आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूड अपडेट्स:दाक्षिणात्य अभिनेता प्रदीप केआर यांचे वयाच्या 61 व्या वर्षी निधन, अजय देवगणने 'दृश्यम 2' च्या शूटिंगला केली सुरुवात

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मनोरंजन विश्वातील महत्त्वाच्या घडामोडी...

दक्षिणेतील लोकप्रिय अभिनेते प्रदीप केआर यांचे गुरुवारी वयाच्या 61 व्या वर्षी निधन झाले. केरळमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने प्रदीप यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. केआर त्यांच्या चाहत्यांमध्ये कोट्टयम प्रदीप या नावाने प्रसिद्ध होते. त्यांच्या निधनामुळे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. रिपोर्ट्सनुसार, प्रदीप केआर यांना दोन मुले आहेत. त्यांच्या पत्नीचे नाव माया आहे. दिग्दर्शक पृथ्वीराज सुकुमारन, जॉन महेंद्रन यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. प्रदीप यांनी 2001 मध्ये करिअरला सुरुवात केली होती. त्यांनी 70 हून अधिक चित्रपट केले होते. 'ओरू वडक्कन सेल्फी', 'कुंजिरामायणम', 'वेलकम टू सेंट्रल जेल', 'अमर अकबर अँथनी' आणि 'आदी कप्यरे कूटमणी' यांसारख्या अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले होते.

अजय देवगणने 'दृश्यम 2' च्या शूटिंगला केली सुरुवात
अभिनेता अजय देवगणने त्याच्या आगामी 'दृश्यम 2' या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. स्वतः अजय देवगणने सोशल मीडियावर चित्रपटाच्या सेटवरील एक फोटो शेअर करून चाहत्यांना ही माहिती दिली आहे. कॅप्शनमध्ये अजयने लिहिले की, "विजय पुन्हा एकदा त्याच्या कुटुंबाचे रक्षण करू शकेल का? 'दृश्यम 2'चे शूटिंग सुरू झाले आहे." फोटोमध्ये अजयसोबत चित्रपटाची मुख्य अभिनेत्री श्रिया सरनही दिसत आहे. अजयने पोस्टमध्ये तब्बूलाही टॅग केले आहे. म्हणजेच तब्बूही 'दृश्यम-2'चा भाग असणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक पाठक करत आहेत. 2013 मध्ये मल्याळममध्ये 'दृश्यम' रिलीज झाला होता, ज्यामध्ये सुपरस्टार मोहनलाल झळकले होते. हा चित्रपट 2015 मध्ये याच शीर्षकाने हिंदीत आणला गेला. ज्यामध्ये अजय, श्रिया आणि तब्बू मुख्य भूमिकेत दिसले होते. हिंदीतील 'दृश्यम 2' हा मल्याळम चित्रपटाच्या सिक्वेलचा रिमेक असेल असे सांगण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...