आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Bollywood Brief 7th August News And Updates; Tiger Shroff's First Hindi Song Vande Mataram To Be Released Before Independence Day Kajol Denies Romancing Shah Rukh Khan In Rajkumar Hirani’s Next

बॉलिवूड ब्रीफ:टाइगर श्रॉफने गायलेल्या 'वंदे मातरम्' गाण्याचा टीझर रिलीज, राजकुमार हिराणींकडून काजोलला मिळाली नाही चित्रपटाची ऑफर

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मनोरंजन विश्वातील महत्त्वाच्या घडामोडी...

जॅकी भगनानी आणि टाइगर श्रॉफने देशभक्ती अँथम 'वंदे मातरम्'चे मोशन पोस्टर नुकतेच रिलीज केले. त्यानंतर आता या गाण्याचा टीझर लाँच करण्यात आला आहे. या गीताला टाइगर श्रॉफने आवाज दिला असून हे त्याचे पहिले हिंदी गाणे आहे. या आधी त्याने गायलेली दोन इंग्रजी गाणी, कैसानोवा आणि अनबिलीबल यशस्वी ठरली आहेत. हे गाणे 10 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. हे गाणे रेमो डिसूजा यांनी दिग्दर्शित केले आहे.हा ट्रॅक सर्वात मोठा आणि सर्वात बोल्ड सिंगल्स पैकी एक असेल. टाइगर श्रॉफने गायलेले वंदे मातरम् रेमो डिसूजाद्वारे दिग्दर्शित, विशाल मिश्रा द्वारा रचित, कौशल किशोर द्वारा लिखित आणि अंकन सेन, जुईली वैद्य आणि राहुल शेट्टी यांच्याद्वारे कोरियोग्राफ करण्यात आले आहे.

2. शाहरुखने दिग्दर्शक अ‍ॅटलीच्या आगामी चित्रपटाचे टीजर शूट केले
शाहरुख खान ‘पठान’ चित्रपटानंतर अ‍ॅटलीच्या चित्रपटावर काम करणार आहे. यात तो दुहेरी भूमिकेत आहे. यात त्याच्यासोबत नयनतारा दिसणार आहे. सध्या शाहरुखने चित्रपटाचे टीजर शूट कले आहे. चित्रपटाचे सुरुवातीचे टीजरचा भाग आधीच शूट करण्यात आला आहे. सूत्रानुसार, 15 ऑगस्ट रोजी चित्रपटाची घोषणा होईल. याच्या शूटिंगसाठी 180 दिवसाचे शेड्यूल ठरले आहे. चित्रपटाचे शूटिंग दुबईत सुरू होणार आहे. शाहरुखने यापूर्वी ‘डुप्लिकेट’ आणि ‘फॅन’ सारख्या चित्रपटात दुहेरी भूमिका साकारली आहे. मात्र त्याला नव्या पद्धतीने दुहेरी भूमिकेत घेतले जाईल. अॅटली यांनी यापूर्वी दक्षिणेचा स्टार विजयलादेखील ‘बिगिल’ मध्ये दुहेरी भूमिकेत घेतले होते.

3. अफवांना पूर्णविराम, हिराणींकडून मिळाली नाही चित्रपटाची ऑफर : काजोल
राजकुमार हिराणींच्या आगामी शीर्षक नसलेल्या चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे. काजोल या चित्रपटात दिसणार असल्याची चर्चादेखील होती. या चित्रपटात काजोल शाहरुखच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार असल्याचेही बोलले जात हाेते. पण आता काजोलने स्वतः या सर्व बातम्यांचे खंडन केले आहे. ती म्हणाली, ‘आतापर्यंत मला अशा कोणत्याही चित्रपटासाठी संपर्क साधण्यात आला नाही. सध्या तर मी इतर चित्रपटाची स्क्रिप्ट ऑनलाइन वाचत आहे आणि बैठकांमध्येही भाग घेत आहे. आतापर्यंत मी कोणत्याही स्क्रिप्टला होकार दिला नाही.' हा चित्रपट स्थलांतराच्या मुद्यावर आधारित आहे.

4. आज पूर्ण होणार काजल अग्रवालच्या ‘उमा’चे शूटिंग
काजल अग्रवाल गेल्या एक महिन्यापासून कोलकाता येथे ‘उमा’ चित्रपटाचे शूटिंग करत आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण शनिवारी पूर्ण होणार आहे. संपूर्ण चित्रपटाची शूटिंग कोलकातामध्येच झाली आहे. त्याचे बरेच सीन्स गंगेच्या काठेवर शूट केले गेले आहेत. काजल व्यतिरिक्त यात हर्ष छाया, टीनू आनंद, मेघना मलिक इत्यादी कलाकार दिसणार आहेत. चित्रपटाची कथा एका घरात होणाऱ्या लग्नाभोवती विणलेली आहे. मात्र लग्नात जेव्हा उमा नावाची मुलगी जाते तेव्हा संपूर्ण वातावरण बदलते. निर्माते पुढच्या वर्षापर्यंत चित्रपट रिलीज करण्याचा विचार करत आहेत. तो ओटीटीवर प्रदर्शित होईल की चित्रपटगृहांमध्ये याबाबत अद्याप निर्णय झाला नाही.

5. निर्माता जॅकी भगनानीने 'बेल बॉटम'ला मिळणाऱ्या कौतुकाबद्दल मानले आभार

बॉलिवूडचा सर्वात तरुण निर्माता जॅकी भगनानी कोविड -19 च्या दुसऱ्या लाटेनंतर बेलबॉटमच्या ब्लॉकबस्टर रिलीजसाठी सज्ज झाला आहे. चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला असून प्रेक्षकांच्या कौतुकाचा विषय ठरत आहे. जॅकीने आपल्या सोशल मीडियावर या ट्रेलरला मिळणाऱ्या कौतुक आणि प्रेमाविषयी आभार व्यक्त केले आहेत. हा चित्रपट 80 च्या दशकात घडणारी गुप्तहेर कथा असून 19 ऑगस्टला थिएटर रिलीजसाठी तयार आहे. चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत असून असीम अरोरा आणि परवेज शेख द्वारा लिहिण्यात आलेल्या या चित्रपटाचे चित्रीकरण स्कॉटलँडमध्ये करण्यात आले आहे.या महामारीच्या काळात जॅकी भगनानी आपल्या संपूर्ण टीमसोबत स्कॉटलँडमध्ये सर्व खबरदारी घेऊन शूटिंग सुरू करणारे आणि ते यशस्वीरित्या पूर्ण करणारे पहिली व्यक्ती होती. लॉकडाऊनच्या काळात, जॅकी भगनानीने आपले म्युझिक लेबल जे जस्ट म्यूजिक अंतर्गत 'मुस्कुराएगा इंडिया' आणि अशा इतर अनेक गाण्यांसोबत प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. जॅकी 'बेलबॉटम' व्यतिरिक्त 'करना', 'गणपथ' सारख्या बॅक-टू-बॅक ब्लॉकबस्टर्ससोबत प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज आहे. 'करना'चे प्री-प्रोडक्शन अंडर प्रोसेस असून 'गणपथ'च्या चित्रीकरणाला लवकरच सुरुवात होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...