आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आत्महत्या:अभिनेता सुशांतसिंह राजपूतने आत्महत्या केल्याची पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये पुष्टी

मुंबई10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ज्याने दिला आत्महत्या न करण्याचा संदेश, त्यानेच आत्महत्या करुन संपवले आयुष्य

34 वर्षीय अभिनेता सुशांतसिंह राजपूत याने आत्महत्या केली. तो वर्षभरापासून नैराश्यात होता. मोठ्या पडद्यावर ‘छिछोरे’सारख्या चित्रपटात पित्याची भूमिका वठवणारा आणि चित्रपटात मुलांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी स्वत:च्या, मित्रांच्या अपयशाच्या कथा मुलांना ऐकवणारा अभिनेता सुशांतसिंह राजपूत रविवारी काळाच्या पडद्याआड गेला. रविवारी त्याने आत्महत्या केल्याची बातमी त्याच्या घरी कळाली आणि वडील के. के. सिंह बेशुद्ध होऊन कोसळले. त्यांचे कुटुंब बिहारमधील पुर्णिया येथील रहिवासी होते. २००० मध्ये हे कुटुंब दिल्लीत स्थायिक झाले. २००२ मध्ये त्याच्या आईचे निधन झाले होते. त्याला चार बहिणी आहेत. त्यातील एक मितू ही राज्यस्तरीय क्रिकेटपटू आहे. पाच महिन्यांनंतर नोव्हेंबरमध्ये सुशांतचाही विवाह ठरला होता.

वांद्र्यातील त्याच्या फ्लॅटमधून पोलिसांनी सुशांत याचा फास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह जप्त केला. मुंबईतील कूपर हॉस्पिटलमध्ये रात्री उशिरा सुशांतचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला. यामध्ये सुशांतने आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले आहे. ९ जून रोजी सुशांत याची माजी मॅनेजर सलियन हिनेही इमारतीवरून उडी घेत आत्महत्या केली होती. तेव्हा सुशांतने इन्स्टाग्रामवर पोस्ट केली होती की, ही अत्यंत दुखद बातमी आहे... आत्महत्येपूर्वी काही तास सुशांतची पूर्वीची गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेने सोशल मीडियावर पोस्ट केले होेते की, “देव अशा लोकांना जीवनातून हटवतो... कारण त्याने जे ऐकले आहे ते तुम्ही ऐकलेले नसते.’ या आत्महत्येमागे सुशांतचे अंकिताशी तुटलेले नाते असावे, असा संशय आहे. त्याची सुसाइड नोट सापडलेली नाही. त्यामुळे फोन व लॅपटॉपमधून पुरावे मिळतात का, हे पोलिस तपासत आहेत.

मित्रांनी सांगितले, तो खूप डिप्रेशनमध्ये होता

सुशांतच्या मित्रांचे म्हणने आहे की, तो मागील अनेक दिवसांपासू डिप्रेशनमध्ये होता. त्याच्या एक्स गर्लफ्रेंडचा एक बिजनसमनसोबत साखरपुडा झाला होता. सुशांतची माझी मॅनेजर दिशा सालियनने पाच दिवसांपूर्वी आत्महत्या केली. याप्रकरणी सुशांतची चौकशी करण्यात आली होती.

8 जूनला माजी मॅनेजरने केली आत्महत्या

पाच दिवसांपूर्वीच सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सलियनने 8 जूनला मुंबईतील एका इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली होती. दिशाने मुंबईच्या मालाडमधील 14 मजली इमारतीवरुन उडी मारली. 

सुशांतच्या मामाने केली न्यायालयीन चौकशीची मागणी

सुशांतच्या मामाने न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे. कुटुंबियांनी सांगितल्याप्रमाणे सुशांत एका बंगाली तरुणीमुळे त्रस्त होता. 

सुशांतने आपल्या करिअरची सुरुवात बॅकअप डांसर म्हणून केली होती. त्यानंतर सुशांतने सर्वात आधी 'किस देश में है मेरा दिल' नावाच्या मालिकेतून अभिनय सुरू केला, पण त्याला खरी ओळख एकता कपूरच्या 'पवित्र रिश्ता'मधून मिळाली. त्यानंतर त्यांनी आपल्या बॉलिवूड करिअरची सुरुवात 'काय पो छे'मधून केली होती. त्यानंतर 'शुद्ध देसी रोमांस' आणि भारतीय क्रिकट कर्णधार महेंद्र सिंग धोनीचा बायोपिक 'एम एस धोनी' मध्ये काम केले, त्यानंतर आमिर खानसोबत 'पीके' चित्रपट आणि 'छिछोरे' चित्रपटातही काम काम केले होते. विशेष म्हणजे, छिछोरे चित्रपटात सुशांतने आत्महत्या न करण्याचा संदेश दिला होता. पण, त्यानेच आज आत्महत्या करुन आपले आयुष्य संपवल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

12 चित्रपटात केले काम

काय पो छे, शुद्ध देसी रोमांस, पीके, डिटेक्टिव व्योमकेश बख्शी, एमएस धोनी: अनटोल्ड स्टोरी, राब्ता, वेल्कम टू न्यू यॉर्क, केदारनाथ, सोनचिड़िया, छिछोरे, ड्राइव आणि दिल बेचारा चित्रपटात काम केले.

मागील काही दिवसात बॉलिवूडमधील अनेक कलाकार जग सोडून गेले आहेत. एप्रिल महिन्यात इरफान खान आणि ऋषी कपूरसारख्या मोठ्या कलाकारांचे निधन झाले. तर, नुकतच सिंगर आणि म्यूजिक कंपोजर वाजिद खानचे 42 व्या वर्षी निधन झाले.

बातम्या आणखी आहेत...