आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Bollywood Breif: Salman Khan's 'Bhaijaan' Will Come On Diwali In 2022 Rakhi Taking Her First Corona Vaccine Dose Anushka Sharma Impressed By Women  

बॉलिवूड ब्रीफ:सलमानचा 'भाईजान' 2022 मध्ये दिवाळीत येणार, अनुष्का म्हणाली - 'असं काहीच नाहीए जे आम्ही करू शकत नाही..', ड्रामा क्वीनने घेतला कोरोना लसीचा डोस

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मनोरंजन विश्वातील महत्त्वाच्या घडामोडी...

दिग्दर्शक फरहाद सामजी यांनी काही दिवसांपूर्वीच आपल्या आगामी 'कभी ईद कभी दिवाली' या चित्रपटाचे नाव बदलून 'भाईजान' केले होते. या चित्रपटात सलमान खान मुख्य भूमिका साकारतोय. आता सलमानच्या या चित्रपटासंदर्भातील एक मोठी बातमी समोर आली आहे. रिपोर्टनुसार सलमानचा अ‍ॅक्शन-कॉमेडी 'भाईजान' 2022 मध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज होऊ शकतो.

मेकर्स नोव्हेंबर2021 पासून चित्रपटाचे शूटिंग सुरू करण्याची तयारी करत आहेत. या चित्रपटाचा पहिला लूक 21 जुलै रोजी बकरी ईदच्या निमित्ताने प्रदर्शित होणार आहे. 'भाईजान' हा लोकप्रिय तामिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटात सलमानसह पूजा हेगडेची जोडी जमणार आहे. याशिवाय आयुष शर्मा आणि झहीर इक्बालदेखील चित्रपटात झळकणार आहेत.

2. हातात मुलं घेऊन महिलेने एका हाताने चेंडू झेलला, व्हिडिओ बघून अनुष्का शर्मा झाली इम्प्रेस
अभिनेत्री अनुष्का शर्मा सोशल मीडियावर बरीच सक्रीय असते. ती कायम आपल्या चाहत्यांसोबत व्हिडिओ आणि फोटोज शेअर करत असते. अलीकडेच अनुष्काने एक व्हिडिओ शेअर केला आहेत. या व्हिडिओत बेसबॉल मॅच बघणा-या एका महिलेने एका हातात चेंडू झेलून सगळ्यांना आश्चर्यचकित केले. त्या महिलेचा व्हिडिओ पाहून अनुष्का शर्मा देखील तिची चाहती झाली आहे. अनुष्काने या महिलेचा व्हिडिओ शेअर करत त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले, 'असं काहीच नाहीये जे आम्ही करू शकत नाही.' झाले असे की, मागील आठवड्यात सॅन डिएगो पैड्रेस आणि शिकागो कब्स यांच्यात खेळल्या गेलेल्या बेसबॉल सामन्यादरम्यान एका महिलेने एका हाताने चेंडू झेलून सगळ्यांना आश्चर्यचकित केले होते. महत्वाचे म्हणजे तिच्या दुसऱ्या हातात तिचे बाळ होते. एका हाताने चेंडू झेलणाऱ्या या महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वायरल झाला होता. हा चेंडू पकडणे मुळीच सोपे नव्हते, त्यामुळे अनेकांनी त्या महिलेचं कौतुक केले. अनुष्काने देखील तो व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला.

3. राखी सावंतने घेतला कोरोना लसीचा पहिला डोस, म्हणाली - ‘मी एक गाणे गाऊ का?’
बॉलिवूडची ड्रामा क्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे राखी सावंत कायम चर्चेत असते. राखीने नुकताच कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. विशेष म्हणजे तिने लस घेतानाचा व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला असून तो प्रचंड व्हायरल झाला आहे. लस घेताना राखी घाबरली असल्याचे दिसत आहे. दरम्याम ती ‘मी एक गाणे गाऊ का?’ असे बोलताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये राखी सांगते की, ‘तेरे ड्रीम में मेरी एण्ट्री’ हे तिचे गाणे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राखीने व्हिडिओ शेअर करत ‘मी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. आता तुम्ही माझ्या आगामी व्हिडिओची वाट पाहा,’ असे कॅप्शन दिले आहे.

4. सध्या एकाही वेब शोमध्ये दिसणार नाही सामंथा
‘फॅमिली मॅन 2’ मधून ओटीटीमध्ये पदार्पण करणारी दक्षिण भारतीय अभिनेत्री सामंथा अक्केनेनी सध्या चर्चेत आहे. लवकरच ती एका नव्या वेब शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा होती. मात्र जवळच्या व्यक्तीच्या माहितीनुसार, ती सध्या पती नागा चैतन्य आणि कुटुंबीयांसोबत मीडियापासून दूर आपल्या घरी वेळ घालवत आहे. सध्या तरी तिची कुठलीही वेब सीरिज करण्याची योजना नाही. तिने फॅमिली मॅन 3 साठीही होकार कळवला आहे, कारण तिला ती सीरिज आवडली होती. चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर सामंथाकडे दोन तामिळ चित्रपट आहेत, त्यापैकी एक शकुंतलम आहे.

5. सुजोयच्या चित्रपटात शाहिदची हिरोइन होणार तृप्ती डिमरी
शाहिद कपूर 'कहानी’ फेम दिग्दर्शक सुजोय घोष दिग्दर्शित चित्रपटात काम करणार असल्याची चर्चा होती. आता सूत्रानुसार, चित्रपटसाठी निर्मात्यांनी मुख्य भूमिकेसाठी 'बुलबुल’ फेम तृप्ती डिमरीला विचारणा केली आहे. तृप्ती पहिल्यांदाच शाहिद आणि सुजोयसोबत काम करणार आहे. त्यामुळे ती शूटिंगसाठी खूपच उत्साही आहे. मात्र अजून चित्रपटाविषयी कोणतीच अधिकृत घोषणा झाली नाही.पण सप्टेंबरपासून याचे शूटिंग सुरू होणार असल्याचे मानले जात आहे. तृप्तीच्या इतर प्रोजेक्ट्सविषयी बोलायचे झाले तर ती रणबीर कपूरच्या 'एनीमल’मध्येही दिसणार आहे. ज्याचे दिग्दर्शन 'कबीर सिंह’ फेम संदीप रेड्डी वांगा करणार आहेत.