आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Entertainment
 • Bollywood
 • Bollywood Breaking News Update | Today Latest Trending Entertainment Celebrity News, Shooting Of The Sequel Of Harshvardhan Rane Starrer Sanam Teri Kasam To Begin In September

बॉलिवूड अपडेट्स:हर्षवर्धन राणे स्टारर 'सनम तेरी कसम' च्या सिक्वेलचे शूटिंग सप्टेंबरमध्ये होणार सुरू, राम गोपाल वर्मांचा 'खतरा: डेंजरस' 8 एप्रिल रोजी होणार रिलीज

6 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • मनोरंजन विश्वातील महत्त्वाच्या घडामोडी...

हर्षवर्धन राणे स्टारर 'सनम तेरी कसम'च्या सिक्वेलचे शूटिंग या वर्षी सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये सुरू होणार आहे. त्याचे पहिले शेड्यूल मुंबई आणि दिल्लीत शूट केले जाणार आहे. दिग्दर्शक विनय सप्रू आणि राधिका राव यांनी ही माहिती दिली आहे. तो म्हणाला, सनम तेरी कसमच्या पुढच्या भागाची कथा आम्हाला मिळाली याचा आम्हाला खूप आनंद आहे. मारवा होकेनच्या पात्राच्या मृत्यूनंतर चित्रपटाची कथा पुढे सरकणार आहे.

 • राम गोपाल वर्मांचा 'खतरा: डेंजरस' 8 एप्रिलला होणार रिलीज

बॉलिवूड दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांचा सर्वात वादग्रस्त चित्रपट 'खतरा: डेंजरस' 8 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट गे विषयावर आधारित आहे. भारतीय सेन्सॉर बोर्डाने त्याला ए प्रमाणपत्र दिले आहे. 'खतरा डेंजरस' हा चित्रपट हिंदी आणि तेलुगू भाषांमध्ये रिलीज होणार आहे.

 • कपिल शर्माच्या शोमध्ये आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा करणार साजिद, स्क्रिप्टवर काम सुरू

कपिल शर्माने काही दिवसांपूर्वी अभिनेत्री आणि दिग्दर्शक नंदिता दाससोबत एक चित्रपट साइन केला आहे. आता कपिल निर्माते-दिग्दर्शक साजिद नादियाडवालासोबत काम करणार आहेत. साजिद लवकरच विनोदवीर कपिल शर्मासोबतच्या एका चित्रपटाची घोषणा करणार आहेत. कपिलच्या येणाऱ्या शोमध्ये साजिद पाहुणा म्हणून येणार आहेत. त्यांनी सांगितले..., “मी या शोला माझे समजतो, मी त्या स्टारचा निर्मातादेखील आहे. मात्र या शोचा निर्माता सलमान खान आहे. साजिद पुढे म्हणाले, मी माझ्या पुढच्या चित्रपटात कपिलला घेत आहे. आम्ही त्याच्यासाठी एक स्क्रिप्ट तयार करत आहाेत. त्यावर काम सुरू आहे. पुढच्या दोन महिन्यांत आम्ही याविषयी अपडेट माहिती सांगू. दुसरीकडे, नंदिताच्या चित्रपटात कपिल एका फूड डिलिव्हरी रायडरच्या रूपात दिसणार आहेत. यात शहाना गोस्वामी, कपिलच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. या महिन्याच्या शेवटी भुवनेश्वर, ओडिशामध्ये शूटिंग केले जाणार आहे.

 • ज्युनियर एनटीआरसोबत जान्हवी करणार नाही चित्रपट, ती अफवाच; बोनी कपूर म्हणाले...,

बॉलिवूड इंडस्ट्रीच्या बऱ्याच अभिनेत्री सध्या दक्षिणेकडे वाटचाल करत आहेत. या यादीत आता जान्हवी कपूरचे नावही जोडले गेले होते. अशा बातम्या सोशल मीडियावर फिरू लागल्या होत्या. जान्हवी दिग्दर्शक बुची बाबू सना यांच्या आगामी चित्रपटात एनटीआरसोबत दिसणार असल्याची बातमी होती. मात्र बातमीवर प्रतिक्रिया देत बोनी कपूर म्हणाले...,‘सोशल मीडियावर फक्त अफवाच सुरू असतात. दरदिवशी कोणती ना कोणती अफवा येत असते. आम्ही याकडे लक्ष देत नाही. जान्हवी एनटीआरच्या चित्रपटात काम करणार असल्याची बातमी खोटी आहे. माझी मुलगी टॉलिवूडमध्ये लवकरच पदार्पण करेल, नक्कीच करेल मात्र सध्या तरी नाही. जान्हवी दक्षिणेच्या चित्रपटात कधी दिसेल, असे श्रीदेवीचे बरेच चाहते विचारत असतात. यापूर्वीदेखील अशा बातम्या आल्या आहेत. मात्र आम्ही दुर्लक्ष करत असतो.

 • संजय दत्त झाला ‘रन फॉर कॅन्सर’ हाफ मॅरेथॉनचा ​​ब्रँड अ‍ॅम्बेसेडर

संजय दत्त कॅन्सरवर विजय मिळवत चित्रपटात परतला. आता तो हाफ मॅराथन स्पर्धा ‘रन फॉर कॅन्सर’चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर झाला आहे. हाफ मॅराथन 20 मार्चला मुंबईचे उपनगर ठाण्यात आयोजित होणार आहे. याविषयी संजय म्हणाला, ‘मी ब्रँड अ‍ॅम्बेसेडरच्या रूपात टोरेंट जिंका ठाणे हाफ मॅराथन 2022 स्पर्धेत भाग घेत आहे. मला आनंद आणि अभिमान वाटत आहे. ही स्पर्धा कॅन्सरविषयी जागरूकता पसरवण्यासाठी आणि लोकांना एक िनरोगी जीवन जगण्यासाठी प्रोत्साहन करणारी आहे. कॅन्सरशी लढा देत असलेल्या या कठीण काळात कुटुंबीयांच्या वेदना मी वैयक्तिकरीत्या समजू शकतो. या उदात्त कार्याचा एक भाग बनून आनंद होत आहे.” कामाविषयी बोलायचे झाले तर संजय ‘पृथ्वीराज’, ‘शमशेरा’ आणि ‘केजीएफ चॅप्टर’मध्ये दिसणार आहे.

 • अनुभवसोबत पुन्हा काम करणार तापसी

तापसी पन्नू पुन्हा एकदा दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांच्या प्रोजेक्टमध्ये सहभागी झाली. खुद्द अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती दिली. तिने लिहिले... ‘अनुभव सिन्हा यांच्या काव्यसंग्रहातील लघुपटात पुन्हा एकत्र आल्याचा खूप आनंद झाला. दिग्दर्शक सुधीर मिश्रा याचे दिग्दर्शन करत आहेत. यातील कथा अतिशय अनोखी आहे आणि तो महामारीवर आधारित आहे. तापसी या काळातील सर्वोत्तम अभिनेत्रींपैकी असल्याचे दिग्दर्शक सुधीर मिश्रा यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...