आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआमिर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’चे शूटिंग लडाखमध्ये होणार आहे. तो वेळापत्रक लवकरात लवकर पूर्ण करू इच्छित आहे. येथे एका युद्धाच्या दृश्याचे चित्रीकरण होणार आहे. नागा चैतन्य लडाखमध्येच आमिरसोबत जॉइन होणार आहे. येथूनच त्याची एंट्री होणार असल्याची माहिती आहे. मात्र आमिर खानकडून याविषयी कोणत्याच प्रकारची अधिकृत घोषणा झाली नाही. नुकतीच आमिरची टीम रेकी करून मुंबईला परतली आहे. युद्धाच्या दृश्यासाठी अॅक्शन दिग्दशर्रक परवेज शेखला हायर करण्यात आले आहे. आमिर आणि दिग्दर्शक अद्वैत चंदन एका महिन्याच्या शेड्यूलसाठी लडाखला आले आहेत. द ग्रँड ड्रॅगन हाॅटेलमध्ये कलाकार आणि क्रू टीमसोबत सर्वच बायोबबलमध्ये राहणार आहेत. दोघांनीही मोठ्या युद्धाची कल्पना केली आहे. लष्कराच्या लोकांची मदत करणारे पात्र नागा साकारणार आहे.
2. 15 मे रोजी भारतात 4 भाषांत प्रसारित होणार ‘वंडर वुमन 1984’
प्राइम व्हिडिओ 15 मे रोजी सुपरहीरो नाट्य ‘वंडर वुमन 1984’चा प्रीमियर करणार आहे. हा िसनेमा चार भाषांत इंग्रजी, हिंदी, तामिळ आणि तेलुगूमध्ये भारतीय प्रेक्षक पाहू शकतील. गॅल गॅडोट यात पुन्हा एकदा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा वार्नर ब्रदर्स पिक्चर्सचा डीसी-सुपरहीरोच्या रेकॉर्ड-ब्रेकिंग ‘वंडर वुमन’चा पहिला सिनेमा आहे. हा चित्रपट 1984 च्या शीतयुद्धावर आधारित अाहे. चित्रपटाची निर्मिती चार्ल्स रोवन, डेबोराह स्नायडर, जॅक स्नायडर, पॅटी जेनकिंस, गॅल गॅडोट आणि स्टीफन जोन्स यांनी केली आहे. हॉलिवूडचे चित्रपट भारतात आधीपासून मोठ्या आवडीने पाहिले जातात.
3.आदित्य रॉय कपूरने नेटफ्लिक्ससोबत केला मोठा करार, स्क्रिप्टवर काम सुरू
आदित्य रॉय कपूर लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे. खरं तर, त्याचा ‘लूडो’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आला होता. मात्र तो आता स्वत: ओटीटी प्लॅटफॉर्मवर आपली एक वेब सीरिज घेऊन येत आहे. आदित्यने नेटफ्लिक्ससोबत एका वेब सीरिजचा करार केला आहे. सध्या या वेब सीरिजच्या स्क्रिप्टवर काम सुरू आहे. या वर्षीच्या सुरुवातीलाच या वेब सीरिजवर आदित्यसोबत चर्चा झाली होती. त्यानंतर करारवर सही करण्यात आली. आता स्क्रिप्टवर काम सुरू आहे, त्यामुळे या वेब सीरिजची जास्त माहिती समोर आली नाही. कोरोनाची परिस्थिती निवळल्यानंतर शूटिंग सुरू होईल.
4. कपड्यांचा लिलाव करून पीडितांसाठी निधी गोळा करणार आकांक्षा सिंह
अभिनेत्री आकांक्षा सिंहने नुकतेच आपल्या होमटाऊन जयपूरमध्ये अन्न वाटप केले. आता ती मुंबईत कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी निधी गोळा करणार आहे. त्यासाठी ती कपड्यांचा लिलाव करणार आहे. याविषयी ती म्हणते, कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी आता पुढे यायला हवे. त्यासाठी मला माझ्या कपड्यांचा लिलाव करावा लागला तरी मी करेन. लोक माझ्या मदतीसाठी येतील, याची मला अपेक्षा आहे. लोक ते कपडे विकत घेतील जे मी तेथे ठेवणार आहे. हा कठीण काळ आहे. लोकांना मदत करण्यास पुढे येणे यापेक्षा मोठे काम कोणतेही नाही. हे एक चांगले उदाहरण ठरू शकते. ही जबाबदारी म्हणून पार पाडायला हवी.
5. मुलगी शनायाच्या करिअरमध्ये हस्तक्षेप करणार नाही संजय
अभिनेते संजय कपूरची मुलगी शनाया लवकरच बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे. नुकतेच निर्माते-दिग्दर्शक करण जोहरने बॉलिवूडमध्ये शनाया कपूरला लाँच करण्याची घोषणा केली आहे. आता शनायाची आई महीप कपूरने एका मुलाखतीत तिच्याविषयी सांगितले, शनायाच्या बोल्ड सीन किंवा रोमँटिक सीनवर संजयला नवल वाटेल, पण तो मुलीच्या करिअरमध्ये कधीच हस्तक्षेप करणार नाही. करण मुलीला लाँच करणार असल्याने मलाही आनंद होत आहे. आम्हाला करणवर विश्वास आहे. तो शनायाला चांगल्या प्रकारे सादर करेल.
6. दिल्लीत 100 खाटांचे रुग्णालय बनवतेय हुमा कुरेशी
महामारीच्या या संकटात अभिनेत्री हुमा कुरेशीने ग्लोबल चाइल्ड राइट्स ऑर्गेनायझेेशन ‘सेव्ह द चिल्ड्रन’सोबत काम सुरू केले आहे. याअंतर्गत ती दिल्लीत शंभर खाटांचे तात्पुरते रुग्णालय बनवणार आहे, यात ऑक्सिजन प्लँटदेखील असेल. या प्रोजेक्टचे लक्ष रुग्णांना घरात उपचारासाठी मेडिकल किट उपलब्ध करून देण्याचे आहे. यात रुग्णांना बरे होण्यासाठी डॉक्टर आणि मानसोपचारतज्ज्ञांचाही समावेश आहे. हुमा कुरेशीने सोशल मीडियवर एक व्हिडिओ शेअर करून या कामासाठी लोकांचे समर्थन मागितले आहे. हुमा सोनीच्या नव्या वेब सीरिज ‘महारानी’मध्ये मुख्य भूमिका साकारत आहे. ते 28मे रोजी प्रसारित होईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.