आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संघर्ष:DDLJ च्या क्लायमॅक्स शूटवेळी पतीचे झाले निधन, 'बीवी नं. 1'च्या शूटिंगदरम्यान सलमानमुळे पडला होता डेव्हिड धवनचा ओरडा

उमेशकुमार उपाध्याय / अरुणिमा शुक्ला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

'मी दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या चित्रपटाचे शूटिंग करत होते, तेव्हा अचानक मला माझ्या पतीचे निधन झाल्याचा फोन आला. हे ऐकून मी खूप खचले. सगळे काही थांबल्यासारखे वाटले. मला काही सुचत नव्हते. दुसरीकडे, अनुपम खेर यांच्यासोबतचा क्लायमॅक्सचा माझा एक शॉट बाकी होता. काय करावे हे समजत नव्हते, पण यशराज युनिटला माझी मनःस्थिती समजली आणि त्यांनी मला लगेच निघायला सांगितले. मी एकटीनेच माझ्या पतीवर अंत्यसंस्कार केले, त्यानंतर त्यांच्या अस्थिकलशाचे विसर्जन करण्यासाठी हरिद्वारला गेले. तो माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट काळ होता. त्यावेळी मी सर्व काही एकटीने केले होते. पतीच्या अकाली निधनामुळे मी DDLJ च्या क्लायमॅक्समध्ये दिसली नव्हती.'

हे सागंत आहेत चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री हिमानी शिवपुरी. त्यांनी आपल्या कारकिर्दीत सलमान खान, शाहरुख खानपासून ते करण जोहर, डेव्हिड धवनपर्यंत अनेक प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शकांसोबत काम केले आहे. सध्या त्या 'हप्पू की उलटन पलटन' या टीव्ही शोमध्ये कटोरी देवीची भूमिका साकारत आहेत.

हिमानी यांनी कठोर परिश्रमाच्या जोरावर मनोरंजन सृष्टीत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. पण या प्रवासात त्यांचा संघर्षही बराच मोठा होता. रंगभूमीवर काम करत असल्याने नातेवाईकांनी अनेक टोमणे मारले. पण सुदैवाने वडिलांची साथ लाभली. एनएसडीमधून पात्र झाल्यानंतरही त्यांना कामाच्या शोधात भटकंती करावी लागली. पण नशीब आणि मेहनतीच्या जोरावर त्यांना दूरदर्शनच्या टीव्ही शोमध्ये काम करण्याची संधी मिळाली. तिथून त्यांना टीव्ही शो आणि चित्रपटांमध्ये काम मिळू लागले.

आजच्या स्ट्रगल स्टोरीमध्ये हिमानी शिवपुरी यांच्या संघर्षाची कहाणी त्यांच्याच शब्दांत जाणून घेऊया….

माझा जन्म 1960 मध्ये डेहराडूनमध्ये झाला. माझे वडील शाळेत शिक्षक होते. त्यांना फारसा पगार नव्हता. तरीही त्यांनी मला आणि माझ्या भावाला काहीही कमी पडू दिले नाही. एकदा आम्हाला लग्नाला जायचे होते, पण पैशांअभावी माझे वडील माझ्यासाठी नवीन कपडे घेऊ शकले नाहीत, त्यामुळे मी खूप रडले होते.

वडिलांचा साहित्याची आवड होती. त्यामुळे घरी परिसंवाद व्हायचे. माझ्यातही तेच गुण होते, मी अभ्यासात खूप हुशार होते आणि कलेचीही मला आवड होती.

डेहराडून भागात मुलींना फारसे शिकवले जात नव्हते. पण माझ्या वडिलांनीही मला शिकवले आणि प्रत्येक पावलावर साथ दिली. तर दुसरीकडे आईला मात्र मी घर कामात जास्तीत जास्त लक्ष द्यावे असे वाटायचे. यावर वडील म्हणायचे- नाही, माझी मुलगी मुलापेक्षा कमी नाही.

पदवीनंतर मी ऑरगॅनिक केमिस्ट्रीमधून M.Sc केले. याकाळात मला नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) बद्दल माहिती मिळाली. इथे अभिनय शिकवला जातो हे मला समजले. मी त्याच्या प्रवेश परीक्षेचा फॉर्म भरला. ज्या दिवशी त्याचा निकाल लागला, त्याच वेळी मला पुढील शिक्षणासाठी अमेरिकेत शिष्यवृत्ती मिळाली होती. मी अमेरिकन व्हिसाच्या संदर्भात दिल्लीला आले होते, त्यासोबतच एनएसडीमध्ये प्रवेश घेण्यासाठी मुलाखतही दिली होती. सुदैवाने मला प्रवेश मिळाला.

मी माझ्या कुटुंबातील सदस्यांना सर्वकाही सांगितले. आणि त्यांच्याकडे थिएटरमध्ये काम करण्याची इच्छा बोलून दाखवली. तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटले. मी वेडी झाले आहे, असे सगळे म्हणू लागले. नातेवाईकांनीही खूप टोमणे मारले. या सर्व परिस्थितीतही माझे वडील माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. प्रचंड विरोधानंतरही त्यांनी मला NSD मध्ये प्रवेश घेऊ दिला.

मी NSD मध्ये तीन वर्षे शिकले. मला तिथे शिष्यवृत्तीचे 250 रुपये मिळायचे, त्यात खाण्यापिण्याचा खर्च निघायचा. इथून क्वॉलिफाय झाल्यानंतर मी घरी जाऊ शकत नव्हते. कारण पुन्हा टोमणे मारण्याची मालिका सुरू झाली असती. मी एनएसडीच्या रेपर्टरी कंपनीत प्रवेश घेतला आणि वेगवेगळ्या ठिकाणी नाटकं करायला सुरुवात केली. मला येथे काम करण्यासाठी महिन्याला 600 रुपये मिळायचे. राहण्यासाठी एनएसडीकडूनच वसतिगृह मिळाले होते, जिथे घर नसलेले कलाकार राहत असत. मी सुद्धा तिथे राहायचे आणि कामाच्या शोधात ठिकठिकाणी भटकायचे.

1984 मध्ये मनोहर श्याम जोशी देशातील पहिली मालिका 'हम-लोग' बनवत होते. मला त्यात 'छुटकी' या भूमिकेची ऑफर मिळाली होती, पण मला थिएटर सोडावे लागेल असे सांगण्यात आले. मला थिएटरपासून वेगळे व्हायचे नव्हते म्हणून मी स्पष्टपणे नकार दिला.

5-6 वर्षांनी मनोहर श्याम जोशी 'हमराही' हा टीव्ही शोमध्ये काम करत होते. दिग्दर्शकाने त्यांना कलाकार हवे असल्याचे सांगितले. त्यावर मनोहर श्याम जोशी दिग्दर्शकाला म्हणाले – माझ्या नजरेत एक कलाकार आहे, पण ती जरा वेडी आहे, तिच्याशी बोलून बघा, कदाचित ती काम करेल.’’ दिग्दर्शक माझ्याशी बोलले. तोपर्यंत माझे लग्न झाले होते आणि मी एका मुलाची आई होते. माझे पती ज्ञान शिवपुरी हे चित्रपटसृष्टीतील होते, ओम शिवपुरी हे त्यांचे चुलत भाऊ होते. या ऑफरने माझे पती खूप खूश झाले आणि त्याच्या सांगण्यावरूनच मी मुंबईला आले. 'हमराही'मधील 'देवकी भौजाई'चे पात्र लोकांना खूप आवडले.

एक दिवस अचानक मला दिग्दर्शक सूरज बडजात्या यांचा फोन आला. ते म्हणाले की, ते एक चित्रपट बनवत आहे, ज्यामध्ये माझीही भूमिका आहे. मला भूमिकेसाठी विचारणा करण्यामागील कारण म्हणजे त्यांनी माझे काम एका नाटकात पाहिले होते, ज्यात मी मुस्लिम पात्र साकारले होते. माझ्या उर्दूने प्रभावित होऊन त्यांनी मला 'हम आपके है कौन' मध्ये काम दिले.

शूटिंगच्या पहिल्या दिवशी मी सेटवर पोहोचले तेव्हा जवळपास 60 खुर्च्या रांगेत लावलेल्या होत्या. सगळ्या कलाकारांची त्यावर नावं लिहिली होती, माझेही नाव एका खुर्चीवर लिहिले होते. सूरज बडजात्या यांनी माझी माधुरी दीक्षितशी ओळख करून दिली. मी त्यावेळी तिला पहिल्यांदाच भेटले होते. मला पाहताच ती तिच्या खुर्चीवरून उठली, अतिशय नम्रपणे आणि प्रेमाने माझ्याशी बोलली. बाकी कलाकारही भेटले, पण सलमान त्यावेळी सेटवर पोहोचला नव्हता.

शूटिंग सुरू झाले, आम्ही पहिला शॉट देत होतो. मग सलमान आला आणि त्याने मला अचानक उचलून घेत मला 'चच्ची जान' म्हणू लागला. मला भीती वाटली कारण तो स्क्रिप्टचा भाग नव्हता. मी त्याला याआधी कधीही भेटले नव्हते. पण इतकी वर्षे रंगभूमीवर काम केले होते, त्यामुळे चेहऱ्यावर वेगळे भाव न आणता तो सीन मी पूर्ण केला. शॉट संपल्यानंतर मी त्याच्याशी पहिल्यांदा बोलले. आम्ही जेव्हा उटीमध्ये चित्रपटाचे शूटिंग करत होतो तेव्हा सर्वजण पहाटे 4 वाजता तयार व्हायचो. माझ्या कारकिर्दीतील हा पहिला हिट चित्रपट होता.

