आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूड अपडेट्स:शबाना आझमी यांना कोरोनाची लागण, अजीत स्टारर 'वलीमई' 24 फेब्रुवारीला थिएटरमध्ये होणार रिलीज

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मनोरंजन विश्वातील महत्त्वाच्या घडामोडी

अभिनेत्री शबाना आझमी यांचा कोविड 19 चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ही माहिती त्यांनी स्वतः त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केली आहे. त्यांनी लिहिले, 'माझ्या कोविड चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सध्या मी होम आयसोलेटेड आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना माझी विनंती आहे की तुम्ही तुमची कोविड चाचणी जरूर करून घ्या.'

अजित स्टारर 'वलीमई' 24 फेब्रुवारीला थिएटरमध्ये होणार दाखल
साउथ सुपरस्टार अजित स्टारर 'वलीमई' या चित्रपटाची नवीन रिलीज डेट निर्मात्यांनी जाहीर केली आहे. 'वलीमई' 24 फेब्रुवारीला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. याआधी हा चित्रपट 13 जानेवारीला थिएटरमध्ये रिलीज होणार होता. मात्र ओमायक्रॉनमुळे निर्मात्यांनी प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. 'वलीमई' हिंदी, तामिळ आणि तेलुगूसह अनेक भाषांमध्ये रिलीज होणार आहे.

शाहिद-मृणालचा 'जर्सी' 18 किंवा 25 फेब्रुवारीला होणार प्रदर्शित
देशात वाढत्या काेराेनाच्या धाेक्यामुळे आगामी चित्रपटाचे प्रदर्शन पोस्टपोन झाले आहे. त्यापैकी एक शाहिद कपूरचा जर्सी होता, तो आधी 31 डिसेंबर 2021 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार होता. तेलुगू चित्रपट ‘जर्सी’चा तो हिंदी रिमेक आहे. चित्रपटात शाहिद आणि मृणाल ठाकूर मुख्य भूमिकेत आहेत. निर्माते आता नव्या रिलीज डेटचा विचार करत आहेत. सूत्रानुसार, हा चित्रपट फेब्रुवारीमध्ये रिलीज होऊ शकतो. निर्माते 18 किंवा 25 फेब्रुवारीला तो प्रदर्शित करू शकतात. निर्माते लवकरच याची अधिकृत घोषणा करतील. थिएटरमध्ये रिलीज होण्यासाठी जर्सीची सेन्सॉरची प्रक्रियादेखील पूर्ण झाली आहे. या चित्रपटाची कथा एका अपयशी क्रिकेटरच्या अवतीभोवती फिरते. त्याला आपल्या मुलासाठी जर्सी विकत घेण्यासाठी संघर्ष करावा लागतो. चित्रपटात पहिल्यांदाच शाहिदसोबत मृणाल ठाकूरदेखील दिसणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन गौतम तिन्ननुरीने केले आहे.

शरमन-श्रियाच्या ‘म्युझिक स्कूल’च्या तिसऱ्या शेड्यूलचे हैदराबादमध्ये शूटिंग सुरू
‘म्युझिक स्कूल’च्या निर्मात्यांनी हैदराबादमध्ये आपल्या तिसऱ्या शेड्यूलचे शूटिंग सुरू केले आहे. या चित्रपटात शरमन जोशी आणि श्रिया सरन मुख्य भूमिकेत आहेत. कोरोना व्हायरस महामारीची तिसरी लाट पाहता निर्मात्यांनी एक टीम बनवली आहे. ती स्टुडिओ, शूटिंग लोकेशनचे ठिकाण आणि व्हॅनिटी व्हॅनला सॅनेटाइजचे काम करतात. या चित्रपटाचे दिग्दर्शन पापा राव बियाला करणार आहेत. चित्रपटाची कथा 2 म्युझिक शिक्षक आणि मेरी ड्डी’क्रूज़ आणि मनोजवर आधारित आहे. तिसऱ्या शेड्यूलच्या शूटिंगविषयी पापा राव बियाला म्हणतात, म्युझिक स्कूलचे दुसरे शेड्यूल खूपच दमदार हाेते. पूर्ण टीमने एका संगीतमय परिसरात राहण्याचा आनंद घेतला. नवीन वर्षात पूर्ण उत्साहाने आम्ही तिसऱ्या

पुनीत राजकुमारचा शेवटचा ‘जेम्स’ चित्रपट पहिल्या जयंतीदिनी येणार, सुपरस्टारला निर्मात्यांची ट्रिब्यूट
कन्नड सुपरस्टार पुनीत राजकुमारचे गेल्या वर्षी निधन झाले होते. आता त्यांचा शेवटचा चित्रपट ‘जेम्स’ त्यांच्या पहिल्या जयंतीनिमित्त चित्रपटगृहात प्रदर्शित करणार असल्याची बातमी आहे. सूत्रानुसार, पुनीतचा शेवटचा चित्रपट ‘जेम्स’ 17 मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. दिवंगत पुनीत यांच्या सन्मानार्थ कन्नड सिने इंडस्ट्रीच्या प्रसिद्ध दिग्गजांनी ‘जेम्स’ची सोलो रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे त्या आठवड्यात राज्यात एकही कन्नड चित्रपट रिलीज होणार नाही. चित्रपट 17 ते 23 मार्चपर्यंत सिनेमागृहात राहणार. या चित्रपटात प्रिया आनंद, मीका श्रीकांत आणि अनु प्रभाकर मुखर्जी यासारखे कलाकार आहेत. दिग्दर्शन चेतनकुमारने केले आहे. चित्रपटात पुनीतचे माेठे भाऊ राघवेंद्र राजकुमार आणि शिवराजकुमार पाहुण्या कलाकारांच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटात पहिल्यांदाच तिघे भाऊ पडद्यावर सोबत दिसतील. ऑक्टोबरमध्ये पुनीतच्या निधनाआधी चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करण्यात आले होते.

‘मिस्टर अँड मिसेस माही’साठी कार्तिककडून जान्हवी कपूर घेतेय क्रिकेटचे प्रशिक्षण

जान्हवी कपूर ‘मिस्टर अँड मिसेस माही’ चित्रपटासाठी प्रशिक्षण घेत आहे. तिने आपल्या साेशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. त्यात ती क्रिकेटर दिनेश कार्तिकसोबत फलंदाजीचे प्रशिक्षण घेताना दिसत आहे. हा फोटो शेअर करत जाह्नवीने लिहिले..., ‘क्रिकेट कॅम्प #मिस्टर अँड मिसेस माही’ पहिल्या फाेटोमध्ये जान्हवी कपूर एक क्रिकेट हेल्मेट घालताना दिसत आहे आणि दुसऱ्या फोटोमध्ये क्रिकेटर दिनेश कार्तिक आणि दिग्दर्शक शरण शर्मा क्रिकेट खेळताना दिसत आहेत. राजकुमार रावने या फोटोवर हर्ट इमोजी टाकत प्रतिक्रिया दिली.. ‘मिसेस माही...’ या चित्रपटाची घोषणा गेल्या वर्षी झाली होती. मिस्टर अँड मिसेस माहीची निर्मिती करण जोहर करणार आहेत. दिग्दर्शक शरण शर्मा करणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...