आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सेलिब्रिटींचा स्ट्रगल:एकेकाळी धर्मेंद्र यांच्याकडे एक वेळच्या जेवणासाठी नसायचे पैसे, असे होते बॉलिवूड कलाकारांचे संघर्षाचे दिवस

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • धर्मेंद्र यांना अनेक वर्षे संघर्ष करावा लागला होता.

8 डिसेंबर रोजी बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र वयाची 85 वर्षे पूर्ण करत आहेत. 1935 साली पंजाबमध्ये त्यांचा जन्म झाला होता. सिनेमांची आवड असलेल्या धर्मेंद्र यांनी 60 च्या दशकात फिल्मफेअर मॅगझिनच्या वतीने आयोजित टॅलेंट हंट अवॉर्ड आपल्या नावी केला होता. त्यानंतर ते सिनेसृष्टीत करिअर करण्यासाठी मुंबईत दाखल झाले. मात्र हा प्रवास मुळीच सोपा नव्हता. छोट्या-मोठ्या भूमिका वठवल्यानंतरदेखील त्यांना अनेक वर्षे संघर्ष करावा लागला होता.

जेवणासाठी नसायचे पैसे
एक काळ असा होता, जेव्हा धर्मेंद्र पोटभर जेवणदेखील करु शकत नसे. असे म्हटले जाते, की संघर्षाच्या काळात त्यांच्याकडे जेवणासाठी पैसे नसायचे. एकदा तर अभिनेते शशी कपूर यांनी धर्मेंद्र यांना आपल्या घरी जेवू घातले होते. बराच काळ संघर्ष केल्यानंतर धर्मेंद्र बॉलिवूडचे सुपरस्टार बनले. धर्मेंद्र यांच्याप्रमाणेच बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना यश मिळवण्यापूर्वी भरपूर संघर्ष करावा लागला आहे. जाणून घ्या बॉलिवूडच्या इतर स्टार्सच्या स्ट्रगलविषयी...

अमिताभ बच्चन

आकाशवाणीतून रिजेक्ट झाल्यानंतर अमिताभ बच्चन अभिनेता होण्यासाठी मुंबईत आले. सुरुवातीच्या संघर्षाच्या काळात घर नसल्याने त्यांना अनेक रात्री मरीन ड्राइव्हवर काढव्या लागल्या होत्या.

रजनीकांत

साऊथचे सुपरस्टार रजनीकांत यांनी जवळजवळ नऊ वर्षे बंगळूरू येथे बस कंडक्टर म्हणून काम केले होते.

शाहरुख खान

बॉलिवूडचा किंग खान बनण्यापूर्वी शाहरुख खानने अनेक रात्री मुंबईतील ओबरॉय हॉटेलच्या बाहेर रस्त्यांवर काढल्या होत्या.

देव आनंद

दिवंगत अभिनेते देव आनंद यांनी अनेक वर्षे क्लर्क म्हणून काम केले होते. त्यांना 85 रुपये मासिक पगार मिळायचा.

दिलीप कुमार

स्ट्रगलिंग डेजमध्ये दिलीप कुमार यांच्याकडे घरापासून स्टुडिओपर्यंत जाण्यासाठीही पैसे नसायचे. त्याकाळात बीसीसीआयचे तत्कालीन अध्यक्ष पी.एम. रुंगटा त्यांना पैसे द्यायचे.

मनोज कुमार

अभिनेता होण्यापूर्वी मनोज कुमार एक लेखक होते. एक सीन लिहिण्यासाठी त्यांना 11 रुपये मिळायचे.

जॅकी श्रॉफ

स्टार बनण्यापूर्वी जॅकी श्रॉफ मुंबईतील तीन बत्ती परिसरातील एका चाळीत वास्तव्याला होते. संघर्षाच्या काळात त्यांनी सहा वर्षे लोकल ट्रेनने प्रवास केला होता.

बोमन इराणी

'मुन्नाभाई एमबीबीएस' या सिनेमामुळे प्रसिद्धीझोतात आलेले अभिनेते बोमन इराणी एकेकाळी ताज हॉटेलमध्ये वेटर म्हणून कामाला होते.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser