आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा'कौन बनेगा करोडपती'च्या 14व्या सीझनचा पहिला प्रोमो नुकताच रिलीज झाला आहे. ज्यामध्ये अमिताभ बच्चन शोच्या नोंदणीबाबत माहिती देताना दिसत आहेत. शोमध्ये सहभागी होण्यासाठी केबीसीची नोंदणी 9 एप्रिल रोजी रात्री 9 वाजल्यापासून सुरू होत आहे. प्रोमोमध्ये एक पती त्याच्या पत्नीला मोठमोठी आश्वासने देतो, पण ती पूर्ण करू शकत नाही. यानंतर अमिताभ बच्चन म्हणतात, "स्वप्न बघून खुश होऊ नका, ते पूर्ण करण्यासाठी फोन उचला. 9 एप्रिल, रात्री 9 वाजल्यापासून सुरु होत आहेत माझे प्रश्न आणि तुमचं KBC मध्ये रजिस्ट्रेशन."
दिवंगत पंजाबी अभिनेता दीप सिद्धूचा शेवटचा चित्रपट 'साडे आले'ची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. हा चित्रपट 29 एप्रिल 2022 रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ही माहिती दिली आहे. वर्षाच्या सुरुवातीला हरियाणातील गुरुग्राममध्ये दीपचा रस्ता अपघातात मृत्यू झाला होता.
'द कश्मीर फाइल्स'ने रिलीजच्या तिसऱ्या आठवड्यातही कमाई सुरुच ठेवली आहे. या चित्रपटाने आतापर्यंत 234 कोटींची कमाई केली आहे. द कश्मीर फाइल्सने तिसऱ्या आठवड्यात जवळपास 30 कोटींची कमाई केली आहे. 12 कोटींमध्ये बनलेला हा चित्रपट विवेक अग्निहोत्रींनी दिग्दर्शित केला आहे. अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी आणि दर्शन कुमार या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.