आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसू आणि तिचा पती करण सिंग ग्रोवर यांनी पहिल्यांदाच त्यांची लेक देवी बसू ग्रोवरचा चेहरा सगळ्यांना दाखवला आहे. बिपाशाने बुधवारी रात्री इन्स्टाग्रामवर लेकीचे दोन गोंडस फोटो शेअर केले. या फोटोत चिमुकली खूपच क्यूट दिसतेय. बिपाशाने गेल्यावर्षी 12 नोव्हेंबर रोजी देवीला जन्म दिला. तेव्हापासून चाहते देवीला बघण्यास उत्सुक होते. बिपाशा आणि करण देवीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असत. पण त्यात त्यांनी तिचा चेहरा दिसू दिला नाही. पण आता त्यांच्या लेकीचे गोंडस रुप चाहत्यांना पाहायला मिळाले आहे.
बिपाशाने इन्स्टाग्राम अकाउंटवरुन पाच महिन्यांच्या लेकीचे फोटो खास चाहत्यांसाठी शेअर केले आहेत. गुलाबी रंगाचा फ्रॉक आणि हेअरबँड लावून बिपाशाच्या लेकीने गोड स्माइल दिल्याचे फोटोत दिसत आहे. ती आनंदाने कॅमेऱ्याकडे पाहताना दिसतेय. तिच्या स्मितहास्याने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
लेकीचे फोटो शेअर करत बिपाशाने "हॅलो वर्ल्ड, मी देवी" असे कॅप्शन दिलं आहे. देवीच्या या फोटोवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनीही यावर कमेंट करत बिपाशा व करणचं अभिनंदन केलं आहे.
6 वर्षांनंतर आईबाबा झाले बिपाशा-करण
बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोवर लग्नाच्या सहा वर्षांनी पहिल्यांदा आईबाबा झाले आहेत. दोघांची पहिली भेट 2015 मध्ये भूषण पटेलच्या 'अलोन' चित्रपटाच्या सेटवर झाली होती, त्यानंतर ते काही चित्रपटांमध्ये एकत्र दिसले. 2016 मध्ये त्यांनी लग्न केले. लग्नाच्या 6 वर्षांनी दोघे आई-वडील झाले आहेत. काही दिवसांपूर्वी बिपाशाने तिच्या मुलीच्या नावाबद्दल खुलासा करणारी एक पोस्ट शेअर करत मुलीचे नाव देवी का ठेवले, याविषयी खुलासा केला होता. बिपाशाने सांगितल्यानुसार, माँ वैष्णोदेवीच्या दिव्य दर्शनानंतर देवीचा जन्म झाला आणि म्हणून तिने आपल्या मुलीचे नाव 'देवी' ठेवले.
ऑगस्टमध्ये केली होती प्रेग्नेंसीची घोषणा
बिपाशाने बसूने गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये आपल्या प्रेग्नेंसीची घोषणा केली होती. बिपाशाने मॅटर्निटी फोटोशूटचे फोटो शेअर करत लिहिले होते, "आमचे बाळ लवकरच आमच्या आयुष्याचा आणि आनंदाचा एक भाग होणार आहे. तुमच्या सर्व प्रेम आणि प्रार्थनांसाठी धन्यवाद. तुमच्या शुभेच्छा आमच्या आयुष्याचा एक भाग होत्या आणि नेहमीच राहतील, दुर्गा दुर्गा," असे ती म्हणाली होती.
एप्रिल 2016 मध्ये झाले होते दोघांचे लग्न
30 एप्रिल 2016 रोजी बिपाशा आणि करणचे लग्न झाले होते. बिपाशा ही करणची तिसरी पत्नी आहे. तिच्याआधी करणने टीव्ही अभिनेत्री जेनिफर विंगेट आणि श्रद्धा निगमसोबत लग्न केले होते, परंतु त्याची दोन्ही लग्नं फार काळ टिकली नाहीत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.