आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रत्युत्तर:नीतू सिंगनी केले रणबीरची एक्स गर्लफ्रेंड कतरिनाला टार्गेट, अभिनेत्रीच्या आईने दिले सडेतोड उत्तर

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्येष्ठअभिनेत्री नीतू कपूर यांनी अलीकडेच सोशल मीडियावर रिलेशनशिप आणि लग्नासंदर्भात एक पोस्ट शेअऱ केली होती. या पोस्टमधून त्यांनी थेट नाव न घेता अभिनेत्री कतरिना कैफला टार्गेट केले होते. आता कतरिनाची आई सुझान टरकोट यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत नीतू यांना सडेतोड उत्तर दिले आहे.

नीतू कपूर यांनी सोशल मीडियावर एक क्रिप्टीक पोस्ट शेअर केली होती. नेटकऱ्यांच्या मते त्यांनी ही पोस्ट रणबीरच्या एक्स गर्लफ्रेंडवर निशाणा साधण्यासाठी लिहिली होती. नीतू यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले, "7 वर्षे डेटिंग केल्याचा अर्थ असा नाही की तो तुमच्याशी लग्न करेल. माझ्या काकांनी 6 वर्षे मेडिकलचा अभ्यास केला पण ते आता डीजे आहेत." या पोस्टचा संबंध नेटकऱ्यांनी कतरिना कैफसोबत जोडला आहे. कारण सर्वांनाच माहिती आहे की, रणबीर कपूरने कतरfना कैफला तब्बल 7 वर्षे डेट केले होते. परंतु त्यांचे लग्न होऊ शकले नाही.

कतरिनाच्या आईने दिले उत्तर
नीतू कपूर यांची ती पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली होती. दरम्यान आता कतरिना कैफच्या आईनेसुद्धा एक पोस्ट शेअर केली आहे. जी नीतू कपूर यांच्या पोस्टला सडेतोड उत्तर देण्यासाठी असल्याचे म्हटले जात आहे.

कतरिनाची आई सुझान टरकोट यांनी कुणाच्याही नावाचा उल्लेख न करता पोस्ट शेअर केली. यात त्यांनी लिहिले, 'मला बालपणापासून असे संस्कार मिळाले आहेत, जिथे सफाई कामगारलासुद्धा तोच आदर आणि सन्मान दिला जातो जो एका कंपनीच्या सीइओला दिला जातो.'. ही पोस्ट आता सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

नेटकऱ्यांना आवडला कतरिनाच्या आईचा अंदाज
नीतू यांच्या पोस्टला चोख उत्तर दिल्याने नेटकरी कतरिनाच्या आईचे कौतुक करत आहेत. यावर प्रतिक्रिया देताना एका चाहत्याने लिहिले, 'हे पोस्ट करण्यासाठी यापेक्षा चांगली वेळ असू शकत नाही. जशी आई, तशी मुलगी! अगदी परफेक्ट!'

आणखी एका चाहत्याने लिहिले - 'आणि तुम्ही हीच गोष्ट तुमच्या मुलांनाही शिकवली आहे. कदाचित तुमच्या शिकवणीमुळेच मी कतरिनाचा इतका आदर करतो.' एका चाहत्याने लिहिले - 'तुम्ही त्यांना अप्रतिम प्रत्युत्तर दिले आहे.'

कतरिना कैफ आणि रणबीर कपूर जवळपास सात वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. मात्र 2016 मध्ये ते वेगळे झाले. कपूर कुटुंबातील अनेक कार्यक्रमांमध्येही कतरिना अनेकदा स्पॉट झाली होती.