आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Bollywood Breaking News Update | Today Latest Trending Entertainment Celebrity News, Gippy Grewal's Carry On Jatta Release Date Announced

बॉलिवूड LIVE अपडेट्स:गिप्पी ग्रेवालच्या 'कॅरी ऑन जट्टा'ची रिलीज डेट जाहीर, रवी तेजाच्या पॅन इंडिया चित्रपटात दिसणार नुपूर सेनन

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मनोरंजन विश्वातील महत्त्वाच्या घडामोडी..

पंजाबी स्टार गिप्पी ग्रेवालच्या 'कॅरी ऑन जट्टा' या चित्रपटाची शूटिंग आणि रिलीजची तारीख जाहीर करण्यात आली आहे. चित्रपटाचे शूटिंग 1 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे, तर 29 जून 2023 रोजी हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. गिप्पी ग्रेवाल 'कॅरी ऑन जट्टा'ची निर्मिती देखील करत आहे.

रवी तेजाच्या पॅन इंडिया चित्रपटात दिसणार नुपूर सेनन
अभिनेत्री कृती सेननची धाकटी बहीण आणि अभिनेत्री नुपूर सेनन आता साऊथ सुपरस्टार रवी तेजाच्या पॅन इंडिया चित्रपट 'टायगर नागेस्वर राव'मध्ये दिसणार आहे. नुकताच तिने रवीचा पहिला पॅन इंडिया चित्रपट साइन केला आहे. ट्रेड अ‍ॅनालिस्ट तरण आदर्श यांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे. वामसी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून 'द कश्मीर फाइल्स'चे निर्माते अभिषेक अग्रवाल याची निर्मिती करत आहेत. टायगर नागेस्वर राव हा चित्रपट तामिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदी या पाच भाषांमध्ये रिलीज होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...