क घाला आणि स्वतःला संसर्ग होण्यापासून वाचवा,' असे सोनू म्हणाला आहे.

सोनू म्हणाला - तर रुग्णालय बांधावे लागतील
दोन दिवसांपूर्वी सोनू सूदने कोरोनाच्या संकटातून बाहेर पडण्याचा उपाय सांगितला आहे. सोनूने सोशल मीडियावर त्याचे मत मांडले. कोरोनाच्या काळात आपल्याला मिळालेल्या धड्याबद्दल त्याने सांगितले आहे. 'जर देश वाचवायचा असेल तर रुग्णालय बांधावे लागतील', असे सोनूने म्हटले.

सोनूने इंजेक्शन आणि सिलिंडर पाठवले

अलीकडेच सोनू सूदने आपल्या सोशल मीडियावर सांगितले होते की, त्याने गरजूंना रेमडेसिवीर इंजेक्शन आणि इंदूरमधील गरजूंना 10 ऑक्सिजन सिलिंडर पाठविले आहेत. सोनूने दहावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करून ऑनलाईन पद्धतीने परीक्षा होणे गरजेचे असल्याचे म्हटले होते. यानंतर सीबीएसईने दहावीची परीक्षा रद्द करून बारावीची परीक्षा पुढे ढकलली तेव्हा सोनूने आनंद व्यक्त केला.

बातम्या आणखी आहेत...