आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Bollywood Breaking News Update | Today Latest Trending Entertainment Celebrity News, Trailer Of Aanchal Singh Starrer Unseen 2 Out, Farhan Shibani To Tie The Knot In Maharashtrian Style Today

बॉलिवूड अपडेट्स:फरहान-शिबानी आज महाराष्ट्रीय पद्धतीने अडकणार लग्नबंधनात, आंचल सिंग स्टारर 'अनदेखी 2'चा ट्रेलर आऊट

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मनोरंजन विश्वातील महत्त्वाच्या घडामोडी...

बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर आणि त्याची गर्लफ्रेंड शिबानी दांडेकर आज लग्नबंधनात अडकणार आहेत. दोघेही गेल्या 3 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. हे दोघे 21 फेब्रुवारी रोजी कायदेशीररीत्या लग्न करणार आहेत. त्याआधी हे दोघे महाराष्ट्रीय पद्धतीनुसार लग्नबंधनात अडकणार असल्याची ताजी बातमी आहे. फरहानच्या खंडाळा फार्महाऊसवर लग्न होणार आहे. दोघेही 21 तारखेला लग्न करण्यापूर्वी फरहानच्या फार्महाऊसवर 19 फेब्रुवारीला मराठी प्रथेनुसार लग्नबंधनात अडकणार आहेत. लग्नात फक्त त्यांचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र असतील. शिबानी दांडेकरच्या बहिणी अनुषा-अपेक्षा, कुटुंबातील सदस्य, जवळच्या मैत्रिणी, रिया चक्रवर्ती, अमृता अरोरा यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनीही या जोडप्याच्या हळदी-मेंदी सोहळ्याला हजेरी लावली होती. त्याचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले आहेत.

आंचल सिंग स्टारर 'अनदेखी 2'चा ट्रेलर रिलीज
अनदेखी सीझन 2 चा प्रोमो रिलीज झाला आहे. निर्मात्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे. या सीरिजमध्ये आंचल सिंग, दिव्येंदू भट्टाचार्य, तेज सप्रू, हर्ष छाया आणि सूर्या शर्मा दिसणार आहेत. अ‍ॅप्लॉज एंटरटेनमेंटने अनदेखीची निर्मिती केली आहे. ही सीरिज 4 मार्च रोजी OTT प्लॅटफॉर्म Sony Liv वर प्रदर्शित होणार आहे.

रामचरणचा ‘आरसी 15’ चित्रपट झी स्टुडिआेने 350 कोटींत विकत घेतला

रामचरणचा आगामी चित्रपट ‘आरसी 15’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. दिग्दर्शक शंकर आहे तर निर्माते दिल राजू आहेत. ते दक्षिणेचे प्रसिद्ध निर्माते आहेत. दिल राजू आणि रामचरण पुढच्या वर्षी मकर संक्रांतीला चित्रपट प्रदर्शित करण्याचा विचार करत आहेत. या चित्रपटाविषयी एक मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे झी स्टुडिओने याच्या निर्मात्यांसोबत एक मोठा करार केला आहे, तो 350 कोटी रुपयाचा आहे. रामचरण आणि शंकरचा हा आगामी मेगा बजेट चित्रपट राजकारणावर आधारित आहे, तो अनेक भाषेत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची क्रेझ आतापासून प्रेक्षकांमध्ये दिसून येत आहे. त्यामुळे झी स्टुडिओने निर्मात्यांसोबत हातमिळवणी केली आहे. झी स्टुडिओने चित्रपटाचे हिंदी व्हर्जनचे सॅटेलाइट, डिजिटल आणि थिएटरचे अधिकार 350 कोटीत विकत घेतले आहेत. यासोबतच झी स्टुडिओ या चित्रपटाचे विविध भाषांमध्ये वितरणही करणार आहे. चित्रपटाच्या उर्वरित भाषांचे हक्क स्थानिक स्टुडिओला विकले जातील, त्यासाठी निर्माते त्यांच्याशी सतत चर्चा करत आहेत.

रणविजय पाठोपाठ नेहा धुपियाने सोडला ‘रोडीज’ शो, कारण गुलदस्त्यात
अभिनेत्री नेहा धुपिया आता ‘रोडीज’च्या 18 व्या हंगामात दिसणार नाही. काही दिवसांपूर्वीच रणविजय सिंहने कथितरीत्या खुलासा केला होता की, तो या शोच्या पुढील हंगामाचा भाग नसेल. तसेच त्याने शो सोडण्याचे कारण नेटवर्कला चांगल्या प्रकारे माहीत असल्याचे सांगितले होते. तर नेहाने सांगितले, या वर्षी मी ‘रोडीज’ शोचा भाग नसेल. प्रेक्षकांसाठी माझ्यापेक्षा रणविजयला याचा भाग नसल्याचे पाहून वाईट वाटत असेल आणि स्पष्टपणे याचे कारण त्यांना आणि नेटवर्क दोघांनाही चांगल्या प्रकारे माहीत आहे. मला हा शो खूप आवडतो आणि माझा आवडता राहिला आहे. हा शो आवडण्याचे कारण रण आहे. तो माझ्या नेहमीच चांगला मित्र आहे आणि राहील. माझा आणखी एक चांगला मित्र आहे, त्याचे यात आगमन झाले असून माझ्या त्याला शुभेच्छा आहेत. तो सोनू सूद आहे, तोदेखील माझा चांगला मित्र आहे. शोमध्ये नेहा आणि रणविजय यांच्यात चांगले बाँडिंग होते.

सोहम शहाच्या आगामी म्युझिक व्हिडिओमध्ये महादेवाची भूमिका साकारणार संजय दत्त
संजय दत्त लवकरच ‘केजीएफ 2’ मध्ये अधीराच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय तो सोहम शाहच्या एका म्युझिक व्हिडिओमध्येही दिसणार. यात संजय शंकर महादेवाची भूमिका साकारताना दिसणार आहे. म्युझिक व्हिडिओसाठी संजयला साइन करण्याचा सोहमचा विचार होता. याबाबत संजयशी बोलले असता त्याने लगेच होकार दिला. खरं तर संजय सध्या अमेरिकेत आहे. तेथून परतताच ते या म्युझिक व्हिडिओच्या शूटिंगला सुरुवात करतील. त्याचे चित्रीकरण खूप मोठ्या प्रमाणावर होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...