आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Bollywood Breaking News Update | Today Latest Trending Entertainment Celebrity News, Kangana Ranaut's Dhaakad Will Hit The Theaters On May 27

बॉलिवूड अपडेट्स:कंगना रानोटचा 'धाकड' 27 मे रोजी थिएटरमध्ये दाखल होणार, दीपिका पदुकोण मास्कशिवाय विमानतळावर दिसली

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मनोरंजन विश्वातील महत्त्वाच्या घडामोडी...

कंगना रनोटचा बहुप्रतिक्षित 'धाकड' या आगामी चित्रपटाची रिलीज डेट जाहीर झाली आहे. स्वतः कंगनाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर ही माहिती दिली आहे. तिनी लिहिले, 'एजंट अग्नीची शक्ती, जिला कोणीही थांबवू शकत नाही ती वेगाने जवळ येत आहे. अ‍ॅक्शन आणि स्पाय थ्रिलर धाकड 27 मे रोजी हिंदी, तामिळ, तेलुगू आणि मल्याळम या चार भाषांमध्ये चित्रपटगृहांना आग लावणार आहे.'

दीपिका पदुकोण विमानतळावर विनामास्क दिसली, नेटक-यांनी केले ट्रोल
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण नुकतीच बंगळुरूमध्ये तिच्या आई-वडिलांच्या घरी पोहोचली आहे. येथे पोहोचताच पापाराझींनी तिला विमानतळावर आपल्या कॅमे-यात कैद केले. दीपिकाचे विमानतळावरील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये ती विना मास्क दिसतेय, तसेच तिची हँडबॅगही एका बॉडीगार्डकडे होती. हे सर्व पाहून नेटकऱ्यांनी तिला खूप ट्रोल केले. एका यूजरने लिहिले, 'मला आश्चर्य वाटते की हे लोक मास्कशिवाय कसे फिरतात'. तर दुसऱ्या यूजरने लिहिले, 'अरे स्वतःची पर्सदेखील मॅडम उचलू शकत नाहीत.'

बातम्या आणखी आहेत...