आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूड अपडेट्स:आलिया भट्टच्या 'गंगूबाई काठियावाडी'चा दमदार ट्रेलर रिलीज, रितेश आणि जिनिलियाने पुन्हा एकदा दिली गुड न्यूज!

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मनोरंजन विश्वातील महत्त्वाच्या घडामोडी...

आलिया भट्ट, अजय देवगण स्टारर 'गंगूबाई काठियावाडी' या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर 4 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला आहे. ट्रेलरमध्ये कामाठीपुरामध्ये वाढलेल्या गंगूबाईची एका सामान्य महिलेपासून ते माफिया क्वीनपर्यंतची कहाणी दाखवण्यात आली आहे. चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजबद्दल माहिती देताना अभिनेत्री आलिया भट्ट लिहिते, गंगूबाई जिंदाबाद. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये आलियाची दमदार भूमिका पाहायला मिळत आहे. हा चित्रपट आधी 8 जानेवारीला रिलीज होणार होता, मात्र कोविडच्या तिसऱ्या लाटेमुळे तो आता 25 फेब्रुवारीला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

'मिस्टर मम्मी'मध्ये दिसणार रितेश आणि जेनेलिया अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जिनिलिया डिसुझा यांनी त्यांच्या चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. हे दोघेही चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. 'मिस्टर मम्मी' असे त्यांच्या या चित्रपटाचे नाव आहे. जिनिलियाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर ही माहिती दिली आहे. जेनेलिया आणि रितेशच्या चित्रपटाचे पोस्टर समोर आले आहे. ज्यामध्ये दोघेही गरोदर दाखवण्यात आले आहेत. शाद अली या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. भूषण कुमार आणि कृष्ण कुमार या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. पोस्टरनुसार हा एक कॉमेडी चित्रपट असून, हे दोघे बऱ्याच वर्षांनी एकत्र दिसणार आहेत. आज अधिकृत घोषणा झाली असली तरी, दोघांनी आधीच गमतीने चाहत्यांना सांगितले होते की काहीतरी चांगली बातमी येणार आहे.

करीना कपूर चित्रपट निर्माता सुजॉय घोषच्या क्राइम मिस्ट्रीमध्ये दिसणार
करीना कपूर पुन्हा एकदा चित्रपटाच्या सेटवर परतण्यासाठी सज्ज झाली आहे. दिग्दर्शक सुजॉय घोषच्या आगामी क्राइम मिस्ट्रीमध्ये ही अभिनेत्री दिसणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, करीना लेखक केगो हिगाशिनोच्या द डिव्होशन ऑफ सस्पेक्ट एक्सच्या अधिकृत हिंदी रिमेकमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात जयदीप अहलावत आणि विजय वर्मा यांच्याही मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाचे शूटिंग मार्चमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...