आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बबिता यांचा 73 वा वाढदिवस:रणधीर कपूरसोबत लग्नानंतर बबिता यांनी अभिनयाला ठोकला रामराम, आपापसांतील मतभेदांमुळे वेगळे झाले पण घटस्फोट घेतला नाही

18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आज अभिनेत्री बबिता यांचा वाढदिवस आहे.

20 एप्रिल रोजी बबिता आपला 73 वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांचा जन्म 1948 मध्ये झाला होता. बबिता यांचे वडील हरी शिवदासानी सिंधी होते, तर आई एक फ्रेंच महिला होती. बबिता यांनी आपल्या सिने कारकीर्दीत फक्त 19 चित्रपटांत काम केले. 1966 मध्ये आलेला 'दस लाख' या चित्रपटाद्वारे त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यांना मोठी संधी निर्माते जी.पी. सिप्पी यांनी दिली होती. चित्रपटाचे नाव होते 'राज'. या चित्रपटात बबिता राजेश खन्ना यांच्यासोबत झळकल्या होत्या. मात्र हा चित्रपट फारसा चालला नाही.

अपयशानंतर मिळाले यश
यानंतर जितेंद्र यांच्यासोबत आलेला त्यांचा 'फर्ज' हा चित्रपट सुपरहिट ठरला. यानंतर बबीता यांनी अनेक संस्मरणीय चित्रपट केले. यामध्ये 'लक', 'तुमसे अछा कौन है', 'हसीना मान जाएगी', 'अनजाना', 'कब क्यूँ और कहां' आणि 'पहचान' या चित्रपटांचा समावेश आहे. 1971 मध्ये बबिता यांचा 'कल आज और कल' हा एक महत्त्वाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे नायक रणधीर कपूर होते. रणधीर यांचा हा नायक म्हणून हा पहिला चित्रपट होता आणि चित्रपटाचे दिग्दर्शनही त्यांनी स्वत: केले होते.

लग्नानंतर नात्यात आला दुरावा
'कल आज और कल' या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान बबिता आणि रणधीर कपूर यांच्या प्रेमाला सुरुवात झाली. रणबीरसोबत लग्न करण्यासाठी बबिता आपले करिअर पणाला लावायला तयार झाल्या होत्या. 6 नोव्हेंबर 1971 रोजी बबिता आणि रणधीर कपूर यांचे लग्न झाले. त्याचवेळी बबिता यापुढे चित्रपटांमध्ये काम करणार नाहीत असा निर्णय घेण्यात आला होता.

याचे कारण असे की, कपूर घराण्यातील सून आणि मुलीला त्याकाळी चित्रपटांमध्ये काम करण्याची परवानगी नव्हती. बबिता यांनी चित्रपटसृष्टीला रामराम ठोकला. लग्नानंतर बबिता यांनी 25 जून 1974 रोजी करिश्मा आणि 21 सप्टेंबर 1980 रोजी करीना कपूरला जन्म दिला. यानंतर बबीता आणि रणधीर यांच्यात तणाव निर्माण झाला होता. याचा परिणाम म्हणजे बबिता आपल्या दोन मुलींसह स्वतंत्रपणे राहू लागल्या. दोघांमध्ये दुरावा निर्माण झाल्यानंतर त्यांनी घटस्फोट घेतला नाही आणि दुसरे लग्नही केले नाही.

बबीता यांना रणधीर यांच्या सवयी आवडत नव्हत्या
काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीत रणधीर कपूर व्यक्त झाले होते. त्यांनी सांगितले होते, 'मी एक वाईट माणूस आहे, जो दारु पिऊन उशीरा घरी येतो, हे त्यांना (बबिता) कळले होते. या सर्व अशा गोष्टी होत्या, ज्या त्यांना आवडत नव्हत्या. मला त्यांच्या मनासारखं आणि त्यांना माझ्या मनासारखं राहणं जमत नव्हतं. आम्ही लव्ह मॅरेज केलं होते. आम्ही दोन मुलींचे आईवडील झालो होतो, तरी आमच्यात काही जमेनासं होतं. बबिता यांनी मुलींना चांगले संस्कार दिले. मुली मोठ्या होऊन आपल्या करिअरमध्ये यशस्वी झाल्या. एक वडील म्हणून मला आणखी काय हवं आहे?,' असे रणधीर कपूर म्हणाले होते.

घटस्फोट का घेतला नाही?
जेव्हा मुलाखतील रणधीर कपूर यांना त्यांनी बबितापासून घटस्फोट का घेतला नाही, असे विचारले असता, ते म्हणाले होते, घटस्फोट कशासाठी?... आम्ही घटस्फोट का घ्यावा? मला किंवा बबिताला पुन्हा लग्न करायचे नव्हते, असे रणधीर यांनी सांगितले.

रणधीर आणि बबिता यांनी 1971 मध्ये आलेल्या 'कल आज कल' या चित्रपटात एकत्र काम केले होते. यानंतर दोघे 1972 मध्ये आलेल्या 'जीत' या चित्रपटात एकत्र दिसले होते. लग्नानंतर बबिता यांनी आपल्या अभिनय करिअरला कायमचा रामराम ठोकला.

बातम्या आणखी आहेत...