आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री परिणीती चोप्रा आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्ढा यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपासून दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट केले गेले. दरम्यान आता लवकरच दोघांचा साखरपुडा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात दोघे साखरपुडा करणार असल्याचे म्हटले जात आहे. हा सोहळा अतिशय खासगी ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
दिल्लीत होणार सोहळा, प्रियांका सहभागी होणार
‘हिंदुस्तान टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, परिणीती आणि राघव चड्ढा यांचा साखरपुडा एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दिल्लीत पार पडणार आहे. यासाठी दोघांच्याही घर जय्यत तयारी सुरू आहे. साखरपुडा समारंभाला कुटुंबीय आणि मित्रपरिवार असे मोजकेच पाहुणे उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे परिणीतीची चुलत बहीण प्रियांका चोप्राही पती निक जोनस व मुलगी मालती मेरीसह भारतात आली आहे. परिणीतीच्या साखरपुडा समारंभाला ते उपस्थितीत राहू शकतील अशा पद्धतीनेच त्यांनी भारतातील ट्रीपचं प्लॅनिंग केले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
नुकतीच परिणीती चोप्रा मनीष मल्होत्राच्या घरी पोहोचली होती
जरी कुटुंबातील कोणीही अद्याप या नात्याबद्दल अधिकृत दुजोरा दिलेला नसला तरी, लग्नाच्या अफवांमध्ये परिणीती चोप्रा नुकतीच मनीष मल्होत्राच्या घराबाहेर दिसली. सिद्धार्थ मल्होत्राशिवाय कियारा आडवाणीही तिच्यासोबत दिसली होती.
या सेलिब्रिटींनी केली परिणीती-राघवच्या नात्याची पुष्टी
परिणीती आणि राघव अद्याप त्यांच्या नात्याविषयी मौन बाळगून आहेत. पण त्यांच्याशी संबंधित अनेकांनी त्यांच्या नात्याला दुजोरा दिला आहे. अलीकडेच गायक आणि अभिनेता हार्डी संधू याने दोघांच्या लग्नाच्या वृत्ताला दुजोरा दिला. तो म्हणाला की, "मी परिणीतीसाठी खूप आनंदी आहे, मी तिला शुभेच्छा देतो. मी तिचे फोनवर अभिनंदनही केले आहे." हार्डी संधू आणि परिणीती यांनी 'कोड नेम : तिरंगा' या चित्रपटात एकत्र काम केले आहे. तो म्हणाला, "कोड नेम तिरंगा या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान परिणीती आणि माझ्यात लग्नाबद्दल चर्चा झाली होती. तेव्हा ती नेहमी म्हणायची की, जेव्हा मला वाटेल की मला योग्य व्यक्ती सापडली आहे तेव्हाच मी लग्न करेल."
'आप'च्या खासदाराने ट्वीट शेअर करुन दिल्या दोघांना शुभेच्छा
आम आदमी पार्टीचे खासदार संजीव अरोरा यांनी नुकतेच एक ट्वीट शेअर केले. या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिले, 'मी परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांचे मनापासून अभिनंदन करतो. तुम्ही आनंदी राहा. तुम्हाला शुभेच्छा.' या ट्वीटमध्ये संजीव अरोरा यांनी परिणीती आणि राघव यांचा फोटो देखील शेअर केला आहे. संजीव अरोरा यांच्या या ट्वीटने अनेकांचे लक्ष वेधले.
परिणीतीला नको होता राजकारणी जोडीदार
बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा सध्या आप नेते राघव चड्ढा यांच्यासोबतच्या नात्यामुळे चर्चेत आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात दोघे दिल्लीत साखरपुडा करणार असल्याचे वृत्त आहे. दरम्यान परिणीतीची एक जुनी मुलाखत व्हायरल होत आहे. त्या मुलाखतीत अभिनेत्रीने राजकारणाशी संबंधित व्यक्तीशी लग्न करणार नसल्याचे म्हटले होते. येथे वाचा संपूर्ण बातमी...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.