त्यानंतर मी 'हसरतें' हा टीव्ही शो करायला सुरुवात केली. दरम्यान, मला आदित्य चोप्रांचा फोन आला आणि ते म्हणाले की, मी यश चोप्रा यांचा मुलगा आदित्य बोलत आहे. मी DDLJ हा चित्रपट बनवत आहे, ज्यामध्ये मला तुम्हाला कास्ट करायचे आहे, असे ते म्हणाले. मी म्हणाले- ठीक आहे, मी नूर बंगल्यात शूटिंग करत आहे, तुम्ही तिथे येऊन मला भेटा. एवढ्या मोठ्या दिग्दर्शकाशी मी असे बोललो होते, आज जेव्हा मला हा प्रसंग आठवतो तेव्हा मला स्वतःवरच हसू येतं आणि सोबतच लाजही वाटते.

आदित्य तिथे आले आणि मला भेटले, चित्रपटाची कथा सांगितली, जी मला खूप आवडली आणि मी चित्रपट करण्यास होकार दिला. शूटिंगदरम्यान शाहरुख खान मला पहिल्यांदा भेटला तेव्हा त्याने स्वतःची ओळख करून दिली. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान माझ्या पतीचा मृत्यू झाला, त्यामुळे मी क्लायमॅक्स सीनमध्ये दिसले नाही. हा चित्रपटही हिट ठरला, त्यानंतर माझ्याकडे ऑफर्सची रिघ लागली.

मी सतीश कौशिक यांच्यासोबत 'साजन चले ससुराल' या चित्रपटात काम केले होते. मी या चित्रपटात काम करत आहे हे कळल्यावर ते नाराज झाले. असे चित्रपट केल्याने मी टाइप कास्ट होईल, अशी भीती त्यांना वाटत होती. पण जेव्हा त्यांनी माझी भूमिका पाहिली आणि लोकांनी केलेले कौतुक ऐकले तेव्हा त्यांनीही माझी खूप प्रशंसा केली.

सतीश कौशिक यांच्या पत्नी आणि मुलीसोबत हिमानी शिवपुरी.
सतीश कौशिक यांच्या पत्नी आणि मुलीसोबत हिमानी शिवपुरी.

मी सलमानसोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले. एकदा आम्ही 'बीवी नंबर 1'चे शूटिंग करत होतो. तो बराच वेळ सेटवर आला नाही, मग मी करिश्मा आणि मुलांसोबत शूटिंग सुरु केले. मग अचानक तो आला आणि शूटच्या मध्येच त्याने मला अचानक मिठी मारली आणि माझे चक्क लाड करु लागला. मग दिग्दर्शकाच्या सांगण्यावरून त्याने मला शॉट देऊ दिला.

या चित्रपटाचे काही सीक्वेन्स आम्ही फ्लोरिडामध्ये शूट करत होतो. एक दिवस पुन्हा तो बराच वेळ सेटवर आला नाही, त्यामुळे मला सांगण्यात आले की, शूटिंग नंतर होईल. फावला वेळ असल्याने मी जवळच्याच मॉलमध्ये खरेदीला गेले. तेवढ्यात असिस्टंट डायरेक्टर मला शोधत आला आणि म्हणाला- चलिये आप का शॉट तैयार है. जेव्हा मी सेटवर परतले तेव्हा डेव्हिड धवन माझ्यावर चिडले. चिडून मला म्हणाले की, इथे तुम्ही शूटिंगसाठी आलात की खरेदीसाठी. हे ऐकून मला खूप रडू कोसळले. त्यांनी सलमानचा सगळा राग माझ्यावर काढला होता. पण तरीही सलमानसोबत काम करताना खूप मजा आली, पण त्याच्यामुळे मला ओरडाही ऐकावा लागला होता.

'हम आपके है कौन' या चित्रपटात सलमानसोबत डान्स करताना हिमानी शिवपुरी.
'हम आपके है कौन' या चित्रपटात सलमानसोबत डान्स करताना हिमानी शिवपुरी.

अनुपम खेर यांच्यासोबतही मी बराच वेळ घालवला. NSD मध्ये ते आमचे सिनिअर होते. संघर्षाच्या दिवसांत आम्ही त्यांना भेटायचो, त्यांच्या संघर्षाच्या कथा सांगून ते आम्हाला प्रेरित करायचे. मागूनच काम मिळते, असेही ते आम्हाला गमतीने सांगायचे.

सध्या मी 'हप्पू की उलटन पलटन' या टीव्ही शोमध्ये कटोरी देवीची भूमिका साकारत आहे. शोची कथा संजय आर कोहली आणि रघुवीर शेखावत यांनी लिहिली आहे. या जोडीनेच 'भाबी जी घर पर है'ची कथा देखील लिहिली आहे. मी 'भाबी जी घर पर है' हा शो खूप बघायचे. एके दिवशी मला शशांक बाली यांचा फोन आला आणि त्यांनी मला या शोमध्ये काम करण्याची ऑफर दिली. शोची कथा आणि व्यक्तिरेखा जाणून घेतल्यानंतर मी त्यात काम करण्यासाठी होकार दिला आणि अजूनही या शोचा मी एक भाग आहे.