आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिल्पा शेट्टीच्या पतीला अटक:मुंबई कोर्टाने राज कुंद्रा आणि रयान थारपला सुनावली 23 जुलैपर्यंत कोठडी, शिल्पा शेट्टीची होऊ शकते चौकशी

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • संपूर्ण प्रकरण काय आहे?

अश्लील चित्रफिती, चित्रपट बनवून ते ॲपवर अपलोड केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अटक केली आहे. मंगळवारी त्याला कोर्टात हजर करण्यात आले. तिथे त्याला आणि त्याचा साथीदार रयान थारप यांना 23 जुलैपर्यंत न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आता राज कुंद्रा भायखळा तुरुंगात आहे. कोठडीत सुनावल्यानंतर पोलिस आरोपींना येथे ठेवतात आणि त्यांची चौकशी करतात.

याप्रकरणातील मोठे अपडेट म्हणजे, आता पोलिस शिल्पा शेट्टी हिचीदेखील चौकशी करु शकतात. कारण राज कुंद्राच्या ब-याच बिझनेसमध्ये ती पती राज कुंद्राची पार्टनर आहे. मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा लवकरच शिल्पा शेट्टीला चौकशीसाठी हजर राहण्यास समन्स बजावू शकते, असे सांगितले जात आहे.

मंगळवारी न्यायलयात हजर कऱण्यापूर्वी पोलिसांनी राज कुंद्राला मुंबई पोलिस आयुक्त कार्यालयातून पहाटे चार वाजता वैद्यकिय तपासणीसाठी जेजे रुग्णालयात नेले होते.

जेजे रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले असतानाचे फोटो
जेजे रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले असतानाचे फोटो

मिडल इस्टच्या पोर्न माफियांचा कॉल इंटरसेप्ट केला
गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलने मुंबईतील अज्ञात व्यक्ती आणि मध्यपूर्वेतील एक पोर्न माफिया यांच्यातील काही कॉल एक्सचेंज इंटरसेप्ट केले आहेत. ती व्यक्ती अमेरिकेन नागरिक आहे. काही मुलींचे जबाबही नोंदविण्यात आले आहेत. या मुलींनी खुलासा केला आहे की, त्या आंतरराष्ट्रीय पोर्नोग्राफी रॅकेटच्या सापळ्यात अडकल्या होत्या. पोर्न माफियाचे लोक मुलींना ब्लॅकमेल करत आणि चित्रपटात काम करण्यास भाग पाडत असत. चित्रपटांमध्ये काम करण्यापूर्वी त्यांची को-या स्टँप पेपरवर सही घेतली जायची.

या प्रकरणात कुंद्रा यांच्यासह 11 जणांना अटक
मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी सांगितल्यानुसार, राज कुंद्रा हा या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आहे आणि आमच्याकडे त्याच्याविरुद्ध ठोस पुरावे आहेत. त्याला अटक करून चौकशी केली जात आहे. यापूर्वी राज कुंद्राला चौकशीसाठी गुन्हे शाखेने बोलवले होते. गुन्हे शाखेचे प्रॉपर्टी सेल त्याच्याकडे चौकशी करत असल्याचे सांगण्यात आले. मात्र, अटकेनंतर पोलिसांनी पोर्नोग्राफीचा खुलासा केला. या प्रकरणात आतापर्यंत कुंद्रासह 11 जणांना अटक करण्यात आली आहे. सोमवारी रात्री नऊ वाजता राज कुंद्रा चौकशीसाठी मुंबईच्या भायखळा स्थित गुन्हे शाखेच्या कार्यालयात पोहोचला होता. यानंतर सोमवारी रात्री दोन तासांच्या चौकशीनंतर 11 वाजताच्या राज कुंद्राला गुन्हे शाखेच्या अधिका-यांनी अटक केली.

कुंद्राने आपल्या पॉर्न कंपनीत 10 कोटींची गुंतवणूक केली
मुंबई गुन्हे शाखेच्या माहितीनुसार, राजविरोधात यावर्षी फेब्रुवारी महिन्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. राज कुंद्राने पॉर्न फिल्म इंडस्ट्रीमध्ये 8 ते 10 कोटींची गुंतवणूक केली होती. राज कुंद्रा आणि ब्रिटनमध्ये वास्तव्याला असलेल्या त्याच्या भावाने केनरिन नावाची कंपनी स्थापन केली आहे. चित्रपटांचे व्हिडिओ भारतात शूट केले गेले होते आणि वी ट्रान्सफर (ही एक फाईल ट्रान्सफर सर्व्हिस आहे) च्या माध्यमातून केनरिनला पाठवले गेले होते. ही कंपनी राज कुंद्रानेच स्थापन केली असून त्याची नोंदणी परदेशात केली, जेणेकरुन भारताच्या सायबर लॉपासून स्वतःचा बचाव करता येईल.

असे समोर आले प्रकरण ?
मुंबई पोलिसांनी फेब्रुवारी महिन्यात अभिनेत्री गहना वशिष्ठसह सहा लोकांना अटक केली होती. त्यानंतर आणखी तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर एफआयआर नोंदवला गेला होता. कथितरित्या कलाकारांना अश्लील चित्रपटांसाठी न्यूड सीन करण्यास भाग पाडले जात असल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी ही कारवाई केली होती. त्यावेळी चित्रफिती पेड मोबाइल अप्लिकेशनवर रिलीज करण्यात येत असल्याचे तपासात समोर आले होते. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी उमेश कामत नावाच्या व्यक्तीला अटक केली होती. कामतच्या अटकेनंतर चौकशीत या प्रकरणाचा प्रमुख सुत्रधार राज कुंद्रा असल्याचे तपासात समोर आले आहे.

बातम्या आणखी आहेत...