आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मदतीचा हात:जॅकलीन फर्नांडीसने केली मुक्या प्राण्यांची मदत, भटक्या जनावरांपर्यंत पोहोचवले अन्न

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जॅकलीनने सोशल मीडिया अकाउंटवर फोटो शेअर केले आहेत.

जॅकलीन फर्नांडीसने समाजाच्या तळागाळात पोहोचून काम करण्यासाठी नुकतीच एका फाउंडेशनची सुरुवात केली. तिचे 'यू ओनली लिव वन्स' (वायओएलओ) फाउंडेशन अनेक स्वयंसेवी संस्थांसोबत मिळून काम करणार आहे. जॅकलीनने आता मुक्या जनावरांसाठी पुढाकार घेतला असून हे गरीब प्राणी माणसांसारखी मदत नाही मागू शकत.

जॅकलीनने नुकतीच फिलाइन फाउंडेशनला भेट दिली, ज्याचे काही फोटो तिने आपल्या सोशल मीडियावर शेअर केले, फिलाइन ही एक अशी सामाजिक संस्था आहे जी भटक्या जनावरांची मदत करते.

आपल्या YOLO फाउंडेशनच्या माध्यमातून समाजोपयोगी कार्य सुरु ठेवत, जॅकलीनने नुकतीच रोटी बँक फाउंडेशनलाही भेट दिली होती. याशिवाय ती मुंबई पोलिस दलासाठी मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप करणार असून या कठीण काळात तिने भटक्या जनावरांच्या सहाय्यासाठी पुढाकार घेतला आहे.

बातम्या आणखी आहेत...