आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Bollywood Breaking News Update | Today Latest Trending Entertainment Celebrity News, Shooting Of Ranbir Kapoor's Brahmastra Ends, To Be Released In Cinemas On September 9

बॉलिवूड LIVE अपडेट्स:'द कश्मीर फाइल्स'ने तिस-या आठवड्यात कमावले 3 कोटी रुपये, रणबीर कपूरच्या 'ब्रह्मास्त्र'चे चित्रीकरण पूर्ण

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मनोरंजन विश्वातील महत्त्वाच्या घडामोडी...

अनुपम खेर यांचा 'द कश्मीर फाइल्स' हा चित्रपट रिलीजच्या तिस-या आठवड्यातही चांगली कमाई करत आहे. चित्रपटाने तिस-या आठवड्यात म्हणजे सोमवारी 3.10 कोटींची कमाई केली आहे. यासह चित्रपटाचे एकुण कलेक्शन 231.28 कोटी इतके झाले आहे. 'द कश्मीर फाइल्स' 11 मार्च रोजी रिलीज झाला होता. या चित्रपटात अनुपम खेरसह मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी आणि दर्शन कुमार यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट विवेक अग्निहोत्री यांनी दिग्दर्शित केला आहे.

  • रणबीर कपूरच्या 'ब्रह्मास्त्र'चे चित्रीकरण पूर्ण

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट स्टारर बहुचर्चित 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटाच्या पहिल्या भागाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले. ट्रेड अ‍ॅनालिस्ट तरण आदर्श यांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे. शिवाय आलिया भट्ट हिनेदेखील चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे. 2018 पासून या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होते, अखेर आता चित्रपट पूर्ण झाला आहे. 'ब्रह्मास्त्र'मध्ये रणबीर आणि आलियासह अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. अयान मुखर्जी दिग्दर्शित हा चित्रपट येत्या9 सप्टेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...