आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बॉलिवूडची 'देसी गर्ल' प्रियांका चोप्राने न्यूयॉर्कमध्ये स्वतःचे रेस्तराँ सुरु केले आहे. सोना असे तिने आपल्या रेस्तराँचे नाव ठेवले असून येथे भारतीय पदार्थांची चव लोकांना चाखायला मिळणार आहे. याची माहिती स्वतः प्रियांकाने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली आहे. प्रियांकाप्रमाणेच बॉलिवूडमधील अनेक नावाजलेल्या अभिनेत्री अभिनयासोबतच स्वत:चा व्यवसायदेखील चालवतात. चला जाणून घेऊया कोणकोणत्या अभिनेत्री बिझनेसवुमदेखील आहेत याविषयी -
बॉलिवूडची सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री दीपिका पदुकोण चित्रपटांव्यतिरिक्त कपड्यांच्या ब्रँड ऑल अबाऊट यू यातूनही चांगली कमाई करते. हे एक ऑनलाइन क्लोदिंग स्टोअर आहे, ज्याची सुरूवात अभिनेत्रीने 2015 मध्ये मिंत्रासोबत केली होती. दीपिकाने 2013 मध्ये वान हुसैनसोबत मिळून महिलांसाठी एक फॅशन ब्रँडसुद्धा सुरू केला होता. दीपिका अनेकदा तिच्या क्लोदिंग ब्रॅण्डला तिच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रमोट करते.
शिल्पा शेट्टी बर्याच वर्षांपासून चित्रपटांपासून दूर रेस्तराँ, स्पा आणि बारचा व्यवसाय करतेय. यासह शिल्पाने काही महिन्यांपूर्वी मुंबईतील वरळी भागात बेस्टियन चेन नावाचे एक नवीन रेस्तराँ सुरू केले आहे. शिल्पा या हॉस्पिटॅलिटी व्यवसायातून कोट्यवधींची कमाई करते. याशिवाय शिल्पा आयपीएल टीम राजस्थान रॉयल्सची मालकीणही आहे.
आलिया भट्ट चित्रपटांसह स्टार्टअपमध्ये सातत्याने गुंतवणूक करत आहे. 2013 मध्ये अभिनेत्रीने स्टाईल क्रॅकर नावाने स्टार्टअप सुरू केले. यात आलियाची टीम लोकांना स्टाईल करते. याशिवाय आलियाने 2020 मध्ये एड-ए-मम्मा (Ad-E-Mamma) नावाची स्वतःची कंपनी सुरू केली आहे. हा एक किड फॅशन ब्रँड आहे. जिथे 4 ते 12 वर्षे वयोगटातील मुलांसाठीचे कपडे मिळतात.
'टायगर जिंदा है' आणि 'भारत' यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये झळकलेली अभिनेत्री कतरिना कैफ एक यशस्वी उद्योजिका आहे. अभिनेत्रीने 2019 मध्ये 'के ब्यूटी' (Kay Beauty) नावाने आपला ब्युटी ब्रँड लॉन्च केला. यासाठी तिने मेकअप ब्रँड नायका (Nykaa) बरोबर करार केला आहे. या अभिनेत्रीने बर्याच वर्षांपासून या व्यवसायाची तयारी केली होती, जी तिने मागील वर्षी सुरू केली. कतरिनाच्या या मेकअप ब्रँडला चांगली पसंती मिळत आहे.
आर्या या वेब सीरिजमधून दमदार पुनरागमन करणारी सुष्मिता सेन अभिनयाशिवाय आपल्या व्यवसायातूनही कमाई करते. या अभिनेत्रीचा दागिन्यांचा व्यवसाय आहे जो सध्या तिची आई सांभाळत आहे. यासोबतच सुष्मिताचे तंत्र एंटरटेन्मेंट नावाचे स्वत:चे प्रॉडक्शन हाऊसदेखील आहे. बंगाली ब्युटी सुष्मिता मुंबईत एक रेस्तराँदेखील चालवते. तेथील बंगाली पदार्थ लोकप्रिय आहेत.
चित्रपटांपासून दूर असलेल्या करिश्मा कपूरच्या उत्पन्नाचा स्रोत व्यवसाय आहे. करिश्मा बेबी क्लोदिंग स्टोअर चालवते. येथील लहान मुलांच्या गरजेच्या सर्व वस्तू मिळतात.
बॉलिवूड अभिनेत्री आणि माजी मिस युनिव्हर्स लारा दत्ताने तिचा साडी ब्रांड लाँ केला आहे. यासाठी साराने साडीचा लोकप्रिय ब्रँड छाबरा 555 बरोबर करार केला आहे. यासोबतच लाराने आपली परफ्यूम लाईनदेखील लाँच केली आहे. लाराची स्वत: ची प्रोडक्शन कंपनी असून 'भीगी बसंती' हे त्याचे नाव आहे.
लग्नानंतर चित्रपटांपासून दूर असलेल्या ट्विंकल खन्नाने पुस्तके लिहून खूप नाव कमावले आहे. तिने लिहिलेल्या मिसेस फनी बोन्स आणि द लीजेंड ऑफ लक्ष्मीप्रसाद या पुस्तकांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. याशिवाय, ट्विंकल पार्टनरशिपमध्ये इंटिरियर डिझायनिंगचा व्यवसायही करते. ट्विंकलची बिझनेस पार्टनर तिची मैत्रिण गुरलीन मनचंदा आहे. ट्विंकलने अक्षय कुमारचा पॅडमॅन या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सनी लिओनी एक नव्हे तर दोन व्यवसाय सांभाळते. पॉर्न स्टार राहिलेल्या सनीने 2013 मध्ये एक ऑनलाइन एडल्ट स्टोअर (IMbesharm.com) सुरु केले होते. या स्टोअरमधून सेक्स टॉय, सेक्सी कॉश्च्युम, स्विम वेअर, पार्टी वेअर कॉश्च्युमची विक्री केली जाते. हे भारतातील पहिले कायदेशीर अॅडल्ट स्टोअर आहे.
अभिनयाऐवजी आपल्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असलेली सोनम कपूरने तिची बहीण रिया कपूरबरोबर कपड्यांचा व्यवसाय सुरू केला आहे. त्यांच्या फॅशन ब्रँडचे नाव रीहसोन (RHESON) आहे. यात डिझाइनर कपडे, दागदागिने आणि फुटविअरच्या रेंज उपलब्ध आहेत.
काही वर्षांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने नुश (Nush) नावाची क्लोदिंग लाइन सुरु केली आहे. याशिवाय अनुष्काने तिच्या भावासोबत क्लीन स्लेट फिल्म प्रोडक्शन हाऊससुद्धा सुरू केले आहे. या प्रोडक्शन हाऊसमधून आतापर्यंत एनएच 10, फिल्लौरी आणि परी या चित्रपटांची निर्मिती झाली आहे. या प्रोडक्शनची पाताल लोक ही वेब सीरिजही लोकप्रिय झाली आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.