आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • For The First Time In 29 Years Of Career, Akshay Kumar Will Be Seen Playing The Role Of Transgender, These Actors Have Also Done Such A Challenging Role

पडद्यावर तृतीयपंथीच्या भूमिकेत दिसले हे स्टार्स:29 वर्षांच्या करिअरमध्ये पहिल्यांदा ट्रान्सजेंडरची भूमिका साकारताना दिसणार अक्षय कुमार, या अभिनेत्यांनीही केले असे चॅलेंजिंग रोल

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
'लक्ष्मी बॉम्ब'मध्ये अक्षय कुमार, 'शबनम मौसी'मध्ये आशुतोष राणा आणि 'अमी सायरा बानो'मध्ये राजकुमार राव.
  • अक्षय कुमार स्टारर लक्ष्मी बॉम्ब हा चित्रपट 9 नोव्हेंबर रोजी हॉट-स्टारवर रिलीज होणार आहे.

बॉलिवूड कलाकार आपल्या पात्रात जिवंतपणा आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात. बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे आपल्या भूमिकेसाठी कम्फर्ट झोन सोडून काही तरी वेगळे करण्यास तयार असतात. यामध्ये अक्षय कुमारच्या नावाचा समावेश आहे, जो सध्या त्याचा आगामी 'लक्ष्मी बॉम्ब' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात अक्षय एका ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत दिसणार आहे.

इंडस्ट्रीत 29 वर्षांपासून कार्यरत असलेल्या अक्षयने अशी भूमिका यापूर्वी कधीच केली नाही. आता आपल्या करिअरच्या अत्यंत यशस्वी टप्प्यावर असलेल्या अक्षयने तृतीयपंथीची भूमिका स्वीकारून मोठी रिस्क घेतली आहे. हा चित्रपट 9 नोव्हेंबर रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म हॉट-स्टारवर रिलीज होणार आहे. तसे पाहता, अशी आव्हानात्मक भूमिका स्वीकारणारा अक्षय हा पहिला कलाकार नाही. यापूर्वीही ब-याच मोठ्या कलाकारांनी हे चॅलेंज स्वीकारले आहे.

आशुतोष राणा

1999 मध्ये आलेल्या 'संघर्ष' या चित्रपटात आशुतोष राणाने लज्जा शंकर पांडे नावाच्या ट्रान्सजेंडरची भूमिका साकारून सर्वांना चकित केले होते. या भूमिकेसाठी त्याला फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट खलनायकाचा पुरस्कारही मिळाला. याशिवाय 2005 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'शबनम मौसी' या चित्रपटातही आशुतोषने तृतीयपंथीची भूमिका साकारली होती. 'शबनम मौसी' ही देशातील पहिली तृतीयपंथी होती, जिने निवडणुक लढवली आणि ती जिंकलीदेखील.

सदाशिव अमरापूरकर

1991 च्या 'सडक' या चित्रपटात अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांनी महारानी नावाच्या तृतीयपंथीची भूमिका साकारली होती, त्यांच्या भूमिकेचे खूप कौतुक झाले होते. सर्वोत्कृष्ट खलनायकाच्या श्रेणीत त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.

महेश मांजरेकर

कंगना रनोट आणि पारस अरोरा स्टारर 'रज्जो' या चित्रपटात महेश मांजरेकर यांनी बेगम नावाच्या तृतीयपंथीची भूमिका साकारली होती. हा चित्रपट 2013 मध्ये प्रदर्शित झाला होता.

परेश रावल

परेश रावल यांनी 1997 मध्ये आलेल्या 'तमन्ना'मध्ये तृतीयपंथीची भूमिका साकारली होती. या चित्रपटात पूजा भट्ट, शरद कपूर आणि मनोज बाजपेयी मुख्य भूमिकेत होते.

रवी किशन

2013 मध्ये आलेल्या सैफ अली खान आणि सोनाक्षी सिन्हा स्टारर 'बुलेट राजा' या चित्रपटात रवी किशनने रज्जो नावाच्या तृतीयपंथीची भूमिका साकारली होती. रवी किशनने एका मुलाखतीत सांगितले की, 'मी यापूर्वी अशी भूमिका कधीही केली नव्हती, परंतु तिग्मांशू धुलिया (दिग्दर्शक) यांना या भूमिकेचे श्रेय देईन. त्यांच्या क्लिअर व्हिजनमुळे मी ही भूमिका साकारु शकलो.'

प्रशांत नारायण

'मर्डर 2' या चित्रपटात अभिनेता प्रशांत नारायणने अशा तृतीयपंथीची भूमिका वठवली होती, जी मुलींवर अत्याचार करते. 2011 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात इमरान हाश्मी आणि जॅकलिन फर्नांडिज यांनी मुख्य भूमिका साकारली होती.

राज कुमार राव

'क्वीन', 'सिटी लाइट्स', 'अलीगड'सह अनेक गाजलेल्या चित्रपटात झळकलेला अभिनेता राजकुमार राव यानेदेखील तृतीयपंथीची भूमिका साकारुन सगळ्यांना अवाक् केले होते. 'अमी सायरा बानो' या बंगाली चित्रपटात त्याने ट्रान्सजेंडरची भूमिका साकारली होती. हा चित्रपट 2015 मध्ये आला होता. या भूमिकेविषयी राजकुमार म्हणाला होता, 'ही अशा एका मुलाची कहाणी आहे, ज्याला आतून तो एक बाई असल्यासारखे वाटते, त्यामुळे तो ट्रान्सजेंडर समुदायाकडे आकर्षित होतो. मला ही भूमिका आवडली आणि एक कलाकार म्हणून मी हे आव्हान स्वीकारले.'