आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुशांतच्या मृत्यूने कुटुंबाला बसला जबर धक्का:मुलाच्या मृत्यूची बातमी ऐकताच कोसळले वडील, पटनातील घराबाहेर जमली गर्दी

पाटणा10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने रविवारी मुंबईमधील आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सुशांतच्या मृत्यूने कुटुंबाला जबर धक्का बसला आहे. मुलाच्या मृत्यूची बातमी ऐकताच वडील केके सिंह बेशुद्ध झाले. घरातील लोक त्यांना आधार देत आहेत. दरम्यान, सुशांतच्या मृत्यूची बातमी वाऱ्यासारखी शहरात पसरली आणि लोक सुशांतच्या घरी जमा होणे सुरू झाले. घराबाहेर मीडियातील लोकांचीही गर्दी जमली. 

सुशांत सिंह मूळ बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातील होता. 90 च्या दशकात त्यांचे संपूर्ण कुटुंब पाटण्यात स्थायिक झाले होते. सुशांतचे वडील केके सिंह सरकारी अधिकारी होते. सुशांतचे प्राथमिक शिक्षण पटनाच्या सेंट कैरेंस स्कूलमधून झाले. त्यानंतर तो दिल्लीला गेला.

स्टार बनल्यानंतरही स्वभाव बदलला नाही

सुशांतच्या पाटणामधील घराशेजारी राहणाऱ्या भरत सिंहने सांगितले की, सुशांत एकुलता एक होता. 2002 मध्ये त्याच्या आईचा मृत्यू झाला होता. तो लहानपनापासून मृदू स्वभावाचा होता. तो अभ्यासात खूप हुशार होता. मोठा स्टार बनल्यानंतरही त्याच्या स्वभावात काहीच बदल झाला नव्हता.

दुसऱ्या एक शेजारी श्याम सिंहने सांगितले की, स्टार बनल्यानंतर सुशांत घरी कमी यायचा. पण, जेव्हापण यायचा, तेव्हा सर्वांशी भेटायचा. मुंबईला जाऊन तो आपले संस्कार विसरला नव्हता. विश्वास बसत नाही, त्याने टोकाचे पाऊल उचलले.

बातम्या आणखी आहेत...