आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बर्थडे स्पेशल:मल्लिला शेरावतला IAS बनवू इच्छित होते वडील, इंडस्ट्रीत पाऊल ठेवण्यापूर्वीच झाले होते लग्न; जाणून घ्या काय आहे खरे नाव

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मल्लिकाला तिच्या वडिलांपेक्षा आईचा नेहमीच पाठिंबा मिळाला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावत हिने वयाची 44 वर्षे पूर्ण केली आहे. 24 ऑक्टोबर 1976 रोजी हरियाणाच्या पंजाबी कुटुंबात जन्मलेल्या मल्लिकाचे खरे नाव रीमा लांबा आहे. सिनेसृष्टीत पदार्पण केल्यानंतर तिने स्वतःचे नाव बदलून मल्लिका असे ठेवले. मल्लिका वडिलांचे नव्हे तर आईच्या माहेरचे आडनाव आपल्या नावापुढे लावते. मल्लिकाला तिच्या वडिलांपेक्षा आईचा नेहमीच पाठिंबा मिळाला आहे. त्यामुळे तिने लांबा ऐवजी शेरावत हे आडनाव स्वीकारले.

मल्लिका 2018 मध्ये 'ख्वाहिश द स्टोरी' या वेबसीरिजमध्ये झळकली होती. दिग्दर्शक गोविंद मेनन यांच्या 'ख्वाहिश' (2003) या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. मात्र तिला खरी ओळख 2004 मध्ये आलेल्या 'मर्ड'र या चित्रपटातून मिळाली होती. 2015 मध्ये आलेल्या डर्टी पॉलिटिक्स हा तिचा शेवटचा बॉलिवूड चित्रपट आहे.

मल्लिकाला खासगी आयुष्यात बरेच चढउतार बघावे लागले. असे म्हटले जाते, की मल्लिकाच्या सिनेसृष्टीतील पदार्पणाला तिच्या वडिलांचा विरोध होता. पण आता त्यांचे नाते सामान्य झाले आहे.

  • IAS बनवू इच्छित होते वडील

हरियाणातील रोहतक येथील एका जाट कुटुंबात मल्लिकाचा जन्म झाला. हरियाणातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आणि स्वातंत्र्यसैनिक सेठ छाज्जू राम यांच्या कुटुंबातून ती आहे.

मल्लिकाचे वडील मुकेश लांबा यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, 'तिने आयएएस व्हावे अशी माझी इच्छा होती, मात्र तिला अभिनयात रुची होती. तिने अभिनय क्षेत्रात येऊ नये, असे माझा मत होते. म्हणूनच चिडून मी तिला लांबा हे आडनाव वापरु नको, असे म्हटले होते.'

  • 2000 मध्ये झाले होते लग्न

मल्लिकाचे 2000 साली पायलट करण सिंह गिलसोबत लग्न झाले होते. वर्षभरच दोघांचे लग्न टिकले होते. सिनेसृष्टीत काम मिळवण्यासाठी मल्लिका हरियाणा सोडून मुंबईत स्थायिक झाली. असेही म्हटले जाते, की मल्लिकाला एक मुलगा आहे. पण यामागचे सत्य कुणालाही ठाऊक नाही.

एअरहोस्टेस होती मल्लिका

  • मल्लिका शेरावत चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी एअरहोस्टेस होती.
  • तिने बॉलिवूडमध्ये लीड अॅक्ट्रेस म्हणून पदार्पण करण्यापूर्वी करीना कपूर आणि तुषार कपूर स्टारर 'जीना सिर्फ मेरे लिए' या चित्रपटात एक अतिशय छोटी भूमिका साकारली होती. त्यावेळी चित्रपटाच्या क्रेडिटमध्ये तिच्या नावाचा उल्लेख रीमा लांबा असा करण्यात आला होता.
  • 2004 साली आलेल्या 'मर्डर' या चित्रपटातून मल्लिकाला खरी ओळख मिळाली. या चित्रपटात तिने इमराम हाश्मीसोबत अनेक बोल्ड सीन दिले होते.
  • मल्लिकाने 'शादी से पहले' (2006), 'वेलकम' (2007), 'डबल धमाल' (2011) आणि 'डर्टी पॉलिटिक्स' (2015) सह अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे.