आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'जुडवा'च्या अभिनेत्रीचा वाढदिवस:रंभाने शिक्षण सोडून वयाच्या 16 व्या वर्षी सिनेसृष्टीत ठेवले होते पाऊल, करिअर यशोशिखरावर असताना थाटले लग्न आता परदेशात स्थायिक

15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जाणून घ्या रंभाच्या खासगी आयुष्याविषयी...

सलमान खान स्टारर जुडवा (1997) या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री रंभा हिचा आज वाढदिवस असून तिने वयाची 45 वर्षे पूर्ण केली आहेत. रंभाचा जन्म 5 जून 1975 रोजी आंध्रप्रदेशातील विजयवाडा येथे झाला. तिचे खरे नाव विजयलक्ष्मी आहे. 1992 मध्ये आलेल्या आ ओकट्टी अडक्कू या तेलुगु चित्रपटातून रंभाने सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. 17 बॉलिवूड आणि 100 हून अधिक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये झळकलेली रंभा आता ग्लॅमर विश्वापासून दूर आपल्या मुलांच्या संगोपनात व्यस्त आहे.

वयाच्या 16 व्या वर्षी केले होते पदार्पण
कमी वयात सिनेसृष्टीत पदार्पण करणा-या अभिनेत्रींपैकी रंभा एक आहे. तिने वयाच्या 16 व्या वर्षी अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले होते. शिक्षण सोडून रंभाने करिअरच्या सुरुवातीच्या काळात दाक्षिणात्य सिनेमांत काम केले. 1995 मध्ये 'जल्लाद' या चित्रपटाद्वारे ती बॉलिवूडकडे वळली. 'दानवीर', 'जंग', 'कहर', 'जुडवा', 'सजना', 'घरवाली बाहरवाली', 'बंधन', 'मैं तेरे प्यार में पागल', 'क्रोध', 'बेटी नंबर वन', 'दिल ही दिल में', 'प्यार दीवाना होता है' सह ब-याच हिंदी चित्रपटांत तिने काम केले. सलमानसह रजनीकांत, गोविंदा, अक्षय कुमार, अजय देवगण, मिथून चक्रवर्ती या सुपरस्टार्ससोबत तिने काम केले आहे. रंभा दीर्घ काळापासून सिनेसृष्टीपासून दूर आहे. ती शेवटची 2011 मध्ये आलेल्या फिल्मस्टार या मल्याळम चित्रपटात झळकली होती.

बिझनेसमन सोबत थाटला संसार
चित्रपटांपासून दूर असलेल्या रंभाने 8 एप्रिल 2010 मध्ये इंद्र कुमार पद्मनाथनसोबत विवाह केला. इंद्र मॅजिकवुड्स नावाच्या कंपनीचे सीईओ आहेत. कॅनडातील ही कंपनी किचन कॅबिनेट आणि बाथरुम व्हॅनिटीज बनवते. रंभा तिचे पती आणि तीन मुलांसह आता कॅनडात स्थायिक झाली आहे.

13 जानेवारी 2011 रोजी रंभाने पहिली मुलगी लान्या आणि 31 मार्च 2015 रोजी लहान मुलगी साशाला जन्म दिला. 2018 मध्ये तिच्या मुलाचा जन्म झाला.

कोर्टाने पाठवला होता समन्स
हैदराबाद पोलिसांनी जानेवारी 2017 मध्ये रंभाला कोर्टात हजर राहण्यासाठी समन्स पाठवला होता. रंभा आणि तिच्या कुटुंबियांविरुद्ध तिच्या भावाची पत्नी पल्लवीने 2014 मध्ये हुंड्यासाठी त्रास दिल्याचा आरोप केला होता. पल्लवी आणि रंभाच्या भावाचे लग्न 1999 मध्ये झाले होते.

आत्महत्येच्या वृत्तावर रंभाने दिले होते स्पष्टीकरण
2008 मध्ये रंभाला बेशुद्धावस्थेत हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. यानंतर अशी चर्चा रंगली होती की, रंभाने आत्महत्येचा प्रयत्न केला. पण याचे खंडन करत रंभाने तिला केवळ उपवास केल्याने चक्कर आल्याचे सांगितले होते.

बातम्या आणखी आहेत...