आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Bollywood Brief: Actor Boman Irani Mother Passes Away, Dilip Kumar To Be Discharged From Hospital Today, Bhoomi Pednekar's Entry In 'Rakshabandhan'

बॉलिवूड ब्रीफ:अभिनेते बोमन ईराणी यांना मातृशोक, दिलीप कुमार यांना रुग्णालयातून आज मिळणार डिस्चार्ज, 'रक्षाबंधन'मध्ये भूमी पेडणेकरची एंट्री

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मनोरंजन विश्वातील महत्त्वाच्या घडामोडी...

बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते बोमन इराणी यांच्या आईचे बुधवारी सकाळी निधन झाले. बोनम यांनी त्यांच्या आईच्या निधनाची बातमी देताना एक भावुक पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट केली. बोमन यांनी लिहिले की, ' आई ईराणीने झोपेत असतानाच शांतपणे या जगाचा निरोप घेतला. ती 94 वर्षांची होती. आईने तिच्या वयाच्या 32 व्या वर्षापासून माझ्यासाठी आई आणि वडील अशा दोन्ही भूमिका पार पाडल्या. माझ्या आईचे व्यक्तिमत्व अतिशय खेळकर असे होते. अतिशय मजेशीर गोष्टी ती आम्हाला सांगायची. जेव्हा मी सिनेमा बघायला जायचो तेव्हा माझे मित्र सोबत असतील याची ती काळजी घ्यायची. इतकेच नाही तर सिनेमा बघताना पॉपकॉर्न नक्की खा असेही आवर्जून सांगायची. आईला गाणे ऐकण्याची आणि खाण्याची खूप आवड होती. त्याचप्रमाणे ती विकिपीडियावर घडणा-या घटना ती चेक करायची. आई मला नेहमी सांगायची लोक तुझे कौतुक करतात म्हणून तू अभिनेता नाहीस. तुझ्यामुळे लोकांच्या चेह-यावर हसू येईल, असा अभिनय तू कर. निधनाच्या आदल्या दिवशी तिने माझ्याकडे मलाई कुल्फी आणि आंबे खाण्यासाठी मागितले होते. तिला वाटले असते तर तिने माझ्याकडे चंद्र आणि तारे देखील मागितले असते. ती माझ्यासाठी नेहमीच स्टार होती आणि कायम राहील... '

2. दिलीप कुमार यांना गुरुवारी मिळणार रुग्णालयातून डिस्चार्ज
ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना आज मुंबईतील पीडी हिंदुजा हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वी श्वासोच्छवासाच्या त्रासामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अलीकडेच दिलीप कुमार यांचे कौटुंबिक मित्र फैजल फारुकी यांनी त्यांच्या प्रकृतीविषयी एक अपडेट दिला आहे. फैजल यांनी दिलीप कुमार यांच्या सोशल मीडिया हँडलवरून एक पोस्ट शेअर केली असून त्यात लिहिले, "आपल्या सर्वांच्या प्रार्थनांसाठी धन्यवाद. दिलीप साहेबांवर यशस्वी प्ल्यूरल एस्पिरेशन प्रक्रिया करण्यात आली आहे. मी स्वतः डॉ. जलील पारकर आणि डॉ. नितिन गोखले यांच्याशी बातचीत केली आहे. त्यांना आशा आहे की गुुरुवारी दिलीप साहेबांना रुग्णालयातून घरी सोडण्यात येईल. " 98 वर्षीय दिलीप कुमार यांना बायलेटरल प्ल्यूरल इफ्यूजन झाले होते. या आजारात छातीमधील फुफ्फुसांच्या चारही बाजुंनी पाणी जमा होते. त्याला वैद्यकीय भाषेत प्ल्यूरल इफ्यूजन म्हटले जाते. छातीत वारंवार पाणी भरल्याने फुफ्फुसांवर दाब येतो आणि त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो.

3. अक्षय कुमारच्या ‘रक्षाबंधन’मध्ये भूमी झळकणार, शेअर केला खास फोटो
अभिनेता अक्षय कुमारच्या आगामी ‘रक्षाबंधन’ या चित्रपटात अभिनेत्री भूमी पेडणेकर झळकणार यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. अक्षयने स्वत: सोशल मीडियावरून याची माहिती दिली आहे. अक्षय कुमारने ‘रक्षाबंधन’ चित्रपटाचे दिग्दर्शक आनंद एल राय आणि भूमी पेडणेकरसोबतचा एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर करत माहिती दिली. या फोटोत तिघेही एका उंच ठिकाणावर बसल्याचे दिसून येत आहेत. सोबतच तिघेही दिलखुलास हसत असल्याचे पाहायला मिळत आहे. हा फोटो शेअर करत अक्षय कॅप्शनमध्ये म्हणाला, 'जेव्हा तुम्ही आनंदी असता तेव्हा ते स्पष्ट दिसून येते. रक्षाबंधनमध्ये भूमी पेडणेकरला घेतल्याचा खूप आनंद होतोय.' तर भूमीनेही तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर हा फोटो शेअर केला आहे. 'खूपच खास चित्रपट आणि खूपच खास रीयूनियन. मी माझ्या दोन आवडत्या क्रिएटिव्ह पावर हाउस व्यक्तींसोबत काम करण्यासाठी उत्साही आहे. या खास चित्रपटाचा मला भाग बनण्याची संधी मिळाली यासाठी मी आभारी आहे,' असे भूमी म्हणाली आहे.

4. ‘शेरनी’ चित्रपटाचा म्युझिक व्हिडिओ महिलांना समर्पित
विद्या बालन अभिनित ‘शेरनी’ चित्रपटाचा म्युझिक व्हिडिओ 10 जूनला रिलीज होणार आहे. मेकर्सचे म्हणणे असे की समाजात स्वत:चा मार्ग शोधणाऱ्या सर्व महिलांना हा व्हिडिओ समर्पित असेल. हा एक हृदयस्पर्शी व्हिडिओ आहे. सर्व अडथळ्यांवर मात करून विजयश्री संपादन करणाऱ्या महिलांना याद्वारे सलाम करण्यात आला आहे. हे गाणे श्रवणीय असून, अक्सा सिंहने कम्पोझ केलेल्या रॅपची अनुभूती प्रेक्षकांना येईल. शेरनी चित्रपटात विद्या बालन एका प्रामाणिक महिला वन अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार असून, या चित्रपटाकडून तिला खूप अपेक्षा आहेत. तो प्रेक्षकांना आवडेल असा तिला विश्वास आहे.

5. सर्वात मोठी डील, धर्मा प्रॉडक्शन्सने व्हायकॉम 18 सोबत केली भागीदारी
करण जोहरचे धर्मा प्रॉडक्शन हाऊस आणि दक्षिणेतील दिग्गज लाइका प्रॉडक्शन मिळून मोठ्या बजेटच्या चित्रपटाची निर्मिती करणार होते. धर्मा आणि लाइकामध्ये सुरुवातील 5 चित्रपटांचा करार होणार होता. मात्र बोलणी फिस्कटली आणि भागीदारी सुरू होण्याच्या आधीच संपुष्टात आली. आता करणने व्हायकॉम 18 सोबत भागीदारी करण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांनी सांगितले की, सध्या घडीला ही सर्वात मोठी डील म्हणता येईल. त्यामुळे आता बिग बजेट चित्रपट येऊ शकतात.

बातम्या आणखी आहेत...