आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा2022 हे वर्ष बॉलिवूडसाठी तसे निराशाजनकच गेले. आता 2023 कडून मनोरंजनसृष्टीला मोठ्या आशा आहेत. यावर्षी चित्रपटगृहांत 20 हून अधिक बिग बजेट चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. याची सुरुवात होणारेय शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणच्या 'पठाण'पासून. तर वर्षाचा शेवटदेखील शाहरुखच्याच 'डंकी'ने होणारेय. सलमान खान, अक्षय कुमार, जॉन अब्राहम, रणबीर कपूर आणि कार्तिक आर्यन यांच्या चित्रपटांचाही रिलीज चार्टमध्ये समावेश आहे. दुसरीकडे 2023 हे वर्ष OTT साठी देखील अतिशय खास असणार आहे. यावर्षी 4 मोठ्या हिट वेब सिरीजचा तिसरा सीझन येणार आहे. यामध्ये मिर्झापूर, फॅमिली मॅन, महाराणी आणि आर्या यांचा समावेश आहे. प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर बंदिश बँडिट्स आणि असुरचा दुसरा सीझनही येऊ शकतो.
2023 या वर्षात प्रेक्षकांना चित्रपटगृह आणि OTT वर कोणती मेजवानी मिळणार आहे, ते जाणून घेऊया...
वरीलपैकी बहुतेक चित्रपट आणि वेब सिरीजच्या रिलीजच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.