आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमिताभ बच्चन स्टारर स्पोर्ट्स-ड्रामा चित्रपट 'झुंड'ची नवीन रिलीज डेट समोर आली आहे. स्वतः अमिताभ यांनी या चित्रपटाचे नवे पोस्टर सोशल मीडियावर शेअर करून चाहत्यांना ही माहिती दिली आहे. पोस्टरच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले की, 'या टोळीशी स्पर्धा करण्यासाठी तयार राहा. आमची टीम येत आहे. 'झुंड' 4 मार्च 2022 रोजी तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे." नागराज पोपटराव मंजुळे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात बिग बी स्लम सॉकरचे संस्थापक विजय बारसे यांची भूमिका साकारत आहेत. ते एका प्रोफेसरच्या भूमिकेत दिसतील, जे मुलांना प्रेरणा देतात. ते झोपडपट्टीतील मुलांचा एक फुटबॉल संघ तयार करतात आणि त्यांना जीवनाचा उद्देश देतात.
प्रभास-पूजा हेगडे यांचा 'राधे श्याम' 11 मार्च 2022 रोजी चित्रपटगृहात दाखल होणार
साऊथचा सुपरस्टार प्रभास आणि पूजा हेगडे स्टारर 'राधे श्याम' या सिनेमाची नवीन रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे. निर्मात्यांनी आता हा चित्रपट 11 मार्च 2022 रोजी प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. हा चित्रपट हिंदी, तेलुगू, तामिळ, कन्नड आणि मल्याळम या 5 भाषांमध्ये सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात प्रभास-पूजा हेगडेशिवाय सचिन खेडेकर, प्रियदर्शी पुलीकोंडा, भाग्यश्री, कुणाल रॉय कपूर यांच्याही मुख्य भूमिका आहेत. के.के राधाकृष्ण कुमार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. वामसी कृष्णा रेड्डी, प्रमोद उप्पलपती आणि भूषण कुमार यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.