आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Bollywood Breaking News Update | Today Latest Trending Entertainment Celebrity News, Sanjay Dutt And Raveena Tandon Starrer Rom Com Ghudchadhi Goes On Floors In Jaipur

बॉलिवूड अपडेट्स:संजय दत्त आणि रवीना टंडनने जयपूरमध्ये सुरु केले कॉमेडी फिल्म 'घुडचढी'चे चित्रीकरण, तापसी-प्रतीक स्टारर 'वो लडकी है कहां'चे रॅप अप!

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मनोरंजन विश्वातील महत्त्वाच्या घडामोडी...

अभिनेता संजय दत्त आणि रवीना टंडन यांनी त्यांच्या आगामी 'घुडचढी' या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. स्वतः संजय दत्तने या कॉमेडी चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर करून चाहत्यांना ही माहिती दिली आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये संजयने लिहिले, "घुडचढी' या मजेदार चित्रपटासह घेऊन येत आहोत हास्य आणि ड्राम, लवकरच तुमच्या दारी." संजय-रवीना जयपूरमध्ये या चित्रपटाचे शूटिंग करत आहेत. बिनॉय गांधी दिग्दर्शित या चित्रपटात संजय-रवीनाशिवाय खुशाली कुमार आणि पार्थ समथान हे देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाची कथा दीपक कपूर भारद्वाज यांनी लिहिली आहे.

तापसी पन्नू आणि प्रतीक बब्बर स्टारर 'वो लडकी है कहाँ'चे शूटिंग पूर्ण तापसी पन्नू आणि प्रतीक बब्बर यांचा आगामी चित्रपट 'वो लडकी है कहाँ'चे शूटिंग पूर्ण झाले आहे. निर्मात्यांनी स्वतः चित्रपटाच्या टीमचे रॅप-अप पार्टीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अर्शद सय्यद दिग्दर्शित या चित्रपटात तापसी-प्रतिक व्यतिरिक्त प्रतीक गांधी आणि हरलीन सेठी देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. जंगली पिक्चर्स आणि रॉय कपूर फिल्म्स यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

बातम्या आणखी आहेत...