आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूड ब्रीफ:साऊथचा हिट चित्रपट ‘नांधी’चा हिंदी रिमेक बनवणार अजय देवगण, ‘सत्यनारायण की कथा’मध्ये कार्तिकसोबत दिसू शकते श्रद्धा

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मनोरंजन विश्वातील महत्त्वाच्या घडामोडी...

शुक्रवारी अजय देवगण आणि निर्माते दिल राजू यांनी हिंदीमध्ये तेलुगु फिल्म ‘नांधी’ बनवण्याची घोषणा केली. गुन्हेगारी आणि कोर्टाच्या थीमवर देवगण आणि राजू यांनी चित्रपटाचे हक्क विकत घेतले आहेत. 2021 मध्ये आलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन विजय कनकामेडला यांनी केले असून सतीश वेगेसाना निर्मित आहेत. तेलुगु चित्रपटामध्ये अलारी नरेश मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटात एका कैद्याची कहाणी आहे, ज्यावर खुनाचा खोटा आरोप करण्यात आला आहे आणि तो निकालाची वाट पाहत असतो. याविषयी अजय म्हणाला, हिंदी रिमेक बनवण्यामागील माझे उद्दिष्ट प्रेक्षकांच्या एका मोठ्या वर्गापर्यंत पोहोचण्याचे आहे. ‘नांधी’ हा एक महत्त्वाचा चित्रपट आहे. यात प्रशासनातील काही त्रुटी दाखवण्यात येतील. हिंदीमध्ये करण्यासाठी स्क्रिप्टवर काम सुरू आहे. राजू म्हणाले, ‘नांधी’सारख्या चांगल्या कथेवर देवगणसोबत काम करण्यास मी उत्साही आहे. अभिनय सोडून अजय चित्रपट निर्मितीमध्येही सक्रिय आहे.

2. ‘सत्यनारायण की कथा’मध्ये कार्तिकसोबत दिसू शकते श्रद्धा
सध्या श्रद्धा या चित्रपटाशी अधिकृतपणे जोडली गेली नाही. मात्र सर्व काही ठीक झाले तर श्रद्धा आणि कार्तिकचा हा पहिला चित्रपट ठरू शकतो. ते एकत्र काम करताना दिसतील. दिनेश विजानने यापूर्वीही या चित्रपटासाठी या दोघांकडे संपर्क साधला होता, पण त्यानंतर काहीच निष्पन्न झालं नाही. ही एक संगीतमय प्रेमकहाणी असेल. कार्तिक आर्यन गेल्या काही दिवसांपासून साजिद नाडियाडवाला यांच्या ‘सत्यनारायण की कथा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकताच कार्तिक या चित्रपटाचा भाग झाला आहे. आता कार्तिकच्या या चित्रपटात श्रद्धा कपूरसुद्धा त्याच्यासोबत दिसू शकते, अशी चर्चा सुरू झाली आहे. यापूर्वी साजिदने आपल्या आवडत्या कथेत श्रद्धा घेण्याचा विचार केला होता. श्रद्धा कपूरलाही चित्रपटाची कल्पना आवडल्याचे ऐकले आहे. तिने या चित्रपटासाठी आपला होकार कळवला आहे. तथापि, आतापर्यंत फक्त चर्चा सुरू आहे. अधिकृत माहिती समोर आली नाही.

3. ‘फिलहाल 2’मध्ये पुन्हा दिसेल नूपुर आणि अक्षयची केमिस्ट्री
अक्षय कुमार आणि नूपुर सॅनॉनचा ‘फिलहाल 2’ म्युझिक व्हिडिओचा टीझर 30 जून रोजी रिलीज होणार आहे. अक्षयनेही या गाण्याचे फर्स्ट लूक पोस्टर सोशल मीडियावर शेअर केला आहे. अक्षयने कॅप्शनमध्ये लिहिले, ‘वेदना अजूनही सुरूच आहेत. ‘फिलहाल’ने तुमच्या हृदयाला स्पर्श केले असेलच’ फिलहाल 2’ तुमच्या आत्म्याला स्पर्श करेल. याचा फर्स्ट लूक पाहा. टीझर 30 जून रोजी रिलीज होणार आहे. हे गाणे बी प्राक यांनी संगीतबद्ध केले आहे, गीत जानी यांचे आहे.

4. गॉसिपसाठी खोटी माहिती पसरवली जाते : ऋचा
वेब सीरिज ‘इनसाइड एज 3’च्या पुन्हा शूटिंग करण्याच्या बातम्यावर अभिनेत्री ऋचा चड्डाने मौन सोडले. ती म्हणाली, मला याविषयी माहिती नाही. मी याचे रीडिंग कधी केले तेही मला आठवत नाही. मात्र मी आताच सीरिजसाठी माझे डबिंग पूर्ण केले. त्यामुळे मी स्वत: सेटवर काम करत आहे, त्यामुळे मी अफवाकडे लक्ष देत नाही. मी काही चुकीचे बोलत नाही. मात्र गॉसिप करण्यासाठी खोट्या बातम्या पसरवल्या जातात. अशा लोकांवर विश्वास करायला नको. सेटवर बरेच लोक उपस्थित असतात मात्र त्यांना काही माहित नसते. खरं तर, नुकतेच ‘इनसाइड एज’ च्या 3 ची तयारी पुन्हा सुरू झाल्याची बातमी आली होती. कारण प्राइम इंडियाला निर्मात्यांनी बनवलेले कंटेंट आवडले नव्हते.

बातम्या आणखी आहेत...