आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूड अपडेट्स:अरुणोदय सिंग स्टारर 'अपहरण 2'चा टीझर आऊट, 'विक्रम वेधा' मधील सैफ अली खानचा फर्स्ट लूक आला समोर

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मनोरंजन विश्वातील महत्त्वाच्या घडामोडी...

अरुणोदय सिंग स्टारर 'अपहरण' या वेब सीरिजच्या सीझन 2 चा टीझर रिलीज झाला आहे. निर्मात्यांनी स्वतः त्याचा टीझर त्यांच्या सोशल मीडिया पोस्टवर शेअर केला आहे. अरुणोदय व्यतिरिक्त या सीरिजमध्ये सानंद वर्मा आणि निधी सिंह देखील दिसणार आहेत.

सैफ अली खानचा 'विक्रम वेधा' चित्रपटातील फर्स्ट लूक झाला रिलीज
हृतिक रोशन आणि सैफ अली खान स्टारर 'विक्रम वेधा' या चित्रपटातील विक्रम म्हणजेच सैफचा फर्स्ट लूक रिलीज झाला आहे. स्वतः चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक पुष्कर आणि गायत्री यांनी ही माहिती दिली आहे. सैफचा फोटो शेअर करत त्यांनी लिहिले, 'बघा विक्रम वेधाच्या विक्रमचा हा एक्सक्लूझिव्ह लूक. हा चित्रपट 30 सप्टेंबर रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.'

तापसीचे 4 चित्रपट रिलीजसाठी आहेत तयार
बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूचे 'शाबास मिठू', 'ब्लर', 'दोबारा' आणि 'वो लडकी है कहाँ' हे चार चित्रपट रिलीज होणार आहेत. यासोबतच ती 12 ब्रँड्सनाही एंडोर्स करणार आहे. याबद्दल बोलताना तापसी म्हणाली, 'मी स्वतः वापरत असलेल्या ब्रँडची जाहिरात करायची मला नेहमीच इच्छा होती. मी साइन केलेले सर्व ब्रँड्स मी स्वतः वापरले आहेत, तेही त्यांचा ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर होण्यापूर्वी.' जाहिरात तज्ज्ञांच्या मते, टायर टू आणि टायर थ्री शहरांमध्ये तापसीची अपील अधिक आहे.

बातम्या आणखी आहेत...